भैरवी पुरंदरे या व्यक्ती बद्दल एकूणच कुतूहल होते.. कोण
आहेत या भैरवी पुरंदरे ?
एखाद्या गोष्टी बद्दल आत्मीयता असेल आणि ती गोष्ट पूर्ण
करण्याचा ध्यास घेतल्यावर पडणाऱ्या कष्टाची फिकीर केली नाही कि अशक्य काहीच नसते याचे उदाहरण म्हणजे भैरवी
पुरंदरे.
वयाच्या विसाव्या वर्षी
पासून गेली तब्बल ३० वर्षे जाणता राजा मध्ये करीत असेलेल्या जिजाबाई म्हणजेच भैरवी
ताई ... पण खरे तर त्यांची
ओळख याहून किती तरी मोठी आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये त्यांच्या मॉडेल कॉलोनी मधील
प्रशस्त फ्लॅट मध्ये भेट आणि गप्पा झाल्या आणि गप्पां मधुन भैरवी पुरंदरे उलगडत गेल्या ...
वडिलांची फिरतीची
नोकरी , त्या मुळे शिक्षण अनेक
ठिकाणी झाले ... दहावी हुजुरपाग मधून झाले, वाचनाची लहान पणा
पासून आवड ... जे मिळेल ते वाचत गेल्या , आई मुळे अगदी
लहान वयात ज्ञानेश्वरी वाचुन काढली... एकूणच या वाचन संस्कार मुळे विचार प्रगल्भ
झाले आणि पुढील आयुष्यात याचा खूप उपयोग झाला ...
१९८५ साली अगदी चहा पोहे खाऊन भैरवी रानडे बनल्या भैरवी
पुरंदरे ...
महाराष्ट्रात
पुरंदरे या आडनावाला एक वलय आहे , त्याला कारणही
तसेच ... ज्यांनी शिवछत्रपतींचे चे चरित्र
लिहिण्या आणि सांगण्या करिता आयुष्य वेचले , ते महाराष्ट्र
भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे.... अशा घरातील जेष्ठ सुनबाई म्हणजे भैरवी ताई ...
तसे पाहता बाबासाहेबांची
सून होणे सोपेही नव्हते आणि म्हंटले तर अवघडही नव्हते... सोपे या करता नाही की
बाबासाहेब या नावाला महाराष्ट्रात असलेला आदर ... आणि अवघड अशा मुळे नव्हते की
बाबासाहेबां मध्ये असलेला प्रेमळ पिता... पण कुटुंबात येताना भैरवी ताई थोड्या बावरलेल्याच होत्या , पण पुरंदरे
कुटुंबीयांनी त्यांना आपलेसे करून घेतले ... वटवृक्षाच्या छायेत वावरणे सोपे नसते असे म्हणतात त्याला कारण वटवृक्षाच्या छायेत नवीन रोपांची
वाढ खुंटते .. पण त्याच वृक्षा खाली साधना
केली तर सिद्धी प्राप्त होते.. ताईंनी वाढीची चिंता न करता साधना केली, त्याचे फळ पुढील आयुष्यात मिळाले.
आज सांगुन खरे वाटणार नाही पण लग्ना नंतर भैरवी ताईंना
“स्टेज फिअर” होते असे त्या सांगतात... लग्न झाले तेंव्हा जाणता राजा रंगभूमी वर
आलेले होते , या महानाट्यात
जिजाबाईंची ची भूमिका तीन वेग वेगळ्या
कलाकार करीत होत्या ... कारण त्या
भूमिकेचा एकूण काळ शिव जन्म ते राज्याभिषेक म्हणजे जवळ पास सत्तर वर्षाचा ... एका कलाकारा
करिता या भूमिकेतील स्थित्यंतरे दाखविणे अवघडच होते , पण नंतर काही
कारणां मुळे ही भूमिका भैरवी ताई कडे आली ..आणि त्यांनी आव्हान स्वीकारून तीनही
कलाकारांची भूमिका एकत्रित पणे केली
... ही गोष्ट १९८६ ची ... त्या
नंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही...
त्या पूर्वीची एक घटना , बाबासाहेबांचे
" फुलवंती" पुस्तक लिहून तयार होते , त्याच्या
मुखपृष्ठा करिता चेहेरा शोधण्याचे काम चालु होते , त्या वेळेस
भैरवीताई चा चेहेरा बाबासाहेबांना मुखपृष्ठा करिता योग्य वाटला ... हा त्यांचा
कॅमेरा चा पहिला अनुभव !
जिजाबाई करीत असताना त्यांना रंगभूमी समजत गेली , नाटकाची आवड
निर्माण झाली ... मग हळू हळू स्वतः च्या हिमतीवर शाळां मध्ये नाटकाची छोटी मोठी
कामे करीत गेल्या ... “जाणता राजा” बाबासाहेबांचे स्वप्न होते ... त्याच वेळेस
सुने च्या मनात पण स्वतःची काही स्वप्ने होती, स्वप्ने म्हणजे
काय तर स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करणे..
शाळेत कामे करीत असताना त्यांना आपण मुलां मध्ये जास्त रमतो
या गोष्टीची जाणीव झाली, आणि मग त्या दृष्टीने
विचार सुरु झाले ... मग मुलां करिता हळू हळू नाटके लिहू लागल्या , त्याचे दिग्दर्शन
, निर्मिंती अशा सगळ्या भूमिकेत त्या वावरू लागल्या ...बाल रंगभूमी उद्याचे कलाकार निर्माण करीत असते ... नाटक हे
शास्त्र नसून संस्कार आहेत अशी भावना असलेल्या भैरवी ताईनि काही वर्षा पूर्वी
" नाटकाची शाळा " ही संस्था सुरु केली. सुधा करमरकर , सुलभा
देशपांड्यानी आधीच्या पिढीत भरभरून काम केले आहे ... त्यांचे काम पुढे नेणे हि
काळाची गरज होती ... आपल्या शिक्षण पद्धती मध्ये नाटक हा विषय दुर्लक्षित याची
त्यांना मनापासून खंत वाटते ... एकूणच बालरंगभुमीची परिस्थिती अवघड आहे आणि प्रचंड
उदासीनता आहे ... ती उणीव भरून काढण्याचे काम त्यांची संस्था करीत असते .. कलाकारांची
पुढची पिढी घडविण्याचे व्रत घेतलेले असे लोक आहेत आपल्या समाजात ...अनेक नाटके लिहिली , रंगभूमीवर आणली
... प्रसंगी पदरमोड केली ...
चौकोनी कुटुंब .. पतीचा व्यवसाय ... मुलगी Editing
& Event Management मध्ये करिअर करते.. मुलाचे शिक्षण चालू आहे...
मुलगा पुरंदरे घराण्याची परंपरा पुढे चालवतो ... त्याला एकूणच गड आणि किल्ल्यांचे
आकर्षण ... घरून सिंहगडा पर्यंत चालत जातो , रात्र रात्र
गडावर मुक्काम करतो ... विशेष म्हणजे ही दोनही मुले दत्तक घेतलेली .... काय म्हणावे या पती पत्नीला? स्वतः
शी प्रामाणिक असेलेले लोकच असे वागू शकतात ? आपण अशा
दांपत्याला फक्त दंडवत घालू शकतो...
भैरवी ताई ना सिनेमा या माध्यमाचे आकर्षण नाही , पण सिरियल्स चे
आहे कारण जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचण्या करिता ते योग्य माध्यम आहे असे
त्यांचे मत आहे ... सतत नवीन गोष्टींचा शोध चालू असतो ... आता त्यांनी कुमार
रंगभूमी अशी संकल्पना आणली आहे.. नवीन विषयवार लिखाण चालू आहे... वारी आणि गणेश
उत्सव हा विषय डोक्यात घोळत आहे ... पन्नास पैकी सत्तेचाळीस हे नाटक गाजते आहे ...
सकाळ आणि इतर वृत्तपत्रात मुलां करिता केलेले किंवा करीत
असलेले लिखाण ,मुलां करीता
लिहिलेली अनेक पुस्तके, ज्ञान प्रबोधिनी , अक्षर नंदन आणि
इतर शाळात घेत असलेल्या नाट्य कार्यशाळा या सगळ्या गोष्टी पुरंदरे घराण्याच्या
सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे चालवीत आहेत.
अशा एक ना अनेक गोष्टी सामावलेल्या ... कुमार रंगभूमी करता
पोट तिडकीने काम करणाऱ्या ... मुलां वर जगावेगळे संस्कार करणाऱ्या ... नाटकांची
शाळा संस्थे च्या सर्वेसर्व्या... म्हणजेच जाणता राजाच्या जिजाबाई अर्थात भैरवी
पुरंदरे ....
जगात दोन प्रकराचे लोक असतात, यश मिळविण्या करिता काम करणारे किंवा समाधान मिळविण्या मेहनत करिता करणारे ... भैरवी ताई नक्कीच दुसऱ्या
प्रकारातील ... कारण त्यांच्या दृष्टीने आत्मिक समाधान म्हणजेच यश हे साधे सरळ
तत्वज्ञान...
त्यामुळेच आजकाल बहुतेक ठिकाणी “शाळेचे नाटक” करणाऱ्या संस्था असताना तिथे “नाटकाची शाळा” करणाऱ्या भैरवी ताई चे कौतुक न वाटेल तरच नवल
ना ?
बिपीन कुलकर्णी
No comments:
Post a Comment