Monday, October 19, 2015

कुटुंब रंगलय गप्पात !!!!!

लांब विस्तीर्ण पसरलेली हिरवाई, उंचच उंच डोंगरांच्या रांगा, मधून वाहणारी पांढरी शुभ्र नदी। सुंदर बगीचे , कारंजेसुंदर नगरीस्वर्गच जणू

जणू काय ? स्वर्गच होता तो

गावाच्या वेशीला " चित्रगुप्ताचे कार्यालय " , तिथले सोपस्कार पूर्ण करून लोक नगरा मध्ये प्रवेश करीत होतेयेणार्यांची वेशीवर गर्दी असते

नदीच्या दुतर्फा टुमदार घरे , एका सरळ रेषेत एकाला एक लागून असंख्य घरेया घरात आलेल्या लोकांची राहण्याची सोय चित्रगुप्ता कडून होत असते

आजची सकाळ थोडी वेगळीच …. थंड हवा , आसमंतात हलके धुके पसरलेले, गवतावर आणि आजूबाजूला सगळ्या फुलांवर  दव पसरलेलेएकूण वातावरण उल्हासित करणारे  होते… 

अप्पा आणि ताराबाई रोजच्या सवयी प्रमाणे morning walk ला निघालेले
वातावरणा मुळे म्हणा किंवा अजून कशा मुळे पण  अप्पा थोडेसे हळवे झालेले  ताराबाई नेहमी प्रमाणे शांत आणि स्थीरअप्पा नट सम्राटमधील अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत जाऊन तारा बाई ना म्हणाले -

अप्पातारा , गेल्या पन्नाससाठ वर्षात एकगोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणारआहे ती .

ताराबाई  — कोणती ती?

अप्पातू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम केले तुझ्यावर.

ताराबाई  — इश्श ! या गोष्टी बोलायच्या असतात का ? आणि हे काय मला माहीत नव्हतं ?

अप्पातरीही एकदा सांगावंसं वाटतं.

ताराबाई - असू दे असू देमला एक सांगा…. माझ्या पुढे येउन इथे काय केलेत हो  ?

अप्पा - अग तारा तेच ९० च्या दशकात आपण करत होतो तेच  …

तारा बाई - मी नाही समजले ? जरा नीट सांगा नाशाळेत भूगोल शिकविल्या सारखे कोड्यात का बोलता ?

अप्पा - अग ताराआई ची सेवा ! अन दुसरे काय, कधी अनंतरावा कडे गप्पा , सुशीला बाई पण असायच्या गप्पा मारायला , जुना गप्पांचा फड जमायचाआमचे जुने स्वातंत्र्य सैनिक आहेत इथे , त्या मुळे वेळ जायचा

तारा बाई - अरे वाश्रावण बाळ इथे पण नाही चुकला

अप्पा - तारा तू पण ना

तारा बाई - एक सांगू ?

अप्पा - सांग ना  …. तुला कधी पासून विचारायची वेळ आली ?

तारा बाई - नाही हो , तुम्ही इकडे आलात आणि माझे तिकडे लक्षच लागेना

अप्पा - अग तारापण तू फार घाई केलीसमुलांना , नातवंडाना आणि सगळ्यांना तुझी गरज होती … 

तारा बाई - जाऊ दे …. विचार करू नका …  डोळे पुसाथांबा मीच पुसतेहा घ्या पदरआठवते हैदराबाद ला लग्ना आधी आपण भेटायचो तेंव्हा तुम्ही पदराला डोळे नाही पण हात पुसायचात
अप्पा - हो होतारा विसरेन का मी ?

तारा बाई - आज इतके छान वातावरण आहें नाखूप छान वाटतेयआज हळवे नाही होयचे …  मन सांगतेय आज काही तरी छान होणार आहे ? कोणी तरी भेटेल असे वाटते
अप्पा - हो मलाही तसेच वाटतेयचल थोडे लांब फिरून येऊ

तारा बाई - अहो ते पाहिलेत का ? काठी टेकवत येत आहेत , धोतर , पांढरा शर्ट , चोकलेटी टोपी …. कोण असेल हो ? त्यांच्या बरोबर नऊ वारी साडी वाल्या बाई पण दिसताहेत …. कोणी आपल्या पैकीच दिसतेयडोक्याला अंबाडा आणि गजरा पण दिसतोयसांगा ना कोण असतील ते ?

अप्पा - अग हो…  होथांबशील जरा ? थोडे पुढे जाऊन पाहू
----------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्पा - अग…  तारातारा

तारा बाई - अहो मी इथेच तर आहेतुमचि मेली हाका मारायची सवय काही नाही गेली अजून

अप्पा - अग हे तर नानासाहेब आणि ताई आहेत …  

ताराबाई - अहो खरेच कित्यांना जोडीनी पाहून कैक वर्षे होऊन गेलेतकिती खुशीत आहेत ना

अप्पा - नमस्कार करतो नाना साहेबताई नमस्कार करतो

तारा बाई - नमस्कार करते

ताई - अहो असू द्याकसे आहात ?

ताराबाई - आम्ही छान आहोत , तुम्ही कसे आहात

ताई -  आम्ही पण छान …

तारा बाई - बाकी काय म्हणता

ताई - काही नाही हो … आम्ही दोघे इतक्या वर्षा नंतर भेटलो …खुप गप्पा मारतो … माझ्या पाठीमागे झालेल्या सगळ्या गोष्टी हे मला आठवून आठवून सांगत असतात … ह्यांचे लहान भाऊ वसंत भावोजी पण असतात  गप्पा मारायला … ते दोघे जणू राम - लक्ष्मन च  … अनंता  पण आला आहे पण त्याने  फार घाई केली यायची … 

तारा बाई - हो ना काय म्हणणार ?

नाना - अहो…  ठरलेय ना आपले आता डोळ्यात पाणी नाही काढायचे असे ?

ताई  - ताराबाई , अहो मला ना तुमचा बंगला फार आवडायचा ? आम्ही फार छोट्या घरात आणि गरिबीत राहिलोमी यांना नेहमी म्हणायचे मेढेकारांचा बंगला फार सुरेख आहे हो… 

तारा बाई  - अहो नानांनी आणि तुमच्या मुलांनी पण फार सुंदर बंगला बांधलापण तुम्ही पुढे निघून आलातपण आम्ही खूप वर्षे जात येत होतो तिथे

ताई - हो यांनी वर्णन केले बंगल्याचेभरुन पावले मी

नाना -बर मनु ताई कशा आहेत ?

अप्पा - नानासाहेब तिचे काय विचारताती स्वतःला इथे पण व्यस्त ठेवतेबायकांना  स्वावलंबित  करायचा वसा घेतलाय ना , आपण भोगलेला त्रास कोणी भोगू नये , या करिता धडपडदुसरे काय ?आणि मुख्य आमच्या वडिलांशी इतक्या वर्षांच्या राहिलेल्या जिवाभावाच्या गप्पा …  कधी रुसणे , रागावणे …कारण आमचे वडील फारच लवकर आले इकडे , त्या मुळे तिकडे असताना तिला रुसवायची  किंवा रागवायची संधीच दिली नाही ना त्यांनी …. 

नाना - खरे आहे दत्तोपंत रावनशीबवान होतात तुम्ही आई च्या बाबतीत  ….

अप्पा - ते मात्र आहेआम्ही नशीबवानपण नानासाहेब तुम्ही पण कुटुंबाच्या बाबतीत नशीबवान होतात  ….

नाना - मान्य १००%

ताई - तारा बाई कुठे आहात हो राहायला ? आम्ही त्या तिकडे पलीकडेती पायवाट जातेना डोंगरा कडे तिच्या शेवटीया आता घरी

तारा बाई - अहो ताई आम्ही पण इथेच जवळइथून  पुढे गेलो कि ती नदी दिसते नातिथले शेवटचे कोपर्यातले शेवटचे घर …. आधी तुम्ही या घरी

नाना - दत्तोपंत राव कोण आहे शेजारी ? गप्पा मारायला कोणी आहे कि नाही

अप्पा - आहेत ना बरीच जुनी मंडळी आहेत  … अनंतराव - सुशीला बाई  आहेत , सिरसमकर दादा आणि वाहिनी  आहेत , त्यांची सून आरती तर तुम्हाला माहितीच आहेती खूप काळजी घेते आम्हा वयस्कर लोकांची….

नाना - हो आरती ताई आहेत म्हंटल्या वर काळजीच नाही

ताई - अहो ऐकलत का ? कोण ह्या आरती ताई

नाना - अहो त्या आपल्या मोठ्या सुनबाई ची धाकटी विहीण , मी भेटलोय आणि जेवलोय खूप वेळेस  त्यांच्या हातचेसुगरण आणि अतिशय हौशी बाई हो

अप्पा एकूण तुम्हाला शेजार चांगला आहे

अप्पा - नानासाहेब तुम्हाला कोण आहे शेजारी

नाना - अहो आमचा जळगाव करांचा गोतावळा तुम्हाला माहितीच आहे , तसे खूप आहेतमाझा भाऊ वसंत आणि  माझा नातू राहतो विलास आमच्या बरोबरविलास च्या  व्यवसायाच्या काही खटपटी चालू आहेतशेजारच्या वाड्यात मोठे भाऊ अप्पा मोठ्या वाहिनी आहेत …  असे आहोत आम्ही सगळे एक दुसर्याला …  

अप्पा - वा वा छान

तारा बाई - नानासाहेब आणि ताई , शनिवारी या सगळे जेवायला … 

नाना - हो हो येऊ नक्कीगप्पा आणि भेटी गाठी होतील सगळ्यांच्या

ताई - अहो असे काय करता .… शनिवारी सुधाकर आणि कुसुम येणार आहेत ना आपल्या कडे ?

नाना - अरे हो , विसरलो मीताराबाई शनिवारी भाचा आणि सून येणार आहेत

तारा बाई - अहो ओळखतो आम्ही त्यांना , ठीक आहे मग रविवारी या

ताई - ठीक आहे तारा बाई रविवारी येऊ …. पण एक सांगते जास्त काही करू नका

तारा बाई - तुम्ही या , काय करायचे ते सासूबाई ठरवतील …. तुम्हाला तर माहितीच आहे त्यांच

ताई - ठीक आहे , पण सांगा त्यांना आमचा निरोप

अप्पा - सांगतो आई ला निरोपनानासाहेब अनंतराव कुठे आहेत दिसले नाहीत ?

नाना - तो गेला आहे त्याच्या कामालाकाम म्हणजे काय हिच्या माझ्या गोळ्या औषध आणायलाचीरंजीव आणि वडील खूप फिरत असतात …. येतील  इतक्यात ,

अप्पा आणि  तारा बाई - चिरंजीव ???

नाना - अहो विसरलात का सचिन ? तोच तर तरुण आहे आम्हा सगळ्यात …. खूप काळजी घेतो आमची ….

तारा बाई - अग बाई खरेच कि ? तुम्ही सगळे नक्की या रविवारी ….

नाना - चला निघू आपण  … खूप वेळ झाला ….

अप्पा - नमस्कार …. भेटू रविवारी ….
------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
ताई - छान वाटले ना हो , किती अचानक भेटले ?

नाना - हो ना …. आज अगदी गुलमंडीवर चक्कर मारल्या सारखे वाटलेतिथे कोणी  असेच अचानक भेटायचे ….

ताई - गुलमंडी म्हणजे तीच नाआपल्या घराच्या मागची ….

नाना - हो …. पण तू म्हणतेस ते आपले फार जुने घरआताच्या घरा पासून गुलमंडी थोडी लांब आहे ….

ताई - अस्स अस्स …. मगाशी तारा बाई म्हणत होत्या तो बंगला ना ?

नाना - हो ….

ताई - अहो मला एक सांगाल का ?

नाना - विचार ना ….

ताई - कसे काढले हो दिवस एकट्यानी , मी इकडे आल्यावर ? एकटे पण नाही जाणवले ?

नाना - अहो खरे सांगू का  … सुरुवातीला झाला खूप त्रासकंटाळा यायचा , चीड चीड व्हायची , कशात लक्षच नाही लागायचे, पण नंतर खूप विचार केलाया मुलांना तरी कोण आहे आपल्या शिवाय …. त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचे , आणि तुम्हाला सांगतो त्रास हळू हळू कमी झाला

ताई - ते मात्र बरे केलेत , पण एकच खंत मला आहे हो ? मुलांचे संसार , नातवंडे डोळे भरून नाही पाहू शकले मी
नाना - अहो मी पहिले ना , खूप छान संसार सगळ्यांचे , नातवंडे पण चांगली , इतकेच काय पतवंडे पण पाहून आलो …. पण एक सांगू का तुम्हाला ?

ताई - सांगा ना ….

नाना - मी जे  जे काही पहिले  , ते दोघांच्या डोळ्यांनी पहात होतो …. त्या मुळे कदाचित दुख: हलके होत होते

ताई - हो कळत होते  मला…. चला निघूखूप वेळ झाला
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनुताई - अहो बराच वेळ झाला हे दोघे अजून आले नाहीतरोज लवकर येतात फिरून

रामचंद्र राव - अहो किती जीव वर ठेवता , येतील इतक्यात

मनुताईअहो आजू बाजूला ते नसले कि एकटे पण जाणवते ….

रामचंद्र राव - हे बरे आहेमी आहे ना , मग कसले एकटे पण ?

मनुताई - तुमचे आपले काही तरीचसवय होऊ दिलीत का तुम्ही तुमच्या सहवासाची ?

रामचंद्रराव - खरे आहेतुमच्यावर अन्यायच झाला ….

मनुताई - असू दे असू दे …. निभावले सगळे

रामचंद्रराव - निभावले कसले …. तुम्ही खंबीर पणे उभे राहिलात म्हणून झाले सगळे व्यवस्थित

मनुताई - काही नाही हो…. परिस्थिती माणसाला खंबीर करते ….

रामचंद्रराव - हात बघू तुमचे ?

मनुताई - इश्य …. हे काय नवीन ?

रामचंद्रराव - अहो नाही हो …. किती कष्ट केलेत , किती खडबडीत झालेत हात तुमचे….

मनुताई - तुमचे आपले काही तरीच …. किती वर्षे पोळ्या करीत होते मी , पण पोळ्या करणे म्हणजे का कष्ट असतात…. सगळे व्यवस्थित पार पडले हे महत्वाचे ….

रामचंद्रराव - हा तुमच्या मनाचा मोठे पणा , पण तुम्ही आमच्या पेक्षा नशीबवान बरका …. फॉरेन ला राहून मड्डम बीड्डम होऊन आलात , कसे आहे हो तिंकडे ? पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणतात ना ….

मनुताई - चला तुमचे आपले काही तरीच ….फॉरेन बिरेन ला गेले , पण शेवटी जिथे आपली माणसे तोच आपला स्वर्ग असतो पृथ्वी वरपण मला एक सांगा , तुम्ही काय केलेत इतकी वर्षे ?

रामचंद्रराव - काही नाहीथोडे अध्यात्म , परमार्थ , मित्र जमवले ….

मनुताई - ते बरे केलेतआले बघा अप्पा आणि तारा ….
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अरे अनंता कुठे गेलास हो इतका वेळ ?

अनंत - अग कुठे नाही , बाजारात गेलो होतो , आज जायचेय ना मेढेकारांकडे जेवायला …. नवीन साडी आणली बघ तुला ….त्याच त्याच साड्या घालतेस तू ? जुनी सवय तुझी …. आणि हे बघितलेस का ? नानांनी तुझ्या करता गजरा आणायला सांगितला होता

ताई - भरून पावले बाई मी

अनंत - नाना कुठे गेले ?

ताई - अरे असतील इथेच …. ते आणि वसंत भावजी बसले असतील तिकडे गप्पा मारतत्यांच्या गप्पा काही संपत नाहीत …  बोलव त्यांना आणि सांग दोघांना तयार व्हायला ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनंत - चला हळू हळू ,

नाना - अरे रस्ता माहिती आहे का तुलाका सांगू मी

अनंत - माहिती आहे मलातुम्ही आणि काका चला पुढे , मी ताई चा हात धरतो….

ताई - अरे अनंता हे दोघे भाऊ पुढे गेले बघ …. फार घाई असते बाबा त्यांना….

अनंत - असू दे …. मी आहे ना ….

ताई - अरे हे कोणाशी बोलताहेत …… कोणी तरी भेटले वाटते त्यांना ….

अनंत - अग ताई ते  श्री सौ हस्तेकर आहेत

ताई - कोण बाबा हे ….

अनंत - अग ते तुझे सगळ्यात धाकटे व्याही आणि विहीण आहेत ….

ताई - हो का …. मला सगळेच नवीन ….

अनंत - नमस्कार करतो आजी ….

ताई - अरे येवढ्या जोरात का बोलतोस तू ?

अनंत - अग त्यांना ऐकायचा त्रास आहे ….

ताई - अस का …. ठीक आहे ….
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अनंता एवढी गर्दी कसली रे इथे ?

अनंत - थांब मी पाहून आलो ….

ताई - काय आहे रे ?

अनंत - अग तिकडून एक मोठे  शास्त्रज्ञ आलेत ….अब्दुल कलाम नाव त्यांचे …. त्यांना पाहायला गर्दी झालीय ….
ताई - चल मलाही बघायचेय त्यांना ….

अनंत - चल ….
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अनंत ते बघितलेस ….  तो निळ्या डोळ्याचा राज कपूर रे ….

अनंत - होतू ओळखलेस बरोबर ….

ताई - पाहिलेत रे काही सिनेमेतुला माहिती, मनुताई ना पण सिनेमा ची फार आवड होती ….

अनंत - हो का असेल बाबा ….

ताई - त्या बाई कोण आहेत रे आपल्या कडेच पाहताहेत …. तुझ्या ओळखीच्या दिसताहेत ….

अनंत - थांब एक मिनिट ….

(त्या बाई जवळ आल्या आणि निरखून पाहून म्हणाल्या )

बाई - तुम्ही अनंतराव …. कशी आहे माझी सुधा ….

अनंत - ती बरी आहे , तुम्ही सुधा म्हणालात म्हणून कळले नाही तर ओळखलेच नसते हो मी

बाई - तुमची चूक नाही , तुम्ही पाहीलच नाही कधी मला …. त्या मुलांना लहान पणी सोडून आले मी ….

अनंत - ताई या तुझ्या दोन नंबर च्या विहीण बाई

ताई - नमस्कार

ताई - चल बाबा लवकर ….

ताई - अनंता त्या तिकडे पाहिलेस ? ओळखलेस त्यांना

अनंत - कुठे ?

ताई - अरे ते बघ बालगंधर्व …. अरे खूप नाटके पहिलीत त्यांची आम्ही दोघांनी …. किती सुंदर आहेत दिसायला अजून पण  ….
अनंत - हो हो … आता चल लवकर

अनंत - चला  आले बघा  मेढेकारांचे घर …

ताई - ह्यांना सांगून ठेव , जेवण झाले कि थोडा वेळ बसा म्हणा …. फार घाई असते यांना घरी जायची … आधी तुम्हा पुरुषांची आणि मग आम्हा बायकांची जेवणे होयला वेळ लागेल

अनंत - हो ताई मी बघतो …. चल तू आत ….
______________________________________________

बिपीन कुलकर्णी