Monday, January 4, 2016

" नटसम्राट" ....आमचे मत



" नटसम्राट" सिनेमा पहिलाचांगला आहे …                                                      ५ जानेवारी २०१६

कदाचित जास्तच अपेक्षा ठेवल्या मुळेअतिसुंदर किंवा अप्रतिम असे  काही फिलिंग आली नाही….

नटसम्राट नाटकाची कथा प्रत्येकाला परिचित , त्याचे चित्रपट  रुपांतर पाहणे हि उत्सुकता होती …. 
नानाचा अभिनय ग्रेटचमेधा मांजरेकरांची  कावेरी पण उत्तमनाटकात नसलेले पण चित्रपटा करिता निर्माण केलेलं  राम चे पात्र आणि विक्रम गोखलेंचा अभिनय खरेच लाजवाब

नाना आणि विक्रम गोखल्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मजा येतेहॉस्पिटल मधील त्या दोघांचा प्रसंग  ज्यात विक्रम गोखले कर्ण आणि नाना चे श्रीक्रीष्णा चे  संवाद अंगावर काटा आणतात …. त्या एका सीन मध्ये सिनेमा चे पैसे खरे तर वसूल होतात

संपूर्ण चित्रपट भर नाना हा नानाच वाटतो…. त्यात गणपतराव बेलवलकर शोधावा लागतोकदाचित आम्हीच  प्रत्येक भूमिकेत त्याला नाना म्हणूनच पहात   असतो… 

सिनेमा मध्ये दारू ला नको तितके महत्व दिले आहे , जे कि वि वा शिरवाडकरांच्या कथानकात नव्हते ,
नाट्य कलाकारांचा चौथा अंक हा त्या काळी काय किंवा आज काय कायम चर्चेत असतो…  पण त्याला अपवाद होते आणि असतात   … म्हणूनच  सिनेमातील दारूला दिलेले  महत्व खटकतेतसेच शिव्यांच्या नको तितका वापर पण रसभंग करतो ?

नटसम्राट हि खरे तर अप्पा बेलवलकर या रंगदेवतेच्या पुजार्याची शोकांतिका , पण मद्यपाना चा आणि शिव्यांचा अतिरेक , अप्पा बेल्वाल्काराना एक ग्रे शेड देतो  ….

कदाचित हे सगळे पाहून आजची तरुण पिढी म्हणू शकते " अप्पांचे पण थोडे चुकलेच, त्यांनी असे वागायला नको होते "
  

बिपीन कुलकर्णी 



Sunday, January 3, 2016

अभिष्टचिंतन - "जिंदादिल " तात्या अभ्यंकर !!



अभिष्टचिंतन - "जिंदादिल " तात्या अभ्यंकर !!                                                     जानेवारी २०१६

पु लं च्या नाथा कामत चे " बाबा रे " या शब्दावर जितके प्रेम तितकेच तात्याचे " बाजवला " या शब्दावर !
या शब्दाचे संदर्भ स्थळ, काळ आणि वेळे प्रमाणे बदलणारे  !!

ज्याची  आराध्य दैवते  पंचमदा , किशोर, भीमण्णा , बाबूजी तो तात्या

पु , भीमण्णा , बाबूजी सारख्या एक ना अनेक  दैवतांचा नुसता सहवास नाही तर ज्याच्या पाठीवरून त्यांनी हात फिरविला तो तात्या  !

मधुबाले चा  निस्सीम भक्त, तिच्या आठवणी गोळा करण्या करिता साक्षात  वहिदा रेहमान ना किंवा मधुबालेच्या परिचितांना भेटणारा
तिच्या आठवणीत हळवा होणारा ! मधुबालेच्या थडग्या वर आसवे गाळणारा तात्या  !

प्राण साहेबांच्या घरी जाऊन " काजू कतली " खाऊन येणारा तात्या !

किशोर कुमारांची भेट घेण्या करिता , त्यांच्या घरी -- फेर्या मारणारा तात्या !

सुधीर फडक्यांच्या पत्नी ललिता बाई , म्हणजेच ललिता मावशींचा सहवास आणि प्रेम मिळालेला तात्या !

एका लग्न कार्यात साक्षात उषा किरण च्या हातावर पेढा ठेवण्याचे भाग्य मिळालेला तात्या !

पु  म्हणतात तसे , पाऊस अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचे भिजणे वेगळे ! याच भाषेत सांगायचे तर तात्याचे पावसात भिजणे म्हणजे वेगळे  !

कोण आहे हा तात्या ?

तात्या म्हणजे माझा एक फेसबुक वरील मित्र !
आमच्या लहान पणी पेन फ्रेन्डशिप असा काहीतरी प्रकार होता , त्या वयात आम्ही कधी त्यात पडलो नाहीपण आता सोशल मेडिया च्या जगात , फेसबुक व्हाटस अप्प मुळे अनेक लोकांशी ओळखी झाल्या. त्या पैकीच मैत्री झालेली एक वल्ली म्हणजे तात्या !

चंद्रशेखर रामचंद्रराव अभ्यंकर उर्फ तात्या !
ठाण्याच्या मध्यम वर्गीय संस्कारात वाढलेला एक अस्सल चित्पावन ! जन्माने जरी ब्राम्हण असला तरी वृत्तीने त्याच्याच शब्दात " बहुसमाज वादी "

मातृभक्त तात्या , व्यवसायाने LIC Agent … त्याचे client म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या पांढरपेशी लोका पासून थेट फोरास रोड च्या मुली / बायका पर्यंत ! नोकरीचीच्या सुरुवातीच्या काळात कामा निमित्त फोरास रोड वर जाणे येणे होते त्यामुळे  फोरास रोड समजत गेलाआणि त्यातून उलगडत गेली एके एके व्यक्तीचित्र …   तिथल्या बायकांना LIC चे महत्व पटवून देताना विश्वास संपादन केला आणि केव्हा तात्या सेठ झाला हे त्याला पण कळले नाही … so called intellectual किंवा समाजसेवक अशी बिरुदे लावायची गरज कधीच पडली नाही 

शास्त्रीय संगीताची बैठक , वाचनाची आवड, मनाला भिडेल असे लिहिणारा, बल्लवाचार्य , राजकारणा चा अभ्यास , जातीचा खवैय्या, अध्यात्माची आवड  … असे एक ना अनेक गुण एका ठिकाणी सामवलेला Versatile तात्या !!

आजूबाजूला घडलेल्या घटनांनी कधी उद्विघ्न होणारा , कधी हळवा होणारा तर कधी पोटतिडकीने लिहिणारा तात्या !

शिवसेना रक्तात भिनलेलीमनापसून शिवसेनेवर प्रेम करणारा तात्या !

लिखाणात सोनिया मावशी आणि मामा साहेब उल्लेख करून राजीकीय विरोधी पक्षांचे वेळेप्रसंगी कौतुक करणारा जिंदादिल तात्या …  
अटलजी ना भारत रत्न मिळाल्या नंतर , घरी शिरा बनवून स्वतः चे तोंड गोड करून घेणारा तात्या

अशी एक ना अनेक रूपे

तात्या तुझा आज वाढदिवस , देव तुला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो , हीच प्रार्थना !!

स्वतः मध्ये दडलेल्या निरागस बालकाला असेच जप ….

- बिपीन कुलकर्णी