Wednesday, December 21, 2011

ध्रुव "तारा"


ध्रुव "तारा"                                                                          २२ डिसेंबर २०११

महाराष्ट्रातल्या प्रत्तेक शहराला त्याची स्वतःची एक खाद्य संस्कृती आहेपण " पान संस्कृती" असलेले आमचे औरंगाबाद एकमेव असावे!!! अर्थात हि पान संस्कृती रुजवण्यात सगळ्यात मोठे योगदान आहे ते "तारा पान सेंटर" चे!!! अस्सल औरंगाबाद्काराना तारा पान सेंटर चा पत्ता सांगायची गरज नाही, पण तुम्ही औरंगाबाद बाहेरून येत असाल तर औरंगाबाद च्या कुठल्याही कोपर्यात आणि कोणालाही विचारले तरी तुम्हाला गूगल पेक्षा व्यवस्थित "driving directions " मिळतील असे हे ठिकाणयाला कारण या जागेने औरंगाबाद शहराच्या मर्यादा केंव्हाच ओलांडल्या आहेत त्याची कीर्ती आता साता समुद्रा पार पोहोचली आहे...खरेच एखाद्या पानाच्या दुकाना बाबतीत असे कसे घडू शकते?
त्या करिता आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे त्याचा इतिहास, हे सगळे एक रात्रीत मिळाले यश नाही
शरफुद्दीन सिद्दिकी अर्थात शर्फुभाई यांच्या मेहनती आणि कर्तुत्वाचे हे फळ,
शर्फुभाई वय नक्की सांगता येत नाही पण बहुदा ६५ च्या जवळ पास, मध्यम बांधा, उंची पावणे सहा फुट, पांढरे केसपांढरी दाढी,दात लालसर,अंगात कडक इस्त्रीचा फक्त पांढर्या रंगाचा कुडता पायजमा आणि डोक्याला कायम पांढर्या रंगाचा कपडा बांधलेला आणि चेहऱ्यावर कायम हसू,
४० वर्षा पूर्वी या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली, त्याला कारण पण तसेच...थोड्या फार शिक्षणा नंतर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सुदैवाने (हो सुदैवानेच) त्यांना यश आले नाही, आणि मग निर्णय घेतला व्यवसाय सुरु करण्याचा...आईला विचारले काय व्यवसाय करावा, कारण त्या वेळेस बरेच पर्याय होते? आईला स्वतःला पान खाण्याची आवड...म्हणून अर्थात आईने पान दुकानाचा पर्याय सुचवला ...आणि त्याच वळेस आईने स्वतः कात तयार करण्याची जबादारी घेतली,,,पितळेच्या भांड्यात जो ओला कात असतो त्या वर पानाची चव ठरत असते हे अस्सल पान खाणार्याला सांगायची गरज नाही...त्यामुळेच शर्फुभाई च्या पुढील यशात या आईच्या हातानी तयार झालेल्या काताचा महत्वाचा वाटा...
आजच्या भाषेत किंवा corporate world  मध्ये ज्याला Feasibility Sutdy म्हणतात, ते करण्या करिता म्हणजे व्यवसायचे ठिकाण निवडण्य करिता शर्फुभाई मुंबई पासून हैदराबाद पर्यंत वेग वेगळी शहरे पाहून आले, आणि शेवटी निर्णय झाला "गड्या आपलाच गाव बरा"
आणि मग ७० च्या दशकात या माय लेकांनी ७०० रुपये भांडवलावर सुरु केला व्यवसाय...आई चे काम कात बनवणे आणि मुलाचे पान तयार करून विकणे...काही व्यक्तींचा स्वभावाच निनिराळे प्रयोग करण्याचा असतो आणि त्या पैकीच एक शर्फुभाई...त्यांनी त्याकाळी पानाचे नीर निराळे प्रकार आणले, औरंगाबाद चे कडक उन म्हणून पाने बर्फाच्या लाद्यावर ठेवायची पद्धत, दुकानाच्या आजूबाजूला कुलर ठेवणे, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच व्यवसाय सुरु करण्या पूर्वी भारत भ्रमण करून वेग वेगळ्या शहरातले पानाचे प्रकार समजून आणि शिकून घेतले होते जसे कि  कलकत्ता , मद्रासीबनारसी पान आणि त्याच्या शिवाय नेहमीचे गुलकंदकपुरी आणि मघई या सगळ्या गोष्टी मुळे ग्राहकांचा ओघ वाढला नसता तर नवल. आजच्या घडीला ५६ निरनिराळ्या प्रकारची पाने इथे मिळतात...ग्राहकांच्या सोयी करता त्यांनी पानाचे मेन्यू कार्ड तयार करून ठेवले आहे...
दिवसाला -१० पाने विकण्या पासून सुरुवात केलेला व्यवसाय आज दिवसाला ४००० पाना पर्यंत पोहोचलाय, दुकानात २० जणांची टीम काम करते...वेग वेगळ्या कार्यक्रमात तर पानाची व्यवस्था करतातच तसेच थेट दिल्ली, जयपूर पर्यंत पानाच्या मागण्या पूर्ण करतात... रुपया पासून ३००० रुपया पर्यंतची पाने इथे मिळतात....या वरून शर्फुभाई च्या कर्तुत्वाची कल्पना करू शकतो. जसा व्यवसाय वाढला तसे घरातील काही लोक मदतीला आले...आज घरातील आणि बाहेरील २० अशी २४ जणांची टीम दिवस रात्र काम करत असते....
कुठलाही व्यवसाय कष्ट आणि सचोटी शिवाय वाढू शकत नसतो....कष्ट म्हणाल तर यांचे काम पहाटे पासून ते मध्यरात्र उलटून गेल्या नंतर - वाजे पर्यंत अखंड चालू असते...सचोटी च्या बाबतीत मी काय लिहिणार...ते अनुभवायलाच पाहिजे. "ग्राहको देवो भवया ओळीचा खरा अनुभव तिथे येतो... 
येवढा व्यवसाय मोठा झाला तरी शर्फू भाई ची प्रत्तेक गोष्टीवर बारीक नजर असते, maangement  च्या भाषेत second Line तयार आहे, तसेच proper empowerment मुळे शर्फुभाई ना व्यक्तीशः स्वतः पानाच्या गादीवर बसायची तशी वेळ येत नाही...पण तरी कोणी जुने किंवा  V  I  P  गिर्हाईक  असेल तर आवर्जून आपल्या हातचे पानं खाऊ घालणार...
पाना सारख्या व्यवसायात असून प्रतिष्ठा मिळविलेले माझ्या माहितीतील हे एकमेव उदाहरण!!! राजकारणातल्या प्रत्तेक पक्षात यांचे मित्रमोठ मोठ्या नेते मंडळी बरोबर उठ बस, तसेच वेग वेगळ्या टीव्ही चानेल्स चे पुरस्कार, निरनिराळ्या वृत्त पत्रातील त्यांच्यावर आलेले लिखाण, काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायवर केलेले प्रोजेक्ट रिपोर्ट्स... तसेच छोट्यातल्या छोट्या नेत्यासून शरद पवारां  सारख्या नेत्याने केलेले कौतुक  त्या मुळे नकळत शर्फुभाई या नावाला  एक वलय निर्माण झाले आहे.
पण......इतके सगळे चांगले असले तरी भारतातल्या प्रत्तेक व्यवसायाला भाऊ बंदकीचा एक शाप आहे, त्या प्रमाणेच शर्फुभाई आणि कुटुंबीय पण काही वर्षा पूर्वी  त्यातून गेले, दोन भाऊ वेगळे झाले... कटुता आली आणि नंतर फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून भरारी घेवून शर्फुभाई नि नवीन जागेत  व्यवसाय नव्या जोमाने करून व्यवसायाची अजून भरभराट केली
आज तारा पान सेंटर फक्त औरंगाबाद मधेच नाही तर अख्या महाराष्ट्रात नवीन व्यवसायात येणाऱ्या तरुणान करिता एक आदर्श बनून राहिले आहे....याला कारण ४० वर्षाची मेहनतचिकाटीजिद्द आणि  आत्मविश्वास.....      
पान व्यवसायात आज तारा पान सेंटर चे स्थान खरेच अढळ आहेत्या मुळे  ते आहे नुसतेच तारा नाही तर "ध्रुव तारा"