Wednesday, July 8, 2015

Candle March


Candle March                              8th July 2015
गेल्या आठवड्यात , ३ वर्षाच्या सानवी नावाच्या कोवळ्या फुलाचे निर्माल्य झाले !!!

तिला न्याय मिळावा या भावनेने काल काकडे सिटी मधील सगळ्या रहिवास्यानी  जो उस्फुर्त आणि अभूत पूर्व Candle March काढला , त्याला सर्व प्रसिद्धी माध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिली , पोलिसांचे सहकार्य तर होतेच शिवाय विविध राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठींबा दिला….. त्या करिता आम्ही सर्व काकडे सिटी रहिवासी या सगळ्यांचे ऋणी आहोत.

हि जी दुर्दैवी घटना घडली ती  खरेच विचार करायला लावणारी आहे ,

सानवि ३ वर्षाची कोवळी पोर ….  दाताचे छोटे दुखणे झाले ..डॉक्टरांनी रूट कॅनालिंग चा सल्ला दिला …  आणि आई वडिलांनी विश्वासानी त्याला होकार दिला …. पुढे काय झाले तो इतिहास !

वडील लेकीला डॉक्टर कडे नेतात काय आणि पुढील दोन तासात होत्याचे नव्हते होते काय ? सगळेच सुन्न करणारे !!

या सगळ्या प्रकारात चीड येणारी गोष्ट म्हणजे डॉक्टर ना प्रसंगाचे गांभीर्य न समजणे !!

वैद्यकीय ज्ञान मला नाही , पण सामान्य माणूस म्हणून पडलेले काही प्रश्न अनुत्तरीत आहेत -

१. भूल देवून  (Local Anasthesia ) रूट कॅनेलिंग हि नॉर्मल proceudre आहे असा दावा डॉक्टरांनी केला , तर या 
नॉर्मल proeudre मध्ये काही चुकीचे झालेय याची कल्पना डॉक्टरांना वेळेवर आली नाही का ?

२. मुलीने ने जेंव्हा डोळे फिरविले तेंव्हा डॉक्टर वडिलांना सांगत होते मुलगी घाबरली असावी आणि त्या मुळे असे करत असावी ……. भीती पोटी डोळे फिरवणे हि नॉर्मल गोष्ट असू शकते का ?

३. त्या नंतर डॉक्टरांनी सल्ला दिला , शेजारी बालरोग तज्ञा कडे घेवून जा … वडील जेंव्हा मुलीला बालरोग तज्ञा कडे घेवून गेले तेंव्हा त्या तज्ञांनी पहिला आणि योग्य प्रश्न विचारला " कुठले औषध दिले होते ? वडील पळत परत या डॉक्टरांकडे आले आणि त्यांना बालरोग तज्ञा कडे घेवून गेले … dantist ना परिस्थिती चे गांभीर्य नसावे का ?

४. बालरोग तज्ञा नि परिस्थिती चे गांभीर्य ओळखून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला घेवून जाण्याचा सल्ला दिला , पण तिथे जाई पर्यंत खूपच उशीर झाला होता

५. अशी आणीबाणी ची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव खरेच त्या डॉक्टर ना आहे का ?

६. Indian Dentist Association ने डॉक्टर ना पाठींबा देवून , एक पत्र माध्यमांना लिहिले …. त्यात त्यांनी डॉक्टर ना जवळ पास क्लीन चीट दिली . यात मुख्य दोन  प्रश्न - शवविच्छेदना  चा अहवाल येण्या पूर्वी अशी क्लीन चीट देणे योग्य आहे का?  दुसरा महत्वाचा प्रश्न…. IDA ला क्लीन चीट देण्याचा अधिकार खरेच आहे का ?

हा सगळा प्रकार म्हणजे आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय असाच म्हणावा लागेल

रेवतकर कुटुंबीय प्रचंड दुखा:त  असताना पण  त्यांनी डॉक्टर च्या  हलगर्जी पणाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला आणि काकडे सिटी रहिवास्यानी त्याला पाठींबा देवून social media चा योग्य वापर करून Candle March यशस्वी केला.
यातून काय साध्य होतेय ते येणारा काळच ठरवेल ,

सानवी च्या आई वडिलांचे दुख: खूप मोठे आहे … ती तर परत येणार नाही  पण अशी दुर्दैवी वेळ अजून कोणावर येऊ नये हीच प्रार्थना

आम्हा काकडे सिटी वासियांना या candle march यशाचे श्रेय घेण्याची इच्छा नाही  , खरे तर असा candle march काढावा लागणे  हेच आपले  दुर्दैव …. जेंव्हा अशी वेळ येणार नाही तो खरा  "सुदिन"

ईश्वर सानवी च्या आत्म्याला सद्गती देवो आणि आई वडिलांना दुख:सहन करायचे बळ देवो हीच प्रार्थना !  


बिपीन कुलकर्णी