Wednesday, June 12, 2013

माणसे अशी का वागतात?

माणसे अशी का वागतात?                                               १२  जून २०१३ 

 

मनुष्य स्वभाव हे विचित्र रसायन, तो कुठल्या वेळेस कसा वागेल हे ब्रम्हदेव पण सागू शकणार नाही..हा अनुभव प्रत्तेकाला येतच असतो.  पु चे एक सुंदर वाक्य आहे "जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही"

पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यावर त्याला भारताने आर्थिक मदत द्यावी ह्याकरीता महात्मा गांधीजी उपोषणास का बसले? स्वतंत्र राष्ट्र देणे पुरेसे नव्हते का? नेहरू किंवा सरदार पटेल  हे शेवट पर्यंत जाणू  शकले नाहीत !!
ह्याला हेकेखोर स्वभाव म्हणायचे का ? कदाचित हो किंवा नाही, कारण प्रत्तेक शाश्वत गोष्टीला दोन बाजू असतात, इथे महात्मा गांधी वागले ते चूक का बरोबर हा प्रश्न नाही तर आपण ज्या बाजूने बघतो तसा आपण समोरच्या मनुष्याचा स्वभाव ठरवत असतो.
गांधीजी आणि पाकिस्तान हे एक उदाहरण, पण आपल्या रोजच्या जीवनात असे घडतच असते ना?
स्वभावाला औषध नसते असे म्हणतात " पण "लग्न"किंवा "यश" ह्या दोन गोष्टीं मुळे स्वभाव बदलल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. लग्न हा एकूणच वेगळा विषय त्यावर एक वेगळा लेख होऊ शकतो, पण यशाच्या बाबतीत बोलायचे तर त्याची व्याख्या प्रत्तेकाची वेगळी , त्याला प्रमाण असे काही नसते... एखादी व्यक्ती  किंवा त्याचे पालक म्हणतात तेंव्हा तो किंवा ती यशस्वी आणि त्या करिता जे परिणाम लावलेले असतात ते जर दुसर्या जवळ असतील तरी ती दुसरी व्यक्ती त्यांच्या दृष्टीने सामान्य !!
अशा लोकांची काही कमी नाही - "आपला तो बाळ्या आणि दुसर्याचा तो कार्ट्या"
"यश मिळवण्या पेक्षा ते टिकविणे अवघड आहे"  यश म्हणजे जर पैसा, गाडी, बंगला, पाच आकडी पगार एवढेच असेल तर ते क्षणिक आहे ती जी नियती आहे  हातात दंडुका घेवून बसलेली असते तिचा फटका बसतो तेंव्हा आवाज येत नाही पण हादरा नक्कीच बसतो.
लोकांच्या आनंदात किंवा कौतुकात भागीदार होण्या करिता जे मनाचे मोठेपण लागते ते किती जणांकडे खरेच असते?
सर्कशीतील विदुषकाने कायम आपल्याला हसवायला पाहिजे अशी अपेक्षा असते, विदुषक पण कधी तरी थकत असेल ना ?  त्याच्या पण प्रेक्षका कडून काही अपेक्षा असतीलच ना.  आयुष्यातील प्रत्तेक क्षणाला आपण एक तर विदुषक तरी असतो किंवा प्रेक्षक!
भिडस्थ स्वभावाची व्यक्ती नकळत विदुषक बनते आणि स्वार्थी अर्थात प्रेक्षक!
 रस्त्यावरचा डोंबारी असेल किंवा सारेगमा ची पल्लवी जोशी त्यांना पण प्रेक्षकांना टाळ्या मागाव्या लागतातअसेच आयुष्यात होत असते ना…  केलेल्या प्रत्तेक गोष्टीच्या कौतुकाची पावती मिळविण्या करिता आपल्याला झगडावे लागतेच नाआयुष्य आणि झगडा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू …पण त्या वेळेस कशा करिता आणि कोणाशी झगडतोय हे फार महत्वाचे. 
मुख्यतः प्रकारचे मनुष्य स्वभाव आहेत,

1) Mine is Mine and Yours is Your
2) Mine is Yours and Yours is Mine
3) Mine is Yours and Yours is Yours
4) Yours is Mine and Mine is Mine

प्रत्तेक वळणावर घरात,बाहेर, समजात नोकरीत सगळीकडे आपल्याला असे लोक भेटत असतात...
प्रत्तेकाला वापरून घेणे हा पण एक स्वभाव , त्याच वेळेस दुसर्याला सर्वस्व देणे हा पण स्वभाव आहे.
                        
                         देणार्याने देत जावे...घेणार्याने घेत जावे..
             घेता घेता एक दिवस...देणार्याचे हात घ्यावेत....”

           
अशा वेळेस काही गेले याचे दुख: नसते तर आपण वापरले गेलो याची सल सगळ्यात जास्त असते. 
आपल्या समाजात ढोंगी किंवा नाटकी पणाचा  बुरखा पांघरून वावरणाऱ्या लोकांची काही कमी नाही
पोथी पुराणाचे कर्मकांड किंवा अध्यात्म्याच्या गप्पा करणाऱ्या प्रत्तेक व्यक्तीला खरेच अध्यात्म समजलेले असते का?
रंगपंचमी च्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या तथाकथित अध्यात्म गुरू च्या स्वभावाला  काय म्हणायचे ? हे तर एक उदाहरण झाले पण असे दांभिक कितीतरी लोक आपल्याला रोज भेटतातच ना
शिवाजी आमचे , टिळक तुमचे , आंबेडकर त्यांचे अशी विभागणी करणाऱ्या लोकांच्या स्वभावाला काय म्हणायचे ?
ढोंगी हा जसा स्वभाव तसाच नाटकी हा दुसरा स्वभाव! मांजर जेंव्हा डोळे बंद करून दूध पिते तेंव्हा तिला वाटत असते तिला कोणी पाहत नाही, तसेच या लोकांचे, लोकांना फसविल्याच्या भ्रमात असतात, आपण त्यांना याची जाणीव देत नाही हे आपले संस्कार म्हणा किंवा आपल्या मनाचा मोठे पणा.
सल्ला हा देण्या करिता असतो तसाच तो घेण्या करिता पण असतो, असे काही लोकांना खरेच सांगावे वाटते, कारण हि मंडळी ज्यांना सल्ला द्यायचा त्यांना अधिकार आणि त्याहून जास्त गरज आहे तिथे यांचे "मंत्र बोध" होतात, आपण गप्प राहून सहन करतो कारण आपला स्वभाव आणि संस्कार आडवे येतात
बिरबलाच्या गोष्टीत  " घोडा का अडला ?" "भाकरी का करपली?" याचे उत्तर जसे   " फिरविल्या मुळे" आहे तसेच, " माणसे अशी का वागतात ? " याचे पण तेच उत्तर असू शकते.

“Everyone is a moon, and has a dark side which he never shows to anybody.”
Mark Twain


 

बिपीन कुलकर्णी