Monday, March 6, 2017

एका तळ्यांत होती बदके पिले सुरेख....

एका तळ्यांत होती बदके पिले सुरेख....                                                           ६ मार्च २०१७

मागच्या आठवड्यात नेहमी प्रमाणे दिल्ली ला गेलो होतो , नेहमीची एक दोन हॉटेल्स मिळाल्या मुळे गुरगांव मधील  " लेमन ट्री " मध्ये राहावे लागले ...

योगायोगाने या हॉटेल मध्ये अशा लोकांना भेटलो आणि नंतर  आपण किती  क्षुद्र आहोत अशी भावना आली…..माणिक आणि सौरभ ... २३ आणि १९ वर्षाची चुणचुणीत मुले ... हॉटेल च्या रेस्टॉरंट विभागात कामाला ... सकाळी ब्रेकफास्ट करताना नजरेस पडले ... त्यांची शारीरिक हालचाल थोडीशी वेगळी वाटली म्हणून नीट निरखून पाहिले आणि मी उडालोच !!

ती होती " विशेष मुले "

त्या नंतर हॉटेल मॅनेजर ला या मुलां बद्दल विचारले आणि त्याने जी माहिती सांगितली ती ऐकून नतमस्तक झालो ...
दिल्ली मध्येमुस्कान” नावाची संस्था या विशेष मुलांना स्वावलंबी करण्या करिता काम करते, श्री सुरेंदर सिंग नावाचे या संस्थेचे मॅनेजर योगायोगाने तिथेच भेटले , मग त्यांच्याशी पण बोलणे झालेमुस्कान संस्थेत सध्या ९० अशी मुले आहेत , आणि ते लोक सध्या या मुलांना हॉटेल इंडस्ट्री करिता प्रशिक्षण देत आहेत , लेमन ट्री हॉटेल ने दिल्ली मधील प्रत्येक हॉटेल मध्ये या मुलांना नोकरी दिली आहे...

हि मुले शिफ्ट मध्ये काम करतात ... सकाळी ते आणि १२ ते .... सध्या हाऊस किपींग आणि रेस्टॉरंट विभागात अतिशय व्यवस्थित कामे करतात ....
मी राहिलेल्या हॉटेल मध्ये सध्या मुले आणि मुलगी आहेत कामाला ...

मुस्कान ची टीम याना ट्रेन करते आणि नंतर हॉटेल मॅनेजमेंट रीतसर मुलाखती घेऊन त्यांची नेमणूक करते, पहिले महिने Stipand  आणि नंतर बाकी स्टाफ इतकाच पगार दिला जातो , या मुलांचा पण Quarterly Review होतो .... आणि यात हि मुले कुठेही कमी पडत नाहीत ....
Perfromance अथवा शिस्ती च्या कारणा मुळे नोकरी गमावल्याचे  आज पर्यंत उदाहरण नाही ... हि मुले त्या बाबतीत एक पाऊल पुढेच आहेत , याचे कारण बाकी मुलां सारखे  अंतर्गत राजकारण , ताणतणाव , स्पर्धा  अशा सगळया गोष्टी पासून ते चार हात लांबच आहेत.

मुस्कान आणि लेमन ट्री मॅनेजमेंट पुढे जाऊन या मुलांना वेग वेगळ्या विभागात काम देण्या करिता मेहनत घेत आहेत , त्यांच्या दृष्टीने हॉटेल मधील Billing , Menu सांगणे आणि Front Desk सोडले तर बाकी सगळी कामे यांच्या कडून होऊ शकतात ...

केव्हढा हा   विश्वास !! या मुलांना तरी दुसरे काय हवे आहे ....

मी भेटलेल्या पैकी सौरभ चा IQ आहे ५५ आणि माणिक चा ६० .... एकूण त्यांचे राहणीमान , वागणे पाहून खरेच कौतुक वाटले .... तारांकित हॉटेल्स चे Etiquette यांनी फारच छान आत्मसात केले आहेत,

घरून हॉटेल्स पर्यंत नेण्या आणण्याची जबादारी पालकांची बाकी सर्व काळजी हॉटेल मॅनेजमेंट घेते .... Hats Off to them!!

या मुलांना आत्मसन्मानाने जगायची संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुस्कान संस्थेला आणि लेमन ट्री मॅनेजमेंट ला दंडवत !!!

“एका तळ्यांत होती बदके पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले , भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक


- बिपीन कुलकर्णी