Wednesday, October 5, 2011

शापित वादक!!!!

शापित वादक!!!!

आमचा मनोज गेला...जाऊन आता ९ तारखेला २ वर्षे होतील!!!!
मृत्यू लेख लिहण्याची वेळ कोणावर येऊ नये , हे लेख लिहिणार्याचे समाधान करतात पण लेख वाचून गेलेल्या माणसाच्या कुटुंबां च्या दुखावरची ची खपली काढतात
मनोजमन्याकोणाचा काकामामा आणि त्याच्या एकुलत्या पाच वर्षाच्या लेकीचा बाबा....   खरे तर तो हयात असताना भर भरून  लिहावे असे व्यक्तीमत्वपण कधी वाटलेच नव्हते कि असे काही होईल आणि आपल्यावर  मृत्यू लेख लिहायची वेळ येईल... 
४१ हे काय जाण्याचे वय ? पण येवढ्या कमी वयात त्याने जी कर्तुत्वाची उंची गाठली होती त्याला तोड नाही?
औरंगाबाद संगीत विश्वा ला माहिती असलेले नाव...मनोज जहागीरदार...ज्यांच्या गिटार वादनाने भले भले मंत्रमुग्ध झाले तो मनोज.त्यात औरंगाबाद चे  स्थानिक कलाकार तर आहेतचतसेच   अगदी सुरेश वाडकरा पासून उषा मंगेशकरा पर्यंत सगळ्या प्रथित यश कलाकारांनी भर भरून कौतुक केलेले नाव..त्याचे यश हे थक्क करून सोडणारे आहे...पंढरपूरला वडिलांच्या नौकरी मूळे  जातात काय, आणि तिथे नियतीचा घाला बसतो आणि पितृ छत्र हरपते...त्या वेळेस मनोज आणि भावंडे मोठा मिलिंद आणि लहान महेंद्र...मनोज चे वय असेल १६ वर्षे, पण त्याच पंढरपुरा मध्ये कोणा मित्रा  कडून बुलबुल तरंग शिकलेले असते, पंढरपुरात असताना सकाळ संध्याकाळ विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची सवय, त्या मुळेच कदाचित त्या विठ्ठलाने याच्या बोटात जादू घातली आणि मराठवाडा संगीत विश्वाला नकळत पणे मनोज रुपी देणगी दिली  
हे सगळे यश स्वतःच्या मेहनतीवर तर मिळवलेच पण त्याच वेळी आईचे म्हणजे अक्कांचे आशीर्वाद पाठीशी होते, त्या माउली ने वडिलांच्या पाठीमागे नोकरी करून मुलांना नुसते वाढवलेच नाही तर योग्य संस्कार केले, त्या मुळे हि मूले कलाकारा  पेक्षा माणूस म्हणून मोठी  झाली ...मुलांनी पण आई ने केलेल्या कष्टाची जाणीव  ठेवलीअक्कांच्या नोकरी च्या शेवटच्या दिवशी मिरवणूक काढून वाजत गाजत घरी आणणारी हीच मूले!!! अक्का धन्य झाल्या नसतील तर नवल?
तसे म्हंटले तर लहान पणा पासून मनोज अभ्यासात हुशार, शिक्षण म्हणाल तर M Sc - इलेक्ट्रोनिक्स, नोकरी Opthalmology खात्यात, आणि नाव कमावले गिटार वादनात, म्हणजे बघा या प्रत्तेक गोष्टीचा एक दुसर्याशी आर्था अर्थी संबंध नाही, पण याचा अर्थ असा पण नाही गिटार वादना मूळे नोकरी कडे दुर्लक्ष केले...जव्हार सारख्या आड वळणाच्या ठिकाणी बरेच वर्ष नोकरी केली, वरिष्ठ डॉक्टरांच्या बरोबर eye surgery camps घेत बरीच खेडी पालथी घातली....पण हे सगळे करत असताना सुट्टीच्या दिवशी गिटार चे कार्यक्रम होतच होते, या सगळ्या मध्ये खूप ओढाताण होत होती, एक वेळ अशी आली नोकरी का गिटारपण नंतर औरंगाबाद च्या जवळ बदली झाल्या मूळे आपोआप त्यातून मार्ग निघाला.. 
गिटार कडे तो कसा आणि कधी वळला ते मला थोडे फार आठवते!! त्या वेळी कुठल्यश्या कार्यक्रमात त्यांनी स्थानिक कलाकाराला गिटार वाजवताना पहिले आणि मनाशी ठरवले गिटार शिकायचे...मग त्या नंतर सुरु झाली गिटार शिकण्यची धडपड!!! प्रथम अक्कांच्या मागे लागून विकत घेतलेले गिटार, नंतर तासन तास त्या वर बसून घेतलेली मेहनत, त्या नंतर मुंबई ला जाऊन तिथे राहून गुरु कडून घेतलेले शास्त्रोक्त शिक्षण....माझ्या माहिती प्रमाणे त्याचा एकूण गिटार वादनाचा काळ जवळ पास २० वर्षाचा असेल, या २० वर्षात गिटार वादनाचे किती कार्यक्रम केले याची खरेच गणती नाही, आणि मला नाही वाटत त्याने पण रेकॉर्ड ठेवले असेल ....
हे एवढे सगळे असून मनोज चा स्वभाव अतिशय शांतभोळा आणि भिडस्थ....कोणी कौतुक केले तरी लाजून जाणारा...सतत पाय जमिनीवर!!!
शेवटच्या काही दिवसात मनोज आध्यात्मा कडे पण खूप वळला होता, आई हे तर आयुष्यभर दैवत होतेच पण त्याच बरोबर तो देवभक्त होता, प्रत्तेक दिवशी ठरलेल्या देव दर्शनाला चुकता जाणे, कार्यक्रमच्या ठिकाणी आधी मंदिर शोधणे या त्याच्या आयुष्यातील नित्य गोष्टी झाल्या होत्या...
नियती का रुसली त्याच्या वर  आणि कुटुंबावर हे खरेच समजू शकत नाही ? हे कुटुंब एवढे सगळे आनंदात असताना, स्वाईन फ्लू चे कारण व्हावे काय आणि त्याचा बळी जावा काय..सगळेच मनाला पटणारे, पण आता सत्य मानण्या शिवाय पर्याय नाही...
पण अजूनही समजत नाही नोकरी मूळे सतत आजूबाजूला डॉक्टर्स असूनही कोणालाही स्वाईन फ्लू ची कल्पना येऊ नाही, आणि जेवां यावी  तेंवा खूप उशीर झाला असावा या सारखे दुसरे दुर्देव काय असावे!!!