माननिय देवेन्द्रजी ,
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल
प्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन !!
१९६० ला भाषावार प्रांत रचनेत , १०४ हुतात्म्यांच्या घराची होळी होऊन मुंबई सहीत महाराष्ट्राची
निर्मिती झाली ... यशवंतराव मंगल कलश घेऊन
आले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले .. त्या नंतर आज पर्यंत या
महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले .. यशवंतरावांचे एक वाक्य होते “ जी जाता
जात नाही ती जात “
१९६० ते २०१८ म्हणजे गेल्या ४८ वर्षात
यशवंतरावांचे अनुयायी म्हणणारे पुढारी
किंवा मानसपुत्रांनी ते शब्द खरे करत ती जात काही जाऊ दिली नाही ..
आज पर्यंत या महाराष्ट्राने अनेक मराठा
मुख्यमंत्री पाहिलेच , बरोबरीने
मुस्लिम, वंजारा
, मागासवर्गीय असे सगळे मुख्यमंत्री पाहिले
... त्या वेळेस महाराष्ट्राची जनता या सर्व नेत्यांना फक्त मराठी या दृष्टिकोनातून पाहात होती ...
तुमच्या मुळे मुख्यमंत्र्याला जात असते
हे जनतेला कळाले .. पुरोगामी मंडळी येता
जाता फक्त तुमच्या जातीवर जात होते ..याला
कारण यांचे बेगडी पुरोगामीत्व .. मतां
करिता टोपी किंवा पगडी फिरवताना कसलाही विधिनिषेध
न बाळगणारी ही मंडळी , तुमच्या
जाती वर आली नसती तरच नवल होते ?
राजकारण हा एक खेळ आहे आणि प्रत्येक
खेळाचे काही अलिखित नियम असतात .. असे असूनही आज पर्यंत झाली नाही एव्हढी चर्चा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांच्या जातीची आणि बरोबरीने त्यांच्या पत्नी ची चर्चा
झाली .. नुसती चर्चा झाली तरी ठीक होते .. पण पत्नी बद्दल अपशब्द काढले गेले
तेंव्हा पुरोगामी मंडळी मिठाची गुळणी घेऊन बसले होते ..मुख्यमंत्र्यांची पत्नी प्रथम स्त्री आणि मग ब्राम्हण आहेत यांची साधी जाणीव काकासाहेब मंडळीना नसावी का ?
छोट्या छोट्या गोष्टीवर प्रगल्भ विचार मांडणाऱ्या
जाणत्या राजाला का नाही चिंता वाटली या विषयाची
?
अर्थात हेच प्रश्न तुमच्याही मनात असतीलच
...
आपली एक गोष्ट आम्हाला आवडते .. ती
म्हणजे आपण या असल्या गोष्टींना कधीच भीक घालत नाह ...कदाचित हीच मोठी पोटदुखी
असेल या मंडळींची ... आपल्या संस्कारा मुळे आपले
असे विचार असावेत का !!! तसे
पाहता बाकी विरोधक पण खूप सुशिक्षित आहेत .. पण त्यातले सुसंस्कृत कीती हा शोधा चा
विषय ..जातीचा आणि सुसंस्कृत पणाचा अजिबात सबंध नसतो ...या महाराष्ट्रात आपल्या सारखे अजून काही
सुसंस्कृत मुख्यमंत्री होऊन गेले ...ती
मंडळी ज्या पक्षाची होती ते खरे म्हणजे भांगेतील
तुळस .. असे लोक त्यांना परवडणारे नव्हते
... मग मामासाहेबा पुढे टिकाव एकूण अवघडच होता .. काय झाले या मंडळींचे ?
... कधी विजन वासात पाठवले , कधी धोका देऊन स्वतः मुख्यमंत्री झाले ...एकूण ती पाण्याविणा होणारी
माश्याची तडफड होती !!
असो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित
असतीलच ..खरे तर या लोकांनी तुम्हाला under
dog ठरवले होते , पण तुम्ही पुरून उरलात .. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलात तुमचे खूप
खूप अभिंनदन !! मराठा समाजाची परिस्थिती गावा गावात बिकट आहे .. अर्थात मुठ भर
राजकरणी यातुन बाजूला काढायला हवेत .. ज्यांची हयात सहकारी , शिक्षण संस्था लुटण्यात गेली ते लोक काय समाजाचे दुःख समजतील ?
हा निर्णय घेण्या करता कुठली जात नव्हे तर
संवेदनशीलता असावी लागते ... आणि ते येते तुम्ही कसे आणि कुठे वाढता त्यातून ...
परत एकदा अभिनंदन !! आणि हो 2019 करता आत्ताच शुभेच्छा !! २०१९ च्या चिंतेचे अजिबात कारण नाही ...
कारण आपले कै अनंतराव भालेराव म्हणाले होते ना "
खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा कसा अडविणार ?"
आपला
बिपीन कुलकर्णी
No comments:
Post a Comment