या चित्रपटावर बरेच काही लिहिले आहे,
खरे तर एक सिनेकलाकृती म्हणुन अतिशय उत्कृष्ट
चित्रपट ...सुबोध भावे आणि इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय खरेच लाजवाब ...
काशिनाथ घाणेकर यांना रंगभुमीवर माझ्या
पिढीने पहिले नाही ...चित्रपट पहिल्या नंतर
आपण त्यांची नाटके पाहू शकलो नाही म्हणजे फार काही गमावले अशी खंत नक्कीच
वाटली नाही.
फार पूर्वी कांचन घाणेकरांचे "नाथ
हा माझा " वाचले होते , त्यांनी
लिहिलेल्या चरित्रावर हा चित्रपट बेतला आहे , त्या मुळे चित्रपटाबद्दल थोडी कल्पना होती ...
काशिनाथ घाणेकर म्हणजे " मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपर स्टार
ची शोकांतिका ...इतरांच्या शोकांतिकेत रमायला एकूणच आवडते आम्हाला ..
कमालीची
लहरी वृत्ती , रंगेल
स्वभाव , यश मिळाल्यावर मदिरा आणि मदिराक्षी
म्हणजेच आयुष्य झालेले ... फक्त स्वतः वर
प्रेम करण्याची वृत्ती ..
अशा परिस्थितीत शेवट शोकांतिकेत झाला नसता तरच नवल होते ...
दारू च्या आहारी जाऊन "
लाल्या" च्या भूमिकेत गारंबीच्या बापू चे किंवा आनंदी गोपाळ चे संवाद
प्रेक्षक कसे आणि किती काळ सहन करतील?
कलाकार प्रेक्षकांना उत्तरदायी असतात याची जाणीव
असलेला कलाकार असा वागू नाही शकत ...मायबाप प्रेक्षकांशी केलेली प्रतारणा
कुठल्याही कलाकाराला रसातळाला नेते ...
नीती अनीती च्या मर्यादा ओलांडल्या कि
असे होणारच ...
कलाकाराला मिळणारी टाळी हा जसा शाप असतो ... तसेच त्या शापाला स्वभावातील
नम्रता किंवा लीनता हा उशाप : असतो ...
पहिल्या पत्नी वर केलेला अन्याय ,
स्वतः च्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी
केलेला विवाह , लहान वयात लेकीला आलेले पोरके पण ...
लागु पर्व सुरु झाल्यावर स्वतः चे
अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड ... ह्यात स्वतः चे अपयश सहन करू न शकलेला एक
कलाकार दिसतो ...
पणशीकर अर्थात पंतां सारख्या मित्राने
दिलेली साथ न समजता स्वतः च्या विश्वात मश्गुल असेलेला एक बेफिकीर माणूस दिसतो ..
ह्या सगळया गोष्टी त्यांचे मातीचे पाय
दाखवितात.. एकूणच त्यांच्या बद्दल
सहानभूती नक्कीच वाटत नाही ...मग झालेल्या शोकांतिकेला नक्की जबाबदार कोण ?
या चित्रपटात भालजीं च्या तोंडी एक वाक्य
आहे " काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्यांची सरमिसळ " हे खरेच होते ...
प्रेक्षका करता पण ती धान्याची सरमिसळ होती ...कोणाला त्यांचे राजबिंडे रूप आवडले
तर काहींना लहरी स्वभाव , कोणी त्यांच्या बेफिकिरी चे चाहते होते...तर कोणी त्यांच्या सिनेमाचे
... कदाचित मला त्या धान्यातले खडेच जास्त दिसले असावेत...
चित्रपट आणि कलाकार उत्कृष्ट त्या बाबतीत
दुमत नाही .. पण ह्या बायोपिक ची खरेच गरज
होती का ? हा माझ्या मनातला प्रश्न...
कदाचित आजच्या कलाकारानं करीता यश
मिळाल्यावर कसे वागु नये याचा वस्तुपाठ हा चित्रपट ठरू शकतो ....
- बिपीन कुलकर्णी
No comments:
Post a Comment