अकबराची गांधीगिरी ..
अकबर बिरबल गोष्टीतील अकबराचे संस्थान केंव्हाच खालसा झाले होते , अकबराने पोटापाण्याच्या सोयी करता व्यवसाय सुरु केला होता , आता तो देशो देशी शाखा असलेल्या एका मोठ्या बिझिनेस हाऊस चा मालक आणि चेअरमन होता आता इंग्लिश नाव घेतले होते त्याने मिस्टर अक्की...आणि बिरबल मिस्टर बॅरी अर्थात कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO. ...आणि मिस रॉनी होती HR प्रमुख ...
मनुष्य स्वभाव बदलणे सोपे नसते ... त्या मुळे मी. अक्की ची भूमिका बदलली तरी स्वभावातला विचित्र पणा तसाच होता .
बोर्ड मिटिंग मध्ये सगळे विभाग प्रमुख पुढच्या तीन महिन्याचे प्लॅन्स बादशहा म्हणजे चेअरमन ला प्रेझेंट करीत होते ... मिस रॉनी चे प्रेझेन्टेशन जेंव्हा सुरु झाले , तेंव्हा अक्की च्या चेहरयावर वर चे रंग बदलले , बॅरी शेजारी बसला होता , त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की " आज चेअरमन कूछ तुफानी करने वाला है "
बॅरी पुढच्या येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी करू लागला,
बादशहाने रॉनी ला मधेच थांबवून विचारले
" आपल्या कंपनी कल्चर बद्दल लोकांचे काय मत आहे "
" सर कल्चर च्या बाबतीत भारतातील पहिल्या काही कँम्पनीन पैकी एक आपली कंपनी आहे " रॉनी HR च्या भूमिकेत पुटपुटली , आणि तिने हळूच बॅरी कडे पहिले , बॅरी नुसते हसला ..
" नाही मी समाधानी नाही या बाबतीत " अक्की म्हणाला
" सर आपल्या मनात नक्की काय आहे ? काय अपेक्षा आहेत आपल्या ?"
" आपण जरी बहुराष्ट्रीय झालो तरी मूळ भारतातले आहोत , म्हणून मला कल्चर वेगळे हवे आहे ... माझ्या डोक्यात थोड्या वेगळ्या कल्पना आहेत " अक्की म्हणाला .
" मी. अक्की काय आहे आपल्या मनात ?' बॅरी म्हणाला
" बॅरी आणि रॉनी , नीट ऐका मी काय सांगतो , आपल्या राष्ट्रपित्याची दीडशेवी जयंती या वर्षी आपण साजरी करीत आहोत , तर मला असे वाटते आपल्या समूहात आपण गान्धीवाद रुजवावा "
रॉनी आणि बॅरी हे समजण्याच्या पलीकडे गेले होते ..
" आपल्याला गांधीवाद म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ?" इति बॅरी
" सी बॅरी , स्वावलंबन , अहिंसा , सत्याग्रह , शाकाहार , सत्याचे आचरण , साधी राहणी आणि ब्रम्हचर्य हे कल्चर आणावे लागेल "
" मी. अक्की बाकी ठीक , पण ब्रम्हचर्याचा आणि आपल्या कम्पनी कल्चर चा काय सम्बंध ? लोकं आपल्या समुहा बद्दल उगाच गैरसमज करून घेतील " आणि त्याला रॉनी ने पण दुजोरा दिला.
अक्की ने नाईलाजाने ब्रम्हचाऱ्याला कल्चरल पॉलिसी मधुन वगळायला परवानगी दिली.
आणि नवीन पॉलिसी आणायच्या सूचना दिल्या ..
दुसऱ्या दिवशी पासून रॉनी आणि टीम ने नवीन पॉलीसी अमलात आणली.
सकाळच्या बायोमेट्रिक हजेरी नंतर प्रार्थना सुरु झाली...
कॅन्टीन मध्ये शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण सुरु झाले..
सुटा बुटात येणारे अधिकारी , बंडी पायजमा घालुन येऊ लागले...
वर्कर च्या जागी हरी सेवक हा शब्द आला...
चरखा नसल्या मुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला रोज किमान एक तास तरी फोटो कॉपीअर मशीन चालवावे लागे...
रॉनी आणि टीम ने .. शेळीच्या दुधाचा चहा आणि कोफी देण्या करता खूप प्रयत्न केला .. पण ते शक्य झाले नाही ..
चहा कोफी मशीन अडगळीत गेले , कर्मचाऱ्यांना सकाळ दुपार दूध देणे सुरु झाले.
लोकांनी सत्य बोलावे आणि अहिंसा स्वीकारावी या करता प्रयत्न सुरु झाले.
बॅरी तसा हुशार ... या सगळ्या घडामोडी तो दुरून पहात होता ... विरोध अजिबात करीत नव्हता. यांचे परिणाम काय होणार हे तो जाणून तेंव्हाची परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करीत होता ...
महिन्याच्या रिव्यू मिटींग्स होत होत्या ...
त्यात लोक बंडी पायजमा घालुन .. अतिशय मृदू आवाजात .. दूध पीत चर्चा करीत असत.
असे होता होता सहा महिने झाले ...
कंपनी चे अर्ध्या वर्षाचे निकाल बाहेर आले ...जे बॅरी ला अपेक्षित होते तसेच झाले ...budget vs actual मध्ये प्रचंड फरक होता ...
अर्थात अक्की नाराज होता ..आतून प्रचंड चिडला होता ... पण नवीन कल्चर मध्ये चिडणे योग्य नव्हते .. मृदू आवाजात आपल्या भावना पोहोचवणार तरी कशा ?
त्याने बॅरी कडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले .. कारण बॅरी त्यातून मार्ग काढेल अशी खात्री होती ,,,,
बॅरी ने बोर्ड मेम्बर कडे एकदा कटाक्ष टाकला आणि बोलायला सुरुवात केली ..
मिस्टर अक्की आणि मान्यवर मंडळी , आपले अर्ध्या वर्षाचे निकाल पाहून .. हे असे का झाले याचा विचार करणे आज गरजेचे आहे , नसता खूप उशीर झालेला असेल ...
मी.अक्की च्या इचछे मुळे आपण कल्चर बदलण्याचा प्रयत्न केला , महात्माजी महान होते , त्यांच्या pirnciples चा आपण आपल्या सोयीने अर्थ लावत कल्चर बदलण्याच्या नावाखाली कम्पनी मध्ये विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम राबविला...अहिंसे च्या नावाखाली कर्मचारी विभाग प्रमुखाला उलट उत्तरे द्यायला लागली , स्वावलंबना मुळे कोणी कुठले काम करायचे याला धरबंध राहिला नाही ... सेल्स चे लोक बंडी पायजमा घालून नवीन बिझिनेस आणायला गेल्यावर त्यांना कोणी महत्व दिले नाही ...सकाळ दुपार दूध पिउन आणि पौष्टिक खाऊन कर्मचारी वर्ग सुस्तावला ...
वेळ झाली कि महत्वाची कामे सोडून लोक फोटोकॉपीअर कडे आणि प्रार्थनेला धावायला लागली ...
मग कसे results येतील ? हा गांधीवाद आहे का गांधीगिरि ??
त्या महात्म्याला तरी हे अपेक्षित होते का ? त्यांची तत्वे कळाली नाही म्हणून का आपल्या सोयीने अर्थ लावायचा ?
महान माणसे ज्या काही गोष्टी अंगिकारतात ती त्या काळाची गरज असते ?
साधी राहणी म्हणजे का बंडी पायजमाच घालायला हवा ?
ते चरखा कातत म्हणून का आपण लोकांना फोटोकॉपीअर वर बसवायचे ?
खरे तर गांधीवाद आत्मसात करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आत्मपरीक्षण , त्या मधुन आपल्या झालेल्या चुकांतून शिकायचे .. मग त्यातून येतो विवेक ... म्हणजेच संयम ... एकदा संयम आला की अहिंसा आपोआप येते ...कोणताही विवेकी माणूस इतरांचा अनादर करीत नाही ... दुसर्यांचा सन्मान करणे ...त्याची लायकी न ठरवणे हा खरा गान्धीवाद ..
कंपनी चे नुकसान करून आपली तत्वे अंगिकारा असे कधीच बापू म्हणाले नाहीत ना ...
बॅरी ने बोलणे सम्पविले ..
अक्की काय ते उमजला ..
रॉनी परत कामाला लागली ... परत जुनी पॉलिसी सगळ्या कर्मचाऱ्यात फिरवली ..
आणि परत जुने दिवस सुरु झाले ....
बिपीन कुलकर्णी

No comments:
Post a Comment