Local
Guardian 23
Nov 2017
आज असेच अचानक एक
वाचलेले वाक्य आठवले आणि विचारचक्र सुरु
झाले ..... ते वाक्य होते…..
" आयुष्यात
तुम्ही किती आनंदी आहात
हे महत्वाचे नाही पण तुमच्या
मुळे किती लोक आनंदात
आहेत याला महत्व आहे
"
वाचल्यावर विचार आला
, मी किती जणांना आनंद दिला हे मला तरी
माहिती नाही पण मला आनंद दिलेल्या अनेक व्यक्ती
डोळ्या समोर आल्या आणि एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण झाली... कारण आजची ती उत्सव मूर्ती
... म्हणजेच आज तिचा वाढदिवस !!!
समाजाच्या
दृष्टीने मी यशस्वी असेल
किंवा नसेल , पण स्वतः विचार
केला तर नक्कीच सुखी
समाधानी आणि आनंदी आहे
... ह्या माझ्या आनंदाला जे अनेक अद्रुष्य हात
लागलेत त्यातील एक महत्वाचा हात
नक्कीच तिचा ...
नात्याने म्हणायचे
तर माझी मामे बहीण.... अंजली मेढेकर सुराणा !! माझ्या करिता नुसतीच बहीण आहे का ती?
नक्कीच नाही .... इंग्लिश मध्ये म्हणतात तसे
ती माझी " Local Guardian " ... आज
वयाची चाळीशी मी केंव्हाच ओलांडली .... गेल्या
अनेक वर्षात मी स्वतः अनेक जणांचा local Guardian झालो ... पण ती अजूनही आहे माझी
local guardian !!
२०-२५ वर्षा पूर्वी
जेंव्हा मी नोकरी मध्ये
स्थिर होऊन करिअर
करण्या करता औरंगाबाद ला
धडपडत होतो त्या वेळेस मनात
स्वप्न होते पुण्यात नोकरी
करायची ... त्या वेळेस अंजु
ताई च्या अदृश्य हाताने
मला बोट धरून पुण्यात
आणले .... नुसते आणलेच नाही तर पुण्यात
स्थिरस्थावर केले ...
तिच्या आणि
माझ्या वयात बरेच अंतर... त्या मुळे अजूनही माझा कान धरायचा तिला अधिकार ... असो. …स्वातंत्र्य सैनिक आई वडिलांच्या पोटी
तिचा जन्म झाला ... आई
वडील दोघेही शिक्षक ... त्या मुळे त्यांच्या
तालमीत शालेय आणि नंतर महाविद्यालयीन
शिक्षण औरंगाबाद मध्ये झाले ...एकत्र कुटुंबाबत वाढत होती... दिवस भर भर जात
होते ...
आणि प्रत्येक
मुलीच्या आयुषयात येते ती वेळ आली लग्नाची !!
नातेवाईक
तसेच आई
वडिलांचे मित्र मैत्रिणी आडून पाडून स्थळे
सुचवत होते ... पण हिच्या मनात
वेगळेच विचार चालले होते ,
श्री
पन्नालाल सुराणा म्हणजे समाजवादी साथी ... समाजवादी मंडळी मध्ये भाऊ हे आदराने
घेतले जाणारे नाव ... त्यांच्या पत्नी वीणा ताई !तर भाऊ आणि वीणा
ताई चा मुलगा प्रभास
औरंगाबाद मध्ये शिक्षण घेत सन्मित्र कॉलनी
मध्ये राहत असताना त्यांचे
आणि अंजु चे सूर
जुळले ...
मेढेकर
हे हे पक्के देशस्थ
ऋग्वेदी तर सुराणा हे
जैन मारवाडी ... तो काळ १९८०
चा ... आंतर जातीय विवाहाला आजही पोषक वातावरण नसताना त्या काळची कल्पनाच करू शकत
नाही...
असे
असूनही दोनही कुटुंबांनी या विवाहाला आनंदाने
परवानगी दिली ... कदाचित समाजवादी विचारसरणीचा हा परिणाम असेल
...जाती पाती न मानण्याचे
संस्कार होते दोनही कुटुंबावर
...
प्रभास
इंजिनिअरिंग मधले गोल्ड मेडलिस्ट
... टेल्को मध्ये नोकरी चालू होती...
यथासांग दोघांच्याही
आई वडिलांनी औरंगाबाद मध्ये थाटात नोंदणी पद्धतीने लग्न करून दिले
...
लग्ना
नंतर प्रयेक मध्यम वर्गीयांचा सुरु होतो तसा
भातुकलीचा संसार यांचा सुरु
झाला ,
पुण्या
सारखे नवखे गाव, थोडीशी
उत्साही , किंचित बावरलेली…
भाडोत्री घर , एकट्याचा पगार
... यात होणारी ओढाताण त्यामुळे असेल त्या गोष्टीत
निभावून नेणे, हौशी मौजी ला
मुरड घालणे ... म्हणून
हा भातुकलीचा संसार ....
भाऊ
आणि वीणा ताई चा
समाजकारणा मुळे मोठा गोतावळा
.... घरात सतत पै पाहुणा
.... कधी नातेवाईक तर कधी इतर
कोणी.... आले गेल्याचे करणे
... छोट्या घरात संसार ...
११-११ महिन्याला घर
बदलत राहणे .... जीव मेटाकुटीला येत
नसेल तर नवल ....
आर्थिक
विवंचने मध्ये असताना किंवा
प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही माणसे कशी जोडता, या
वरच संसाराचे भविष्य ठरते .... प्रारब्ध किंवा नियतीचे फासे पडताना या
गोष्टी ना फार मोठं महत्व
असते ...
हळू
हळू परिस्थिती बदलत गेली तिच्या बँकेतली नोकरी
मुळे घरा
ला हातभार लागला , प्रभास
नोकरी मध्ये सर्वोच्य पदावर पोहोचले .... संसारात दोन मुले ... घर
..गाडी ... जावई सगळे सगळे मिळाले
....
माझ्या सारखे
अनेक जण तिच्या कडे राहिले आणि पुढील आयुष्याला निघून गेले... ....
समाजाच्या
दृष्टीने एक सुखी समाधानी
आणि यशस्वी कुटुंब !!!
यशस्वी किंवा
सुखी कुटुंब असे किती सहज पणे मी लिहून गेलो ....
आज ऊन जाऊन सावली आली आहे .... उन्हाचे चटके इतरां करिता इतिहास जमा झालेत
... पण त्या आठवणी त्यांच्या मनात कुठे तरी असणारच ...
प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवा
कोपरा असतो .... तो स्वतः च जपायचा असतो
....किती जरी जपला तरी एखादया बेसावध क्षणी जुने दुःख बाहेर येते ....पण ते
क्षणिक असते ... हे प्रत्येकाच्या बाबतीतच होत असते ...
व पु म्हणतात तसे
संसार ही एक जबाबदारी
असते. त्याचं ओझं व्हायला लागलं
की गंमत जाते ... कदाचित
हे तिला आणि प्रभास
ना माहित असल्या मुळेच
अजूनही संसाराची जबादारी हे दोघे समर्थ
पण सांभाळत आहेत …
रंग
गोरा ... दिसायला पक्की कोकणस्थी पण वागायला पूर्ण
देशस्थी .... ... खरेदीची
प्रचंड आवड ... लक्षमी रोड , मंडई किंवा जुन्या
पुण्याचा आमच्या करता चालता बोलता गूगल
मॅप ...
वाचनाची
. सिनेमा किंवा नाटक पाहण्याची आवड
... स्वयंपाकात साक्षात अन्नपूर्णा....
जितका
चेहरा हसरा तितकाच
बोलका ... पण प्रचंड हळवी ..... बोलता बोलता टचकन डोळ्यात कधी
पाणी येईल सांगता येत
नाही....
माझ्या
प्रत्येक सुख दुःखाच्या परिस्थितीत
कायम बरोबर असणारी अंजु ताई .... तुझा
आज वाढ दिवस .... तुला
उदंड आणि निरोगी आयुष्य
लाभो हीच ईश्वराला प्रार्थना
!!!
- बिपीन
कुलकर्णी
Mama khupch chan
ReplyDeleteBipin Wah kya baat hai...very touching...
ReplyDeleteChan lihila ahes dada👌
ReplyDelete