"बंद सम्राट" २१ नोव्हेंबर २०१७
राजमान्य राजश्री युवराज श्री राहुल गांधींच्या
राज्याभिषेकाची घोषणा काल झाली , ती आज ना उद्या होणारच होती... बातमी वाचल्या नंतर
न कळत एक व्यक्ती डोळ्या समोर आली ...
खरे तर त्यांची जडण घडण समाजवादी विचारसरणी वर
झाली ... आयुष्य भर राजकारण आणि समाज कारण करीत असताना जेव्हढे प्रेम समाजवादा वर केले
तेव्हढेच काँग्रेस आणि गांधी द्वेषा वर राजकारणात पायऱ्या चढत होते. भारतीय राजकारणातील
त्यांचे योगदान विसरून चालणार नाही .....
आज प्रकृती
अस्वस्थे मुळे सक्रिय राजकारणातून दूर झालेत . महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या
राजकारणाचा आढावा घेताना या श्रेष्ठ नेत्याला विसरता येत नाही
पक्ष किंवा पक्षाची भूमिका या विषयवार वाद होऊ शकतो , पण राजकारणातील योगदाना बद्दल नक्कीच नाही !
मातृभाषा तुळू कोकणी ! मध्यम वर्गिय आई वडिलांच्या पोटी ३ जून १९३० ला मंगळूर सारख्या ठिकाणी जन्म, किंग जॉर्ज V हे आईचे दैवत त्या नावा वरून आपल्या मुलाचे नाव ठेवले जॉर्ज …सनातनी किंवा कर्मठ कुटुंब असल्याने आई वडिलाची इच्छा थोरल्या मुलाने धार्मिक शिक्षण घ्यावे, आणि त्या करिता वयाच्या सोळाव्या वर्षी बेंगलोर ला रवानगी , तिथे ३ वर्ष शिक्षण घेतल्या नंतर, काही गोष्टी मनाला न पटल्या मुळे आलेल्या FRUSTRATION चा शेवट शिक्षण सोडण्यात झाला.
तिथून मजल दलमजल करीत स्वारी मुंबई ला आली, सुरुवाती ची काही वर्षे चौपाटी च्या फुटपाथ वर पथारी, दिवस भर मुंबई मध्ये फिरून मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणे आणि हे करीत असताना एखाद्या चांगल्या नौकरी चा पर्याय पाहणे,
रात्री चौपाटी च्या समुद्रा च्या साक्षीने भविष्या ची स्वप्ने पाहणे!!
नोकरी मिळाली ती वर्तमान पत्रात प्रुफ रीडर ची… त्या नोकरी ने त्यांना भविष्याची दारे उघडून दिली कारण प्रुफ रीडर चे काम करीत असताना संपर्कात आले त्या वेळचे नावाजलेले कामगार पुढारी "डिमेलो" आणि त्या नंतर डॉ राम मनोहर लोहिया
या २ व्यक्तींचा आणि त्या नंतर मधु लिमये सारख्यांचा आयुष्यावर पगडा पडला तो कायमचाच…….
डिमेलो यांच्या अचानक निधना नंतर त्यांनी सर्व युनिअन सांभाळत अनेक युनिअन ची भर घातली घातली
इथून प्रवास सुरु झाला तो जॉर्ज ते जॉर्ज फर्नाडीस, एक कामगार पुढारी
ते,बंद सम्राट…७० च्या दशकात ज्यांच्या एकट्याच्या इशार्यावर मुंबई ठप्प व्हायची…
समाजवादी विचाराचा पगडा , राहणी अत्यंत साधी, झब्बा आणि कुडता…प्रत्येक समाजवाद्याच्या गळ्यात असते तशी शबनम! जाड फ्रेम चा चष्मा…. गेल्या ५० - ५५ वर्षात या राहणीत तसा काही फरक पडला नाही…. मग ते कामगार पुढारी असोत किंवा देशाचे संरक्षण मंत्री!!!
समाजवादी विचारा मध्ये व्यक्तिस्तोम नामंजूर आहे, त्या मुळेच समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष व्यक्तीचे माहात्म्य कटाक्षाने टाळतात. डॉ राम मनोहर लोहीयांचा पगडा असलेले जॉर्ज सारखे लोक, आत्म आणि पक्ष्य स्तुती पासून कायम दूर राहिले
जॉर्ज यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, मोहक आहेच, तसेच तळागाळातील कार्यकर्त्या पर्यंत संपर्क आणि लोकांना त्यांच्या बद्दल वाटत असेलेला आपले पणा, त्या मुळेच कदाचित कोणीही सामान्य व्यक्ती त्यांचा उल्लेख एकेरी करू शकतो…
ओघवती भाषा, बेधडक, निर्भयी अन् नि:स्वार्थी वृत्ती या मुळेच ६० - ७० च्या दशकात वेगवेगळ्या कामगार संघटना उभ्या केल्या, त्यात सफाई कामगारा पासून, ते थेट रेल्वे युनिअन पर्यंत …
कामगारांच्या मागणी करिता केलेला १९७४ चा रेल्वे चा संप गाजला…पूर्ण देशातील रेल्वे सेवा जवळ पास ३० दिवस
ठप्प होती… इंदिरा गांधीनि पण जॉर्ज चा धसका घेतला होता , आणि देशावर आणि बाणी लादताना रेल्वे संप हे पण एक मुख्य कारण होते….. याचेच पर्यावसान पुढे त्यांना बडोदा डायनामाईट केस मध्ये अडकवण्यात ... आणि हाता पायात बेड्या घालून अटक करण्यात झाले.
तुळु, कन्नड, मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी
अशा १० भाषा मध्ये ते केवळ संवाद नव्हे तर अस्खलित भाषण करू शकत, मुंबई हि कर्म भूमी म्हणून तुरुंगात असताना मराठी शिकून घेतली.
जायंट किलर शब्द राजकारणात पहिल्यांदा बहुतेक जॉर्ज च्या बाबतीत वापरला गेला , जेंव्हा १९६७ च्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस चे स का पाटील ना दक्षिण मुंबई मध्ये धूळ चारली…त्य काळी स का पाटील हे कॉंग्रेस मध्ये फार मोठे प्रस्थ होते …
पारंपारिक मतदार संघ कायम बिहार मधील मुझफर्पुर… पण निवडणूक वेग वेगळ्या मतदार संघातून लढले कधी मुंबई तर कधी बंगलोर… बरेचदा अपयशाचा सामना करावा लागला… सत्तेची कधीच हाव नसल्या मुळे हार जीत चा तसा काही फरक पडत नव्हता.
एके काळचा बंद सम्राट .... जाईंट किलर ....
माजी उद्योग, रेल्वे आणि संरक्षण मंत्री ...
मा. बाळासाहेबांना एकेरी " बाळ " या नावाने बोलू शकणारे जे काही बोटावर मोजण्या सारखे लोक होते त्या पैकी एक ....
संघ विचार सरणीचा विरोधक ...असे असून पण वाजपेयी च्या सरकार ला पाठिंबा देणारा समाजवादी ... त्याला कारण संघा च्या विरोधा पेक्षा काँग्रेस द्वेष जास्त होता !
आज अल्झायमर आणि पार्किन्सन्स ने त्रस्त , त्यातच
घराच्या लोकांनी त्यांचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले ...
समता पार्टी चे संस्थापक अध्यक्ष , संस्थापक
अध्यक्षाला त्याच्याच पक्षातून बडतर्फ केल्याचे उदाहरण म्हणजे जॉर्ज .....
समाजवादी विचारसरणी इहवादी , त्या मुळे नियती
ईश्वर अशा गोष्टींवर विश्वास नसतो पण एकेकाळच्या ह्या लढवय्या ची
गेल्या काही वर्षात झालेली गलित गात्र
परिस्थिती नियती ची आठवण नक्कीच करून देते
....
त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा !!
-
बिपीन कुलकर्णी
____________________
No comments:
Post a Comment