Tuesday, July 4, 2017

अशीही एक रोजनिशी






"अशीही एक रोजनिशी "                                                                                       4 July 2017

आज सकाळी अंमळ उशिराचच  उठलो , तोंडधुवून नेहमी प्रमाणे चालायला गेलो.
रोजच्या रस्त्याने फिरत असताना आज  संघाच्या शाखे कडे लक्ष गेलेपुढे आलो शिवसेनेची शाखा दिसली ... आज मनात वेगळाच विचार आला " अरे च्या इतकी वर्षे झाली पण शिवसेना असो किंवा संघ असो त्यांच्या शाखेवर नित्य नेमाने येणारी तरुणप्रौढ किंवा वृद्ध पिढी आहे " आपल्या सेवादलाचे असे का नाही झाले ?

आज झाले तरी काय ? स्वतः अपयशाचा विचार मनात कसा काय आला ? मनात आलेला विचार मी लगेच झटकून टाकले  , आणि आजच्या लेखात या हिंदुत्व वाद्यावर काय तोंडसुख घ्यायचे याचा विचार करू लागलो.... विचारात घर कधी आले कळालेच नाही ...

घरी आलो , बायकोने चहा दिला , पण नेहमीप्रमाणे बिस्कीटे नव्हती  , तिला विचारले तर ती म्हणाली आज आषाढी एकादशी उपास आहे ... तिला मी सांगितले मी  इहवादी विचारसरणी अंगिकारली हे माहिती नाही का तुला ? ह्या असल्या गोष्टी आम्ही मानत नाही ....

अरेच्या हि उपास किंवा आषाढी एकादशी करते म्हणजे काय ... झाले  तरी काय ? बहुतके तिच्या मैत्रिणीनि हिंदुत्ववादी विचार तिच्या मनावर बिंबविलेले दिसतात...

परत तो विचार झटकून मी पेपर मध्ये डोके खुपसले ... आणि आजच्या लिखाणाला विषय शोधायला लागलो ....

लक्ष स्वयंपाक घरात जात होतेतिची खिचडीची , थालीपीठाची आणि इतर पदार्थाची तयारी चालू होती ....

मी बातम्या वाचत होतो ..." नितीश कुमारांचा चा राष्ट्रपती निवडणुकीत NDA ला पाठिंबा " " अरविंदा चा अजून एक आमदार भ्रष्टाचारात अडकला "  नेहमी च्या सवयीने या बातम्या कडे दुर्लक्ष करून मी हिंदुत्ववाद्यांच्या बातम्या शोधायचा प्रयत्न करत होतो.

तेव्हड्यात स्वयंपाक घरातून पदार्थाचा घमघमघाट येऊ लागला...

बायकोने आतूनच विचारले " तुम्हाला पोळी भाजी करते ? "

मी तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि पेपरात डोके खुपसून बसलो.... नाकात जाणाऱ्या वासा मुळे पेपरात लक्ष लागत नव्हते .... विषय शोधणे महत्वाचे होते ...

बायकोने परत ओरडून विचारले तसे मी तिला सांगितले ....  " तुला वेगळ्या स्वयंपाकाचा त्रास नकोम्हणून मी पण उपासचेच खाईन , तसे मी काही एकादशी वगैरे मानत नाही "

बायको बाहेर येऊन गालात हसली .... काय झाले तिला ? अशी का हसली ... मी दुर्लक्ष केले...

दुपारी हे पदार्थ खाऊन जरा आडवा झालो तर चॅनेल मधून फोन आला ? सर आज चर्चेला येत आहात ना "

मी  विचारले विषय काय आहेतर त्यांनी सांगितले " संघ आणि  शिवसेनेच्या  शाखा शहर आणि ग्रामीण भागात वाढत असताना सेवा दलाच्या शाखा का बंद झाल्या ?"

आजचा दिवस असा का आहे ? सगळेच असे का घडते आहे ...

मी त्या चॅनेल वाल्या बाईला नेहमी प्रमाणे शांत आवाजात सांगितले " मला आवडले असते यायला , पण आज माझी तब्येत बरी नाही , आवाज बसला आहे , जास्त बोलता पण येत नाही "

जास्त विचार ना करता उद्याच्या लेखा वर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत बसलो ...


बिपीन कुलकर्णी



No comments:

Post a Comment