ढोंगी
.... ३ जुलै २०१७
सोशल मेडिया
वर स्वतः ला समाजसेवक म्हणून घेणारे काही लोक रोज
पंतप्रधान मोदी विरोधात काही ना काही लिखाण करीत असतात... घटने प्रमाणे प्रत्येकाला
विचार आणि लेखन स्वातंत्र्य आहे त्या मुळे त्यांनी लिहू नये या विचाराचा मी नाही....
पण आपण जे काही लिहितो हे " अति झाले आणि हसू आले " या प्रकारात हळू हळू
मोडत चालले आहे याची या समाजसेवकांनी तसेच त्या विचार सरणीच्या लेखक , पत्रकार किंवा
संपादक मंडळींनी दखल घेण्याची वेळ आली आहे.... त्यांच्या सवयी प्रमाणे
ते दखल घेणार नाहीत हे मी धरून चालतो...
विरोधा
करिता विरोध हेच जर का
आयुष्याचे तत्व असेल तर
यांच्या विचारांना शुभेच्छा....
या लोकांवर एकूणच समाजवादी विचार सरणीचा पगडा आहे हे
सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.
समाजवादी विचारसरणी वाईट नाही तशी
कुठलीही विचारसरणी वाईट नसते .... वाईट
असते असते ती आत्मकेंद्रित
वृत्ती...
मी संघवादी
, गांधीवादी किंवा एकूणच कुठला वादी नसून फक्त भारतवादी आहे .... मिळणाऱ्या पगारातील २०-३०% टॅक्स भरून देशाचे कल्याण व्हावे एव्हढीच मनापासून अपेक्षा करणारा साधारण पामर .... देश पुढे
जावा हीच इचछा .... आज जर एखादी व्यक्ती देशाला
पुढे नेण्या करिता झटत असेल , तरुणा पासून वृद्धा पर्यंत , सुशिक्षिता पासून अशिशक्षिता
पर्यंत प्रत्येकाला विश्वास वाटावा अशा गोष्टी करती असेल .... तर बिघडले कुठे ?
याच
अपेक्षेने आमच्या आधीच्या पिढीने तुमच्यावर पण विश्वास टाकून
दिली होती ना सत्ता
तुमच्या हातात १९७७ ला?
.... काय केलेत तुम्ही ? ... अंतर्गत लाथाळ्यां चा उत्तम नमुना
दाखविलात भारतीय राजकारणा ला.... आपल्याला जे जमले नाही ते इतरांना जमू
शकले असे अश्वथाम्याच्या कपाळावरील भळभळणाऱ्या जखमे चे दुःख आहे तुमचे....
समाजवादी विचार पुढच्या पिढीत रुजवू शकले नाही आणि एकूणच
पुढची पिढी त्या विचारांची घडली नाही हे समाजवादाचे ढळढळीत अपयश... या अपयशाची जी काही
कारणे आहेत त्या बाबतीत हे लोक अनभिज्ञ आहेत
असे नाही , पण स्वतः चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हि वृत्ती अंगी
जोपासली कि सगळेच जमून येते...
समाजवादी पक्षाला
फुटीचा शाप आहे .... स्वातंत्र्या नंतर सतत त्याची शकले होत गेली... याला कारण काही नेते आणि त्या बरोबरीने हि सगळी
वाचाळ मंडळी जी अतिशय आत्मकेंद्रित होती आणि आहेत… हे
लोक स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेतात
.... पुरोगामी म्हणजे माणसाला माणसा सारखे वागवणे , म्हणजेच इतरांच्या मताचा आदर करणे ... हे
कसले पुरोगामी हे
तर सगळे ढोंगी....
यांच्या मते दुसर्याच्या मताला किंमत शून्य....मी म्हणेल तीच
पूर्वदिशा .... मला जे आवडेल तेच तुम्ही बोलावे किंवा लिहावे ... हा गेल्या ७०-७५ वर्षाचा इतिहास आहे...इतिहासा कडे
मी येतो पण त्या पूर्वी याची प्रचिती आपल्याला
रोज निरनिराळ्या चॅनेल वर चर्चा पाहताना दिसून येते , हि मंडळी त्या चर्चां
मध्ये इतरांच्या मताचा किती आदर करतात? त्या चर्चे मधील कंपू ने आधीच त्या दिवशीचे
"लक्ष्य" ठरविलेले असते आणि मग सुरु होतो शिकारीचा खेळ... तो कार्यक्रम पाहणारी
जनता दूधखुळी नसते ....
स्वतःची विचारसरणी
गुंडाळून ठेवून सतत समझोते करण्यात यांची हयात गेली , आज पंतप्रधानांचे दोष दाखविण्या
करिता यांचे काँग्रेस प्रेम ऊतू जाते.... कै
नेहरूंचे कौतुक करण्या करिता यांचे शब्द संपत नाहीत....जर नेहरू इतके महान होते
तर त्यांची महानता समजण्या करिता तुम्हाला इतका काळ का लागला ?
इतिहास
सांगतो यांचे लक्ष विधायक कामा
पेक्षा समझोत्या वर जास्त होते
, कामा पेक्षा प्रसिध्दीभिमुख विचारसरणी...
गांधीजी
आणि डॉ लोहिया मधील
झालेला संवाद याची साक्ष देते,
गांधीजी
नि एकदा बोलत असताना
लोहियांना ना विचारले " डॉ साब तुम
लोग इतनी दौडधुप करते
हो , मगर तुम्हे सफलता
क्यू नही मिलती ? कभी
सोचा है ?"
डॉ म्हणाले " नही बापूजी आप
हि बताओ"
गांधीजी
म्हणाले " मेरा उसका उत्तर
है चरित्र ! तुम लोग जो
जीवन मे बोलते हो
, उसका प्रत्यक्ष जीवन मे आचरण
का प्रयास नही होता ! इससे
सब तुम्हारा गलत हो जाता
है " (वाचा मी एस
एम पान न. ३१९)
समाजवादी
नेत्या मध्ये किंवा एकूणच मंडळी मध्ये , वादविवादा मध्ये मुद्दा समजावून सांगण्या पेक्षा मुद्द्याला बगल देऊन फाटकारून
वागण्याची एकूण सवय पूर्वापार
चालत आली आहे. (वाचा
मी एस एम पान
न. ३१९)
हे आपण आजही
पाहतो... कुठला तरी मुद्दा घेऊन काही तरी उथळ
पणे बोलायचे किंवा लिहायचे .... कोणी आपला मुद्दा तार्किकपणे खोडून काढला तर त्याला
उत्तर द्यायचे नाही ... किंवा त्याच्यावर ओरडून गप्प करायचे...
एस एम त्यांच्या पुस्तकात
म्हणतात , प्रसिद्धी संघर्षा शिवाय मिळत नाही , प्रसिद्धी
करिता आम्ही काही संघर्ष केले
.... गांधीजींचा सत्याग्रह आम्ही अगदी राजगिऱ्या च्या
भाजी इतका स्वस्त करून
टाकला , सगळा जोर पब्लिसिटी
वर ....हा पक्षाचा मोठा
दोष.. (पान न. ३२०
)
इतिहासाची
पुनरावृत्ती आजही होतेच आहे
ना ... प्रसिद्धी करिता हपापलेली हि मंडळी आज
तरी वेगळे काय करीत आहेत....
त्यांचे लिखाण म्हणा किंवा चॅनेल वरील चर्चा याचीच
साक्ष देतात….
समाज
वादी चळवळीत जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, आचार्य नरेंद्र देव ह्यांच्यानंतर अशोक
मेहता, राम मनोहर लोहिया,
युसुफ मेहेरअली, एसेम जोशी, ना.
ग. गोरे, मधू दंडवते, मधू
लिमये, जॉर्ज फर्नांडीस असे एकाहून एक
मोठे नेते निर्माण होत
गेले.... त्यांचे कर्तृत्व आभाळा एव्हढे होते ... त्यांच्या पुण्याई वर किती वर्षे
पक्ष चालवणार .... एक गोष्ट महत्वाची
हे जरी थोर नेते
असले तरी दुर्दैवाची
गोष्ट अशी की ह्या
सर्व नेत्यांना समाजवादी पक्ष एकत्र टिकवण्यात
मात्र अपयश आले... या
अपयशाची कारणे वर आलीच आहेत...
पूर्वजांच्या
चुका ओळखल्या तरच आपली प्रगती होत असते या उक्तीवर त्यांचा विश्वास नाही... राष्ट्रीय
किंवा राजकीय राजकारणातील त्यांचे अस्तिव याचीच साक्ष देतात….. मग अस्तित्व दाखविण्या करिता सुरु होतो
सगळा न खेळता येणारा डोंबाऱ्याचा खेळ...
आज राहिलेले लालू प्रसाद , नितीश
कुमार किंवा मुलायम सिंग स्वतः ला
समाजवादी तर म्हणवतात पण
समाजवादी विचारांशी त्यांनी केंव्हाच फारकत घेतली आहे .... त्यांच्या पक्षात असलेले व्यक्तिस्तोम समाजवादी सिध्दांतांच्या ठिकर्या उडवते ...
सरकार
कोणाचेही असू देत म्हणजे
काँग्रेस अथवा भाजप या
लोकांना एक आवई उठवून
द्यायची खोड आहे
" देशात भयानक परिस्थिती आहे " किंवा " लोकशाही धोक्यात आहे ".... एक गोष्ट लक्षात
घ्यायला हवी आमची लोकशाही
इतकी लेचीपेची नाही कि कुठलेही
सरकार तिला धक्का लावू
शकेल.... राहता राहिला प्रश्न देशात भयानक परिस्थितीचा , तर
मग काय १९७७- १९७९
देशात राम राज्य होते
का ?
सरकार
विरोधी पक्षाशी आकसाने वागते हे एक अजून
पालुपद असते .... काँग्रेस किंवा भाजप सरकारने आज
पर्यंत कुठल्याही माजी पंतप्रधाना ला
आकसाने अटक केली नाही
पण तुम्ही १९७७ ला इंदिरा
गांधींना जी अटक केली त्याला
आम्ही आकस नाही तर
काय सहानभूती म्हणायचे का ?
आपले ठेवायचे
झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हि वृत्ती बदलण्या ची आणि पक्षाला वाचविण्याची वेळ
आली आहे ...दुसऱ्यांच्या चुका काढत आपले अस्तित्व अधोरेखित करण्या पेक्षा स्वतः चे सिंहावलोकन
करणे महत्वाचे ....
सरकारने
महात्मा गांधी ना महत्व दिले
कि यांच्या अंगाचा तिळपापड होतो , एक गोष्ट विसरतात
महात्मा गांधी देशाचे राष्ठ्रपिता आहेत ... कुठल्याही पक्षाची खाजगी संपत्ती नव्हेत ....
काही प्रश्न
या सर्व मंडळींना विचारावे वाटतात, त्यांच्या कडून उत्तराची अपेक्षा नाही... कारण सुंभ
जळाला तरी पीळ काही जात नाही...
सरकारची बाजू
घेऊन बोलणार्यांना तुम्ही भक्त म्हणून हिणविता , भक्त म्हणजे " भंगवंताचे होऊन
राहणे " इथे भगवंत म्हणजे ईश्वर .... एखाद्याला भक्त म्हणतांना नकळत तुम्ही ईश्वराचे
अस्तित्व मान्य करून तुमच्या इहवादी विचारसरणी ला तिलांजली देत नाही का ? ७० ते ७५ वर्षाच्या इतिहासात तुम्ही तुमचे अनुयायी
का जमवू शकला नाहीत ? पुढच्या पिढीत तुमचे विचार का नाही पोहोचले ? समाजसेवक किंवा
निर्भीड पत्रकार म्हणून कधी तुम्ही काही प्रश्न तुमच्या लाडक्या अरविंदा ला विचारताना
कधीच का दिसत नाही? ? याला अप्पलपोटी म्हणायचे नाही तर काय ? भारतीय
पंतप्रधानाच्या कपडे किंवा इतर राहणी मानावर टीका करीत असताना तुमची काय अपेक्षा आहे
, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही च्या पंतप्रधानाने तुमच्या सारखे कुडता घालून खांद्याला
झोळी अडकवून फिरावे ? राहता राहिला शेवटचा अंतू बर्वा मधील प्रश्न , " तुमची श्रद्धेची स्थाने तरी कोणती ?
बिपीन
कुलकर्णी
If I am not mistaken, Mala vatta rajkaranavar lihilela ha tumcha pahilach blog. Mi kahi far jantaa nahi ya vishayat pan really good and self explainatory write up. 👍🏻
ReplyDeleteKupch marmik ani udharnasah. Saglaya samajvadini vachnyasarkha.
ReplyDelete