Saturday, April 30, 2016

अकबर बिरबल

अकबर बिरबल                                                                                                   ३० एप्रिल २०१६

बादशाह महालात येरझार्या घालत होता, नक्की काय बिघडले कळायला मार्ग नव्हतासगळे दरबारी , राणी सरकार , इतर लोक सगळेच जण काळजीत होते. बादशहाचे कशात लक्ष नव्हतेधड खाणे नाही , पिणे नाही , कोणाशी बोलणे नाहीकधी शून्यात दृष्टी लावणेकसला तरी सतत विचार करत असणेएकूणच काही  तरी बिघडले होते आणि  कसली तरी  काळजी लागली होती

बेगम ने आडून पाडून विचारायचा प्रयत्न केला ? पण धड उत्तर देईल तर बादशाह कसला ?

राजवैद्याना बोलावणे धाडलेहातातील सगळी कामे टाकून वैद्य धावत आले …. नाडी परीक्षा झालीपण वैद्यांच्या दृष्टीने सगळे ठीकच होते ….

बादशहा ला नक्की काय झाले ?

वैद्यांनी बेगम च्या कानात काही तरी सांगितलेराणीने टाळी वाजवून सेवकाला बोलावले आणि बिरबला ला निरोप पाठवला " असताल तसे निघून या "

राणी सरकारचा निरोप , बिरबल धावत राजमहालात आला

एकूण तिथले वातावरण पाहून बिरबलाला परिस्थिती ची कल्पना आलीआज पण बिरबलाला " मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागणार होती "
बिरबलाने सराईत पणे तिथे जमलेल्या लोकांना खुणेने बाहेर जायला सांगितले , हळू हळू लोक बाहेर गेलेदालनात तिघेच उरलेत्याने बेगमला वाकून कुर्निसात केला , बेगम ला त्याचा अर्थ कळाला आणि निमुटपणे ती पण बाहेर गेली

बादशहा दालनातल्या खिडकीतून आरपार पहात कसला तरी विचार करीत होताबिरबल हळू हळू बादशाहच्या जवळ गेला
- " खविन्द मी आपला सेवक बिरबल "
- " आत्ता या वेळेस कशाला आलास "
- " आपल्याशी बोलायचे होते , आपण कसला विचार करीत आहात ? नक्की काय होतेय आपल्याला ? गेले काही दिवस सगळी प्रजा चिंतेत आहे? "
“ ………”
-   बोला जहा पना काही तरी बोला  … राणी सरकारच्या चिंतेचा तरी विचार कराराजा जेंव्हा दुखा: असतो तेंव्हा ते एकट्याचे दुख: नसतेबादशहाला वैयक्तिक जीवन नसते , डोईवरच्या मुकुटातील काटे मी तुम्हाला सांगायची गरज नाही सरकार

बादशहा खिन्न पणे हसलात्याच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले

"खविन्द आपल्या डोळ्यात पाणी ? कसली चिंता खाते आहे आपणास ?"
"कसे सांगू बिरबला ?"

सांगा महाराज ? बोला आणि मोकळे व्हा ? चिंता हि मनात ठेवण्या चा विषय नाहीव्याजानी घेतलेल्या कर्जा सारखी चक्रवाढ व्याजा प्रमाणे ती वाढत जातेमुक्त पणाने उधळून त्या व्याजातून मुक्त व्हायचे

बिरबला बोलणे सोपे आहे

नाही जहा पनाचिंता हा चर्चे चा विषय नसून कृतीचा विषय असू शकतो

बादशहा ला बिरबलाच्या बोलण्याने थोडी उभारी आलीबिरबला जवळ बोलावे का नको याचा क्षणभर विचार केलाएक मन म्हणत होते बोलदुसरे सांगत होते नाही बिरबल तुझा सेवक आहे

विचार करत असताना बादशाहच्या डोळ्यात परत पाणी तरळले

बादशहा नि निर्णय घेतला बिरबला शी बोलण्याचाकसे सुरुवात करावी याची मनात जुळवा जुळव सुरु केली

“मला खूप भीती वाटते रे बिरबला ?”
“कशाची खाविंद ?”
“तूच सांग बिरबलामनुष्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते ?”

बिरबलाने  लगेच रामायणातील श्लोक ऐकवला  " भितो मरानादास्मी केवलम दुषितो यश:" मी मरणाला भीत नाही जर कशाला घाबरत असेल तर ते फक्त बदनामीला”

बादशहा दुखा:ने म्हणाला , “बिरबला मी जरी प्रजेचा राजा असलो तरी , भगवान रामा इतका मोठा नक्कीच नाहीसामान्य माणूस आहे रेमला मरणाची भीती वाटते… “

“का खविन्द का ? असे काय झाले कि एकदम तुम्हाला मरणाची भीती वाटू लागली ? आणि त्या चिंते पायी तुम्ही अशी अवस्था करून घेतलीत?”

“बिरबला कळत नाही मला …. पण भीती मात्र खूप वाटते , कोणाला सांगू शकत नाही , बोलू शकत नाही ? सांगितले तरी कोणाला माझ्या परिस्थिती ची कल्पना येणार नाही ?”

“महाराज मला आहे कल्पनामी समजू शकतोकारण मी पण त्या अवस्थेतून गेलो आहे ?”

“काय सांगतोस  ?” बादशाहाला त्या परिस्थितीत पण नकळत आनंद झालाआपल्या सारख्या परिस्थितीतून आपला बिरबल गेला आहे याचाखरे तर ती हर्ष होण्याची गोष्ट नव्हतीमनुष्य स्वभाव आहेसम दुखी: भेटला कि दुख: हलके झाल्याची भावना होते

बादशहाचे डोळे पाणावले

बिरबला ने एकदा राजा कडे पहिले आणि म्हणालामहाराज सतत डोळ्यात पाणी काढणाऱ्या माणसाचे सगळी कडे हसे होते ? लोक सहानभूती देतात पण एकदा पाठ फिरली कि त्यांना चर्चे ला विषय मिळतो"

“काय करू बिरबला ? मरण - मरण सतत तेच विचार येतात ?”

“महाराज मरणाची भीती प्रत्येकाला वाटते ? कोणाला कमी कोणाला जास्त किंवा सतततुमच्या सारखी परिस्थिती प्रत्येक माणसा मागे एकाची असते ?”

“बिरबला त्यात तू पण एक आहेस ?” बादशहा नकळत बोलून गेला

“नाही महाराज मी नाही त्यातला …. त्या परिस्थितीतून मी बाहेर पडलो”…..बादशहा थोडा खजील झाला , तेवढ्यात बिरबलाने बोलण्यास सुरुवात केली

महाराज हे सगळे विचारांचे खेळ आहेतदिवसात ५० ते ६० हजार विचार सामान्य पणे आपण करतोत्यात जेंव्हा तुमच्या सारखी परिस्थिती असेल तेंव्हा ते दुप्पट होतातविचारांना पण Quality असते , पण सामान्य पणे आपण लक्षात घेत नाहीएकातून दुसरा विचार , त्यातून तिसरा मग चवथा अशी साखळी बनत जातेनकळत पणे आपण कुठल्या गोष्टी वरून सुरु करून कुठे संपवतो आपल्यालाहि कळत नाही

वैद्यकीय भाषेत याला Anxiety म्हणतात

कोणाचे आजारपण पहिले कि आपले मन नकळत विचार सुरु करते आणि त्या परिस्थितीत स्वतः ला पाहणे सुरु करतेसाधे डोके दुखले तर Brain Tumour ची भीती, छातीत दुखले तर Heart Attack चे विचार, मग Cancer किंवा अजून काहीकुठल्या  कुठल्या  अगम्य रोगाशी सतत नाते जोडत असतो         

हा मनुष्य स्वभाव आहे …. एखाद्याचा मृत्यू पहिला कि नकळत गेलेल्या माणसाच्या जागी आपण स्वतः ला आणि कुटुंबियांना पाहतोजवळच्या माणसाचा मृत्यू दुख: तर प्रचंड देतो पण त्याच वेळेस तेव्हढीच भीती हि देतो

जिवंत पणी किती तरी वेळा नकळत स्वतः चा मृत्यू अथवा आजार पण पाहतोहे करीत असताना एक गोष्ट सोयीस्कर पणे विसरतोस्वतः चे इतके मृत्यू आजार पण पाहून पण आपण या जगात आहोत ना ?  "मन चिंती ते वैरी चिंती " म्हणतात ते हेच

मनात विचार येतो , एकदा विचार आला कि शरीरात बदल सुरु होतात आणि लगेच भीतीची भावना सुरु होतेया सगळ्या गोष्टी कुठल्याही क्रमाने आल्या कि भावना तीचयाला इंग्लिश मध्ये Vicous Circle म्हणतात संपणारे चक्र

जहा पना , मनुष्य स्वभावाला  दुखा:ला कवटाळण्याची एक वाईट खोड असतेतो सतत वर्तमाना पेक्षा भूतकाळात किंवा भविष्यात रमत असतोप्रत्येक क्षणाला स्वतः चे विचार तपासायची सवय लावून घ्यामी सांगितलेले Vicious Circle तोडायचा प्रयत्न कराआणि मुख्य परिस्थिती ला सामोरे जाएक लक्षात ठेवा विचार जेवढे आपण घालवायचा प्रयत्न करू तेवढे ते जास्त येतील, त्या मुळे एखादा भीतीचा विचार आला कि त्या वर विचार करायला सुरु कराआणि मग  बघा तो विचार किती वेळ टिकतो…  हे  सगळे तेव्हढे सोपे नाहीआणि  अवघड पण नाही…  सुरुवात तर करा

आणि आता तुम्हाला वाटत असलेल्या मृत्यू च्या भीती बद्दल …. मृत्यू हे अटळ  सत्य आहेतो येतो तेंव्हा चोर पावलाने येतोतुम्ही जेव्हढा विचार करता तेव्हढा वेळ विचार करायला नक्कीच देत नाही …. ईश्वरानी पण निसर्ग चक्र निर्माण करताना जन्माची चाहूल महिने आधी दिलीआपण नशीबवान आहोत मृत्यू ची चाहूल महिने आधी दिली नाही…  वर्तमान काळ जगायचा असतोभूतकाळ विसरायचा असतो आणि भविष्य काळ अनुभवायचा असतोभीती किंवा चिंता बोलल्याने हलकी होतेमनात ठेवल्याने वाढत जातेसुखात दुख: शोधण्या पेक्षा दुखा: सुख शोधायची सवय लावून घ्या….

आणि मग पहा आयुष्य किती सुंदर आहे ….

बिरबला बिरबला किती छान बोललास  … आणि ते पण नेमके माझ्या मनातील …

महाराज हे तुमच्याच नाही तर प्रत्येकाच्या मनातील आहे

बिरबलाने बादशाहाला कुर्निसात केला … आणि दोघेही प्रसन्न पणे महाला बाहेर पडले …


बिपीन कुलकर्णी  

 

 







1 comment:

  1. Far subdar, khare ahe ... Vartamanat rahayala shikayala pahije... Your thoughts write your Destiny!!! Apale thinking Apan kharach control karayala pahije ani Apalya wicharanchi quality check karayalach pahije... Which is not easy... And those who can do that those r very balanced people!!!

    ReplyDelete