एका सामान्य माणसाची उद्विग्नता ! १६ एप्रिल २०१६
आज देशात किंवा राज्यात आजुबाजुला जे चालले आहे ते पाहुन सामान्य माणसाच्या मनात " कुठे
नेउन ठेवल्या आहेत भावना माझ्या " असा
विचार सतत येत असतो .
राज्यकर्ते म्हणजे जनतेचे पालक … एक मुल दुखा:त असताना जर का आई वडील दुसर्या मुलाचा कुठलाही आनंद सोहळा करीत असतील … त्या सारखे दुसरे दुर्दैव काय असू शकते ?
लातूर आणि आणि अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना … लाखो लिटर पाण्याची नासाडी करून महाराष्ट्रात
IPL चा तमाशा करण्याची खरेच गरज होती का
? हे होऊ नाही या करिता कोणालातरी जनहित याचिका दाखल करावी लागते याला काय म्हणायचे ? मग हायकोर्ट निर्णय देते आणि त्या नंतर चक्र फिरतात ?
का राज्यकर्त्यांनी BCCI आधी ठणकावून सांगितले नाही ?
दुसरा मुद्दा लातूर च्या जनते करिता मिरजे हून रेल्वेने पाणी पाठविले … चांगले काम… उत्तम !
पण त्याचे श्रेय घेण्या करिता किती केविलवाणी धडपड … उद्या
आपले मुल उन्हातानातून आले आणि पाणी मागितले …. तर आपण त्याला आधी पाणी देणार , का पाणी देतानाचे फोटो काढून सोशल मेडिया किंवा वृत्तपत्रात देणार … आपल्या भावना येवढ्या बोथट झाल्या आहेत का ?
आधीच्या सरकारच्या नाकर्ते पणाची हि सगळी फळे आहेत त्यात वाद नाही … पण तुमच्या कडे जनता फार आशेने पाहते आहे … ज्या चुका आधीच्या सरकारने केल्या त्याच तुम्ही कृपा करून करू नका …
जनतेच्या दुखा:वर फुंकर घालण्या ऐवजी त्याचे भांडवल करू नका ….आधीच्या सरकारने प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाण्याची संधी सोडली नाही …आणि त्याचे फळ त्यांना २०१४ च्या निवडणुकीत मिळाले …
विरोधी पक्ष तावातावाने बोलतो … त्यांना या सरकारला नैतिकता शिकविण्याचा अजिबात अधिकार नाही … त्यांच्या पक्ष
नेत्यांनी धरणे भरण्या करिता काय मुक्ताफळे उधळली ते जनता विसरली नाही … पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अक्खा महाराष्ट्र हि ज्यांची मानसिकता आहे त्यांनी दुष्काळा वर बोलून जनतेला मूर्ख बनविणे आता थांबवावे …
अजून एक पक्ष आहे त्यांचे एकच काम सत्तेत राहून कायम विरोध … हे म्हणजे वाल्या कोळी च्या बायको सारखे " संसार
तर करीन, हौस मौज सगळे पाहिजे पण पापात भागीदार होणार नाही "
लाल दिव्याची गाडी तर पाहिजे , पण उत्तरदाईत्व घेणार नाही …. नाही पटत ना मग होत का नाही वेगळे ? आहात सत्तेत तर घ्या मग जबाबदारी…
कोण कुठला विद्यार्थी … काय तर म्हणे हातवारे करीत म्हणतो " हमे
चाहिये आझादी "
लेका तुझे वय आहे २९… साधारण त्या वयात भारतातील मुले स्वतःच्या पायावर उभे राहून … आई वडील किंवा संसाराची जबाबदारी घेतात … तुझी जबाबदारी अजून सरकार घेते … देशद्रोहा च्या आरोपां खाली तुला अटक केले होते … तू काही राज्य बंदी नव्हतास … एवढे होऊन तुला जामीन मिळाला … तुला पोलिस संरक्षण दिले … सभा घ्यायची परवानगी दिली … तरी वर तोंड करून स्वातंत्र्य सैनिकांच्या थाटात म्हणतोस " हमे चाहिये आझादी "
लेका स्वतःला काय लोकमान्य समजतोस ?
खिशात अडकित्ता आणि तोंडात सुपारीचे खांड ठेवले म्हणून कोणी लोकमान्य होत नसतो… तेवढी विद्वता, देशप्रेम आणि निष्ठा असावी लागते …
तशीच अजून एक मुलगी आज काय शनि चौथरा , उद्या काय या मंदिराचा गाभारा , परवा अजून कुठले मंदिर प्रवेश असे काही काही नाटके चालू असतात… इथे महिलांनी जावे किंवा नाही हा मुद्दा नसून … स्वातंत्र्या नंतर ६८ वर्षात समाज सुधारण्याची किंवा स्त्री हक्काची आजच कशी सुबुद्धी झाली ?
कोणाची फूस आहे कळत नाही का जनतेला ?
स्वतः कडे काही मुद्दे नसले असले मुद्दे घेवून विरोधी पक्षाला त्याचे भांडवल करावे लागते… मी काही करणार नाही आणि तुम्हाला पण
काही करू देणार नाही … हीच वृत्ती …
रस्त्यावरून जाताना जागोजागी दिसणारे FLEX …
हा एक वेगळा विषय … प्रत्येक गोष्टीचे श्रेय लाटण्या करिता जनतेच्या पैशाची उधळपट्टी… कुठल्याही पक्षाला याचा विटाळ नाही … पहिल्यानी वाढवले ,दुसर्यांनी पोसले आणि तिसर्यानी त्यावर कळस चढवला … असाच काहीसा प्रकार
आमच्या सारख्या नागरिकांच्या मनात हे सगळे पाहून काय भावना येतात ? याचा विचार कधी करणार ?
तुम्ही कामे करीत असाल किंवा केली असतील तर दिसतील ना जनतेला …करा तुम्ही निश्चिंत तुमची कामे आम्ही आहोत तुमच्या पाठीशी … असे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची काय गरज आहे ?
जनतेच्या पैशाची नासाडी थांबणे महत्वाचे … जनतेचा म्हणजे आम्हा नोकरदारांच्या tax चा पैसा …. २०-३०% tax आम्ही देतो … म्हणजे १२ महिने नोकरी करून ९ - १० महिन्याचा पगार हातात पडतो…
काय वाटत असेल आम्हाला हे पाहून ?
corporate pressures सांभाळत … पैसे वाचवायचे … आणि ३०% पगार तुमच्या हातात द्यायचा…
नोकरी करणार्या जनतेला एक एक पैसा वाचवून भविष्या ची तरतूद करावी लागते … कारण
त्यांच्या वडिलांनी दादर च्या पुलाखाली फुले विकून करोडो रुपये जमविलेले नसतात… असो
कुठला तरी पक्ष
उठतो आणि कारण नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना वादात ओढतो… ज्यांचे असंख्य पुढारी भ्रष्टाचाराच्या
आरोपा मुळे जेल ची हवा खातात त्यांच्या कडून स्वातंत्र्या करिता भोगलेल्या २ काळ्यापाण्याच्या शिक्षा म्हणजे काय असते … हे
समजण्याची अपेक्षा ठेवणेच मूर्ख
पणाचे आहे …
खरे तर इलेक्ट्रोनिक मेडिया नि या सगळ्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवायला हवा , पण ते पण कुठल्या तरी पक्षाची तळी उचलण्याचे काम इमाने इतबारे करीत असतात अथवा स्वतः ला न्यायाधीशाच्या
भूमिकेत बसवून प्रत्येक घटनेचा निर्णय करून मोकळे … अरे लेकानो तुम्ही आमचे प्रतिनिधी ना … निरपेक्ष असायला नको का ? तुम्ही दाढी कोरली आणि सूट बूट घातला , हातवारे करून जोरजोरात बोललात म्हणजे काय तुमची विश्वासार्हता वाढते का ?
तुम्ही फक्त बोलावलेल्या लोकांची मते
जाणून घ्या ना … का लोकांच्या तोंडी वाक्ये घालून निर्णय करता … सगळीच उद्विग्नता !!
सुरेश भट ४ ओळीत या भावना किती सोप्या पद्धतीने सांगून गेले…
आम्ही चार किरणांची हि आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
उषकाल होता होता काल रात्र झाली
असो ….
- बिपीन कुलकर्णी
Chan lihales , bhayanak paristithi ahe ekun... Aplya sarakhi samanya janata bharadali jate... Baki Kay karu shakato?
ReplyDeleteKhupach vait paristhiti aahe..mhane laturat mantryache hilicopter utrawayla daha hazar liter pani waya ghalavale... lokanchya pausyavar maaz ani credit gyayche... sagala aagau pana mandavali...y z etc etc chalu aahe..
ReplyDeleteKhupach vait paristhiti aahe..mhane laturat mantryache hilicopter utrawayla daha hazar liter pani waya ghalavale... lokanchya pausyavar maaz ani credit gyayche... sagala aagau pana mandavali...y z etc etc chalu aahe..
ReplyDeleteअप्रतिम BK! अतिशय वाईट परिस्थिती आहे...additionally, I think next term election will be lost by current ruling party as they are plagued by certain extremists and opposition is playing so smart politics that nobody now cares about what is being done right but is busy dissecting as to how current government is equally bad or worse than earlier government.. Sad but true..
ReplyDeleteKanaiya / Trupti are all pawns of the opposition.. Very aptly described by Shri. Suresh Bhat.... Just hope that it doesn't become reality in our lives as well..
अप्रतिम BK! अतिशय वाईट परिस्थिती आहे...additionally, I think next term election will be lost by current ruling party as they are plagued by certain extremists and opposition is playing so smart politics that nobody now cares about what is being done right but is busy dissecting as to how current government is equally bad or worse than earlier government.. Sad but true..
ReplyDeleteKanaiya / Trupti are all pawns of the opposition.. Very aptly described by Shri. Suresh Bhat.... Just hope that it doesn't become reality in our lives as well..
Dada Kharach chan Ani pot tidkini lihila ahes. Kharach frustrating ahe sagala.. Ruling and opposition doghanche Kahi wegalach problems ahet Ani MEDIA tyat ajun ek tisarach angle ahe ..Khup padhatshirpane sagala tapavana chalu ahe .. At the end Samanya Lokana no Ache Din :(
ReplyDelete