न येणारे पत्र !
चि बिपीन ,
२१ फेब्रुवारी २०१६
कसा आहेस बाळा ! तु किती जरी मोठा झालास तरी बाळच आहेस
रे माझ्या साठी … कारण तुझ्या जन्मा पासून
पाहतेय तुला मी …. किती भर भर जातो ना काळ
? एवढासा होतास आता चाळीशी ओलांडलीस…
तुम्ही सगळे आपल्या संसारात व्यस्त पुण्या पासून अमेरिके
पर्यंत कुठे कुठे स्थाईक झालात …फार आठवण येते रे तुम्हा लेकरांची … आजकाल फार एकटे वाटते रे, बोलायला कोणी नसते ना !
अधून मधून तुम्ही सगळे येता दोन दिवस राहता आणि परत आपल्या
कामाला निघून जाता… त्या दोन दिवसाच्या आठवणी
वर मी दिवस ढकलते …. तुमचा दोष नाही रे … तुम्ही तरी काय करणार ? तुमच्या नौकर्या , मुलांचे
शिक्षण महत्वाचे … कळतेय मला…
पण तुमची लहान मुले
, त्यांचा गोंधळ … त्यांचा आरडा ओरडा सगळे खूप हवे हवेसे वाटते रे … कोणी मला
स्वार्थी म्हणेल … म्हणू देत…
तुमची आजची पिढी
इमेल किंवा whats app वर बोलणारी , मला हे कुठले जमतेय , म्हणून म्हंटले पत्रच पाठवू
…तेव्हढेच मन मोकळे करू …
माझे आणि तुझे नाते नक्की काय असा प्रश्न पडू शकतो कोणालाही ? सहवासाने
प्रेम निर्माण होते आणि वाढत जाते , त्या मुळे गेल्या ४० वर्षात तुझे आणि माझे प्रेमाचे
नाते निर्माण झाले… हा नक्कीच बादरायण संबंध
नाही…
कोण आहे मी तुझी ?
तुम्हा चार पिढ्यांना अंगा खांद्यावर वाढवले !!
सगळ्या सुख: दुःखाची बरोबरीने मूक
साथ दिली !!
म्हणजेच ज्या ४
भिंतीच्या आत राहून तुझी जडण घडण झाली ती मी …म्हणजे
…… तीच ती मी तुमची
वास्तू " १६७ बल्वन्त बंगला "
आज असेच सगळे आठवले
… आणि थोडी हळवी झाले… म्हंटले तुझ्याशी बोलून
मन मोकळे करू …
तुझ्या आजोबांचे फार उपकार आहेत माझ्यावर …
तुमचे नाते वाईक , मित्र मैत्रिणी सगळ्यांना ना आज माझे
दिमाखात उभे राहणे दिसते …पण सुरुवातीला किती त्रास काढला कल्पना नाही त्या लोकांना
किती उन्हाळे पावसाळे रे पहिले मी … झालि बघ पंचेचाळीस वर्षे …आली कि माझी
पण पन्नाशी…थकले
नाही हा अजून मी …
तुला सांगते ७० च्या दशकात औरंगाबाद मध्ये डॉ ख्रिश्चन म्हणून एक भला माणूस होऊन गेला त्यांनी शहराच्या बाहेर पडीक जमिनीवर प्लॉट विकायला काढले, किंमत काय तर १ रुपया स्क्वेयर फूट !आज लोक हसतील या किमतीला , त्या वेळेस लोकांचा
पगार कितीसा असणार , तुझ्या आजोबांचा पगार होता रुपये १५० … केले त्यांनी धाडस आणि
घेतली हि जागा…
एकूण ३६०० स्क्वेयर फूट आणि किंमत रुपये ३६०० … ते पण हप्त्याने …
आजच्या सारखे त्या वेळेस बँका कर्ज देण्या करिता मागे लागत
नव्हत्या … पण आजोबांनी धाडस केले आणि कष्टातून
मला उभे केले …. तुझे वडील आणि काका पण फार हौशी … त्यांनी पण मला बांधताना सगळ्या
गोष्टींचा विचार केला…
सुरुवातीला पैशाची ओढाताण करून छोटे टुमदार घर बांधले
… ४ खोल्या , पुढे अंगण, बाग , तुळशी वृंदावन ।
मागच्या बाजूला परत बाग आणि विहीर… त्या वेळेस पाण्याची दुसरी
काही सोय नव्हती , म्हणून विहीर करावी लागली…
बागेत दोन उंच
अशोकाची झाडे होती … तुम्ही काय म्हणता त्याला landmark का काय तशी होती ती दोन झाडे होती ,
त्या दोन झाडा मुळे लांबून घर दिसायचे? बागेत
निरनिराळे गुलाब, जास्वंदी चे अनेक प्रकार , रात राणी , क्रोटन अशी अनेक झाडे … तुझ्या बाबा ना फार आवड बागेची…
आजोबांची फार ओढाताण झाली मला आकाराला नेताना , सुरुवातीचे
बांधकाम २८००० रुपयात झाले … मग हळू हळू मागचे घर बांधले…
तिथे अनेक कुटुंबे राहून गेलीत… नंतर म्हणजे ९० च्या दशकात वरचा दुसरा मजला बांधला…
सांगितले तर खोटे वाटेल , सुरुवातीला काही वर्षे घरात लाईट
नव्हते , आई काकू चे रोजचे काम… कंदील साफ करून ठेवायचे…
किती स्ठीतंतरे मी पहिलीत ,
एका ओळीत सांगायचे तर बंब तापविण्या पासून सोलर गिझर पर्यंत
आणि कंदिलाच्या दिव्या पासून थेट LED पर्यंत…
तुमच्या चार पिढ्यांचे खूप प्रेम मिळाले मला …
जशी घराला घर पण देणारी माणसे असतात तशी माणसाना प्रेम देणारी वास्तु पण असू शकते
ना ?
इंग्रजी मध्ये दोन चांगले शब्द आहेत "होम" आणि
"हाउस" , मराठीत त्या दोन्हीला प्रतिशब्द मला तरी माहिती नाही…
कुठलीही इमारत " हाउस " असू शकते ,पण प्रत्तेक इमारत होम होऊ शकत नाही….
"होम" म्हणजे ज्या वास्तूत आपण वाढलो, मोठे झालो
, अनेक आठवणी जडल्या आहेत … आणि मुख्य जिथे
आपले पणाची भावना असते अशी ती जागा….
आता तूच ठरव मी तुझ्या करिता होम आहे का हाउस ?
तुमच्या सुखात आनंदाने नाचत होते त्याच वेळेस दुखाने : कधी हुंदके देत आक्रोश करीत होते …
काय नाही पहिले …तुझा जन्म,मुंज, लग्न इतकेच काय तुझ्या
मुलांचा जन्म, त्याची मुंज … तसेच तुझ्या बायकोला सामावून घेतले माझ्या मध्ये ! या प्रत्येक
क्षणी आनंदाने बेहोष होत होते …तुमचा आनंद
तो माझा आनंद…
आनंदाच्या क्षणी तुम्ही देवाला करिताना वास्तूला म्हणजे मला वंदन करीत होता…
मी फक्त तथास्तु म्हणत होते ।
दिवाळी किंवा लग्ना कार्यात माझ्यावर केलेली विद्द्युत
रोषणाई मला एक प्रकारची श्रीमंती देवून गेली … जणू माझ्या अंगावर पैठणी चढवली असे वाटे…
नरसिंह जयंती ची धामधूम , " गणपती बाप्पा मोरया
" ची आरोळी , सजून धजून येणाऱ्या गौरी … दिवाळीतील फटाक्याची आतष बाजी , दारात
केलेला किल्ला…
माझ्या शिरावर डौलात उभी केलेली गुढी … अशा असंख्य आठवणी आहेत … तुम्ही सर्वांनी मला
कृतकृत्य केलेते …
जसे आनंदाच्या क्षणी तुमच्यात होते तसेच दुखा:त पण तुमच्या बरोबरीने होते … घरातील
व्यक्तींचा म्हणजे आजोबा आणि काकांचा मृत्यू पहिला … माझा प्रत्येक कोपरा आसवे गाळत होता आणि आक्रोश करीत होता…
काल पर्यंत माझ्यात
असणारा माणूस , आज एकदम माझ्याच
अंगावर म्हणजे भिंतीवर "फोटोत"
विसावतो तेंव्हा काय करावे कळत नाही … माझे
दुख:कळणार नाही रे तुम्हा माणसाना … तुझे
व पु म्हणतात तसे आपले बोलणे समोरच्या पर्यंत
न पोहोचणे हि शोकांतिका जास्त भयाण असते …
असो मी जास्तच हळवी होते आज काल , तुला दुखवायचा हेतू नाही
… पण बोलले कि मन हलके होते ना म्हणून…
आता एकूणच आपल्या आजूबाजूला फार गर्दी झाली आहे , नुसते
सिमेंट चे जंगल…
एके काळी लांबून अशोका च्या झाडा मुळे ओळखू येणारी मी आता जवळ आले तरी दिसत नाही…
चालायचेच " कालाय तस्मे नमः "
आता अशोकाची झाडे राहिली नाहीत , विहीर नाही … नरसिंह जयन्ती
असो किंवा गणपतीतील किंवा दिवाळी ची धामधूम
पण पूर्वी सारखी राहिली नाही …
नित्य नियमाने देवा
समोर तिन्ही सांजेला दिवा लावला जातो पण पूर्वी सारखा " शुभं करोति " चा आवाज काही घुमत नाही
….
अंतुबर्वा च्या भाषेत सांगायचे तर आजोबा गेले आणि परत रातराणी
कधी फुललीच नाही बघ ….
असो … मुलांना आणि तुझ्या बायकोला आशीर्वाद…
आयुष्यात मोठे व्हा , सगळी स्वपने पूर्ण करा पण
एक नेहमी लक्षात ठेवा " वास्तू म्हणत असते तथास्तु "
वरचे वर येत राहा …
तुझीच -
वास्तू "१६७
बलवंत बंगला "
Ekdam zabardast dada 👌👌.. Ekdam sagala kal ani Apale aurangabache diwas dolyasamor taralun gele ..
ReplyDeleteसुंदर !!
ReplyDeleteसुंदर !!
ReplyDeleteKharach re 4 pidhya pahilya 167 'Balwant' ne....farach chan ... Manasa pahijet tya gharala...
ReplyDeleteDada. Mastach. Kharach chan hote aple tya gharatle divas. Saglyat ahevatcha member mi ahe balwant sodnara. Agdi 10-12 varshan purvi paryanta mi, mazya maitrini asaycho tithe...ata tya pan mhantat mala.. ghar khup shanta vatata ata....
ReplyDeleteDada khup Chan kharach aapaya bharlela ghar, aanganatalya gappa,bag ,sanwar. ..sagalch dolyasamor aala aani aapan kharach khup lamb aalo asa watata. Pan eka goshticha samadhan aahe aapalya mulana pan aapala ghartevadhach aawadata. ..
ReplyDeleteGood post. Vastuche manogat atishay sundar ritya mandle aahe. ��
ReplyDeleteGood post. Vastuche manogat atishay sundar ritya mandle aahe. ��
ReplyDeleteसुंदर मनोगत...
ReplyDelete