Monday, January 4, 2016

" नटसम्राट" ....आमचे मत



" नटसम्राट" सिनेमा पहिलाचांगला आहे …                                                      ५ जानेवारी २०१६

कदाचित जास्तच अपेक्षा ठेवल्या मुळेअतिसुंदर किंवा अप्रतिम असे  काही फिलिंग आली नाही….

नटसम्राट नाटकाची कथा प्रत्येकाला परिचित , त्याचे चित्रपट  रुपांतर पाहणे हि उत्सुकता होती …. 
नानाचा अभिनय ग्रेटचमेधा मांजरेकरांची  कावेरी पण उत्तमनाटकात नसलेले पण चित्रपटा करिता निर्माण केलेलं  राम चे पात्र आणि विक्रम गोखलेंचा अभिनय खरेच लाजवाब

नाना आणि विक्रम गोखल्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मजा येतेहॉस्पिटल मधील त्या दोघांचा प्रसंग  ज्यात विक्रम गोखले कर्ण आणि नाना चे श्रीक्रीष्णा चे  संवाद अंगावर काटा आणतात …. त्या एका सीन मध्ये सिनेमा चे पैसे खरे तर वसूल होतात

संपूर्ण चित्रपट भर नाना हा नानाच वाटतो…. त्यात गणपतराव बेलवलकर शोधावा लागतोकदाचित आम्हीच  प्रत्येक भूमिकेत त्याला नाना म्हणूनच पहात   असतो… 

सिनेमा मध्ये दारू ला नको तितके महत्व दिले आहे , जे कि वि वा शिरवाडकरांच्या कथानकात नव्हते ,
नाट्य कलाकारांचा चौथा अंक हा त्या काळी काय किंवा आज काय कायम चर्चेत असतो…  पण त्याला अपवाद होते आणि असतात   … म्हणूनच  सिनेमातील दारूला दिलेले  महत्व खटकतेतसेच शिव्यांच्या नको तितका वापर पण रसभंग करतो ?

नटसम्राट हि खरे तर अप्पा बेलवलकर या रंगदेवतेच्या पुजार्याची शोकांतिका , पण मद्यपाना चा आणि शिव्यांचा अतिरेक , अप्पा बेल्वाल्काराना एक ग्रे शेड देतो  ….

कदाचित हे सगळे पाहून आजची तरुण पिढी म्हणू शकते " अप्पांचे पण थोडे चुकलेच, त्यांनी असे वागायला नको होते "
  

बिपीन कुलकर्णी 



1 comment: