मनाचे
वैभव !!!
आपल्या समाजात संतांचे स्थान खूप मोठे आहे, सामान्य माणसाला जगण्याचे बळ संत वांग्मय आणी संत विचारातून मिळत असते.
सामान्य माणूस मन ,विचार आणि भावनेच्या गुंत्यात सतत अडकलेला असतो , थोडक्यात काय तर विचारां पासून भावनां पर्यंतचा प्रवास सतत आणि नकळत चालू असतो ... बहुतेकांना आपण या गुंत्यात अडकलो आहोत हेच मुळी कळत नसते ... कारण विचारांच्या पुढे बुद्धी तोकडी पडत असते ... आणि मग मनःशांती हरविल्याची कल्पना यायला लागते ....
भावना आणि विचारांचा गुंता सुटला तर नक्कीच मनःशांती मिळते , पण ते तितके सोपेही नसते आणि ठरविले तर अवघड पण नसते ... हा गुंता सोडविण्यास संतांची शिकवण आणि विचार मोलाची मदत करीत असतात ..कदाचित त्या मुळेच संतांना समाजाचे दीपस्तंभ म्हंटले जाते. .
त्यांची विचार करण्याची पद्धती , प्रत्येक गोष्टी कडे पाहण्याची तटस्थता, आचार विचार , अनुभव या सगळ्या गोष्टी सामान्य माणसा पेक्षा खूपच निराळ्या असतात ...
मुख्य म्हणजे अध्यात्माचा पाया पक्का असतो , अध्यात्म म्हणजे काय ? ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतः चे आत्मपरीक्षण, त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ समजुन घेणे आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण करणे .
अध्यात्म म्हणजे भक्ती असा गैरसमज काही लोक निर्माण करून घेतात ...
ज्या संतांनी इतके दिवस हजारो लोकांना मार्ग दाखविला , कदाचित त्यातील बऱ्याच जणांना आत्महत्ये पासून परावृत्त केले असेल तेच राष्ट्र संत आत्महत्या करून मृत्युला कवटाळतात तेंव्हा सामान्य माणसाने काय विचार करायचा ?
संत अथवा गुरु हा पण शेवटी माणूसच आहे ...भावनांचा कल्लोळ त्यांचा पण होतच असणार ... त्यांनाही प्रॉब्लेम असणारच ...
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी... दुसर्यांच्या शंका सल्ला देऊन निरसन करणे सोपे असते पण स्वतः वर वेळ आली की त्या सल्ल्या तील फोल पण जाणवते ...
आत्महत्या हे त्या प्रॉब्लेम चे solution नक्कीच नसते ...
व पु म्हणाले तसे ... प्रॉब्लेम्स कोणाला नसतात ? प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तीनही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
माणूस जेंव्हा एकाकी होतो तेंव्हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो... दुःखात असताना अश्रू मोकळे करायला खांदा नसेल किंवा मन मोकळे करण्या साठी विश्वासातील व्यक्ती मिळाली नाही की असे टोकाचे पाऊल उचलले जाते.
मग प्रश्न असा पडतो जर सामान्य मनुष्य असे प्रश्न निर्माण झाले की विश्वासाने संता कडे पाहतो तर मग अशा वेळेस संतांनी कोणा कडे पाहावे ?
संता ना ही संतांची गरज असेल का ? एकूण हे सगळेच आपल्या आकलन शक्ती च्या पलीकडे आहे ...
शेवटी वामनराव पै म्हणाले तेच खरे आहे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ... Your Thoughts creates your Destiny !!!
- बिपीन कुलकर्णी

No comments:
Post a Comment