काल पुण्यात
वर्धापन दिन समारंभात दादर च्या पुला खाली फुले विकून करोडोपती झालेल्या नेत्याने
" पुनश्च हरी ओम " ची आरोळी दिली ... त्याच वेळेस त्यांच्या सर्वोच्य
नेत्याने पुणेरी पगडी हद्दपार करण्याचे आदेश दिले ....
पुणेरी पगडी
म्हंटले की लोकमान्य डोळ्या समोर येतात ... पण योगायोगाने " पुनश्च हरी ओम
" हा पण टिळकांचा गाजलेला अग्रलेख !!
लोकमान्याना
सहा वर्षे मंडाले मध्ये कारावास घडला होता .... तेथून येई पर्यंत वय वाढले होतेच
आणि अनेक व्याधींनी शरीरी त्रस्त झाले होते , पण मनाची उमेद खचली नव्हती.
भेटायला
येणारा प्रत्येक जण "पुढे काय करायचे
?" विचारीत
होता ...
त्या वेळेस
टिळकांनी सगळयांना जे उत्तर दिले ..तेच
त्यानी केसरीतील अग्रलेखात लिहिले
होते ... त्या अग्रलेखांचे नाव होते " पुनश्च हरी ओम "
लोकमान्य
त्यात म्हणतात ...
"ज्या मार्गाने आपणास जावयाचे आहे तो साफ आहे की नाही हे प्रथम पाहावे
लागते , वैदिकांची
अशी एक पद्धती आहे , रस्त्यातून
जावयाचे म्हणजे आपल्या पंचपात्रातील पळीभर पाणी पुढे टाकुन रस्ता शुद्ध करावा व मग
पुढे पाऊल टाकावे "
"पंचपात्रातील पळीभर पाणी" हा फक्त वाक्य प्रयोग आहे त्या मागे मनुवादी किंवा प्रतिगामी विचारसरणी
म्हणायचा कोणी प्रयत्न करू नये ... त्या वाक्य प्रयोगा मागील उद्देश काळाला तरी
पुरे ...
लोकमान्य
स्वातंत्र्या करिता मंडालेच्या कारावासात गेले होते .... आणि आपले आजचे नेते
भ्रष्टाचारा च्या आरोपा मुळे .....
मंडाले हुन
आल्या नंतर सर्वस्व गमावलेल्या लोकमान्यांनी "पुनःश्च हरी" ओम म्हणणे
आणि ED ने सगळ्या मालमत्ता वर टाच आणून जप्त केल्या नंतर
थाटात " "पुनःश्च हरी ओम " म्हणणे यात किती मोठा विरोधाभास आहे ...
असो ...
शेवटी तथाकथित पुरोगामी विचारसरणी अंगिकारलेला पक्ष आहे ...ज्या नेत्यांची हयात वेगळ्या पक्षांची झूल अंगावर चढविण्यात गेली ती
मंडळी पगडी किंवा टोपी मतांच्या जोगव्या करता न फिरवीतील तरच नवल ...
- बिपीन
कुलकर्णी
No comments:
Post a Comment