Wednesday, June 13, 2018

मनाचे वैभव !!!


मनाचे वैभव !!!

आपल्या समाजात संतांचे स्थान खूप मोठे आहे, सामान्य माणसाला जगण्याचे बळ संत वांग्मय आणी संत विचारातून मिळत असते.
सामान्य माणूस मन ,विचार आणि भावनेच्या गुंत्यात सतत अडकलेला असतो , थोडक्यात काय तर विचारां पासून भावनां  पर्यंतचा प्रवास सतत आणि नकळत चालू असतो  ... बहुतेकांना आपण या गुंत्यात अडकलो आहोत हेच मुळी कळत नसते ... कारण विचारांच्या पुढे बुद्धी तोकडी पडत असते ... आणि मग मनःशांती हरविल्याची कल्पना  यायला  लागते  ....

भावना आणि विचारांचा गुंता सुटला तर नक्कीच मनःशांती मिळते , पण ते तितके सोपेही नसते आणि ठरविले तर अवघड पण नसते ... हा गुंता सोडविण्यास  संतांची शिकवण आणि विचार मोलाची  मदत करीत असतात ..कदाचित त्या मुळेच संतांना समाजाचे दीपस्तंभ म्हंटले जाते. .
त्यांची  विचार करण्याची पद्धती , प्रत्येक गोष्टी कडे पाहण्याची तटस्थता, आचार विचार , अनुभव या सगळ्या गोष्टी सामान्य माणसा पेक्षा खूपच निराळ्या असतात ...
मुख्य म्हणजे अध्यात्माचा पाया पक्का असतो , अध्यात्म म्हणजे काय ?   ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतः चे  आत्मपरीक्षण, त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ समजुन घेणे  आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण करणे .
अध्यात्म म्हणजे भक्ती असा गैरसमज काही लोक निर्माण करून घेतात ...

ज्या संतांनी इतके दिवस हजारो लोकांना मार्ग दाखविला , कदाचित त्यातील बऱ्याच जणांना आत्महत्ये पासून परावृत्त केले असेल तेच  राष्ट्र संत आत्महत्या करून मृत्युला कवटाळतात तेंव्हा  सामान्य माणसाने काय विचार करायचा ?
संत अथवा गुरु  हा पण शेवटी माणूसच आहे ...भावनांचा कल्लोळ त्यांचा पण होतच असणार  ... त्यांनाही प्रॉब्लेम असणारच ...
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी... दुसर्यांच्या शंका सल्ला देऊन निरसन करणे सोपे असते पण स्वतः वर वेळ आली की त्या सल्ल्या तील फोल पण जाणवते ...

आत्महत्या हे त्या प्रॉब्लेम चे solution नक्कीच नसते ...

व पु म्हणाले तसे ... प्रॉब्लेम्स कोणाला नसतात ?  प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तीनही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

माणूस जेंव्हा एकाकी होतो तेंव्हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो... दुःखात असताना अश्रू मोकळे करायला खांदा नसेल   किंवा मन मोकळे करण्या साठी विश्वासातील व्यक्ती मिळाली नाही की असे टोकाचे पाऊल उचलले जाते.

मग प्रश्न असा पडतो जर सामान्य मनुष्य असे प्रश्न निर्माण झाले की विश्वासाने संता कडे पाहतो तर मग अशा वेळेस संतांनी कोणा कडे पाहावे ?

संता ना ही  संतांची गरज असेल का ? एकूण हे सगळेच  आपल्या आकलन शक्ती च्या पलीकडे आहे ...

शेवटी वामनराव पै म्हणाले तेच खरे आहे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"    ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ... Your Thoughts creates your Destiny !!!


-
बिपीन कुलकर्णी



पुणेरी पगडी !!




काल पुण्यात वर्धापन दिन समारंभात दादर च्या पुला खाली फुले विकून करोडोपती झालेल्या नेत्याने " पुनश्च हरी ओम " ची आरोळी दिली ... त्याच वेळेस त्यांच्या सर्वोच्य नेत्याने पुणेरी पगडी हद्दपार करण्याचे आदेश दिले ....

पुणेरी पगडी म्हंटले की लोकमान्य डोळ्या समोर येतात ... पण योगायोगाने " पुनश्च हरी ओम " हा पण टिळकांचा गाजलेला अग्रलेख !!

लोकमान्याना सहा वर्षे मंडाले मध्ये कारावास घडला होता .... तेथून येई पर्यंत वय वाढले होतेच आणि अनेक व्याधींनी शरीरी त्रस्त झाले होते , पण मनाची उमेद खचली नव्हती.
भेटायला येणारा प्रत्येक जण "पुढे काय करायचे  ?" विचारीत होता ...
त्या वेळेस टिळकांनी सगळयांना जे उत्तर दिले ..तेच  त्यानी  केसरीतील अग्रलेखात लिहिले होते ... त्या अग्रलेखांचे नाव होते " पुनश्च हरी ओम "

लोकमान्य त्यात म्हणतात ...

"ज्या मार्गाने आपणास जावयाचे आहे तो साफ आहे की नाही हे प्रथम पाहावे लागते , वैदिकांची अशी एक पद्धती आहे , रस्त्यातून जावयाचे म्हणजे आपल्या पंचपात्रातील पळीभर पाणी पुढे टाकुन रस्ता शुद्ध करावा व मग पुढे पाऊल टाकावे "

"पंचपात्रातील पळीभर पाणी" हा फक्त वाक्य प्रयोग आहे त्या  मागे मनुवादी किंवा प्रतिगामी विचारसरणी म्हणायचा कोणी प्रयत्न करू नये ... त्या वाक्य प्रयोगा मागील उद्देश काळाला तरी पुरे ...

लोकमान्य स्वातंत्र्या करिता मंडालेच्या कारावासात गेले होते .... आणि आपले आजचे नेते भ्रष्टाचारा च्या आरोपा मुळे .....

मंडाले हुन आल्या नंतर सर्वस्व गमावलेल्या लोकमान्यांनी "पुनःश्च हरी" ओम म्हणणे आणि ED ने  सगळ्या मालमत्ता वर टाच आणून जप्त केल्या नंतर थाटात " "पुनःश्च हरी ओम " म्हणणे यात किती मोठा विरोधाभास आहे ...

असो ... शेवटी तथाकथित पुरोगामी विचारसरणी अंगिकारलेला पक्ष आहे  ...ज्या नेत्यांची हयात  वेगळ्या पक्षांची झूल अंगावर चढविण्यात गेली ती मंडळी पगडी किंवा टोपी मतांच्या जोगव्या करता न फिरवीतील तरच नवल ...

- बिपीन कुलकर्णी



Sunday, June 10, 2018

नमो रुग्णांना विनंति ....




पंतप्रधान द्वेष सध्या जोरात आहे ...पंतप्रधानांच्या कार्यपद्धती किँवा निर्णयाच्या बाबतीत भिन्न मते असणे साहजिक आहे आणि त्यात गैर असे काही नाही ... विचार स्वातंत्र्य आम्हाला घटनेने दिलेला अधिकार ... त्या मुळे प्रत्येकाला भक्त किंवा रुग्ण होण्याचा अधिकार आहेच....( आम्हाला निष्पक्ष राहता येत नसते ) भक्तांनी जसे प्रेमात वाहवत जाऊ नये ... तसेच रुग्णांनी आपण कुठली पातळी गाठतोय याचे भान ठेवावे !!
पण एक नक्की आहे ... भक्तांच्या प्रेमा पेक्षा ... रुग्णांचा द्वेष फार मोठा आहे ... कारण एकदा द्वेषच करायचे ठरवले की मग कावीळ झालेल्याला  रुग्णा सारखे सगळे  पिवळे दिसायला लागते ... आणी मग द्वेष करण्या करीता कोणालाहि वादात ओढले जाते ..

बगळ्या सारख्या निर्भीड पत्रकारांचा द्वेष तर स्वातंत्र्य वीरा ना वादात ओढण्या पर्यंत जातो ...
स्वतः ची लायकी काय आपण बोलतो किती ?
ज्याची कुवत स्विमिंग पुला मधील उडी इतकी देखील नाही त्याला स्वातंत्र्य वीरांची मासेर्लिस बंदरातील उडी किँवा त्यांचे देश प्रेम कसे समजणार ?

बगळ्या सारख्या ज्याची हयात सुपर  मार्केट मधुन तेल आणण्यात गेली त्यांना कोळु ओढायला कीती कष्ट पडतात  हे समजण्याची बौद्धिक पातळी असुच शकत नाही   ...
आहे लेखन स्वातंत्र्य म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला !!!
स्वातंत्र्य वीरा चे विचार समजण्याची आपली कुवत आणि लायकी नाही ...
स्वातंत्र्य वीरा ना यात खेचू नका ... तुम्ही ज्या पक्षाची तळी उचलता त्या  पक्षाच्या नेत्यांनी कारावास म्हणजे आजूबाजूला दोन तक्के घेऊन पुस्तके वाचत किंवा लिखाण करत कारावास भोगला ....त्यांना अंधार कोठडीतले ... तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारे सावरकर कसे समजू शकतील ? हे म्हणजे झोपलेल्याला उठवु शकतो पण झोपे चे सोंग घेतलेल्याला नक्कीच नाही ... ही सगळी तथाकथित पुरोगामी मंडळी झोपे चे सोंग घेतलेली .. ढोंगी !!

... इतिहासातून सावरकर कींवा इतर मंडळींना आणुन आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवु नका ... ही हात जोडुन विनंती !!

कृपा करून आपण रुग्ण आहात ..रुग्णच  राहा दुसरे वर्तमान  विषय घेऊन आपले आजार पण दाखवा !!
मुन्ना भाई सारखा जादु की झप्पी देणारा तुम्हाला लवकर भेटो ... गेट वेल सुन !!!

ता . - रुग्ण म्हणु शकतात सध्या पंतप्रधान कै नेहरू चे नाव घेऊन आरोप करत असतात तर त्यांना माझे उत्तर ....नेहरू हे माजी पंतप्रधान होते ... पंतप्रधान ही व्यक्ती राष्ट्रा च्या जडण घडणीला जबाबदार असते... त्या मुळे कुठलाही पंतप्रधान चर्चेत येणारच ...मग ते नेहरू असतील किँवा भविष्यात विद्यमान पंतप्रधान ...
असे कुठलेही घटनात्मक पद स्वातंत्र्य वीरांकडे नव्हते !!!

(मासेर्लिस बंदरामध्ये दि. जुलै १९१०च्या रात्री 'मोरया' बोट थांबली आणि दि. जुलै १९१० या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोलमधून त्रिखंडात गाजलेली उडी मारली आणि इंग्रजांच्या हातून निसटून जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.
त्याच मार्सेलीन शहराचे हे रेल्वे स्टेशन ... गेल्या वर्षी कान्स हुन मोनॅको ला जाताना योगायोगाने ह्या शहराचे दर्शन झाले .... )
🙏🙏🙏🙏

बिपीन कुलकर्णी