Tuesday, July 4, 2017

अशीही एक रोजनिशी






"अशीही एक रोजनिशी "                                                                                       4 July 2017

आज सकाळी अंमळ उशिराचच  उठलो , तोंडधुवून नेहमी प्रमाणे चालायला गेलो.
रोजच्या रस्त्याने फिरत असताना आज  संघाच्या शाखे कडे लक्ष गेलेपुढे आलो शिवसेनेची शाखा दिसली ... आज मनात वेगळाच विचार आला " अरे च्या इतकी वर्षे झाली पण शिवसेना असो किंवा संघ असो त्यांच्या शाखेवर नित्य नेमाने येणारी तरुणप्रौढ किंवा वृद्ध पिढी आहे " आपल्या सेवादलाचे असे का नाही झाले ?

आज झाले तरी काय ? स्वतः अपयशाचा विचार मनात कसा काय आला ? मनात आलेला विचार मी लगेच झटकून टाकले  , आणि आजच्या लेखात या हिंदुत्व वाद्यावर काय तोंडसुख घ्यायचे याचा विचार करू लागलो.... विचारात घर कधी आले कळालेच नाही ...

घरी आलो , बायकोने चहा दिला , पण नेहमीप्रमाणे बिस्कीटे नव्हती  , तिला विचारले तर ती म्हणाली आज आषाढी एकादशी उपास आहे ... तिला मी सांगितले मी  इहवादी विचारसरणी अंगिकारली हे माहिती नाही का तुला ? ह्या असल्या गोष्टी आम्ही मानत नाही ....

अरेच्या हि उपास किंवा आषाढी एकादशी करते म्हणजे काय ... झाले  तरी काय ? बहुतके तिच्या मैत्रिणीनि हिंदुत्ववादी विचार तिच्या मनावर बिंबविलेले दिसतात...

परत तो विचार झटकून मी पेपर मध्ये डोके खुपसले ... आणि आजच्या लिखाणाला विषय शोधायला लागलो ....

लक्ष स्वयंपाक घरात जात होतेतिची खिचडीची , थालीपीठाची आणि इतर पदार्थाची तयारी चालू होती ....

मी बातम्या वाचत होतो ..." नितीश कुमारांचा चा राष्ट्रपती निवडणुकीत NDA ला पाठिंबा " " अरविंदा चा अजून एक आमदार भ्रष्टाचारात अडकला "  नेहमी च्या सवयीने या बातम्या कडे दुर्लक्ष करून मी हिंदुत्ववाद्यांच्या बातम्या शोधायचा प्रयत्न करत होतो.

तेव्हड्यात स्वयंपाक घरातून पदार्थाचा घमघमघाट येऊ लागला...

बायकोने आतूनच विचारले " तुम्हाला पोळी भाजी करते ? "

मी तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि पेपरात डोके खुपसून बसलो.... नाकात जाणाऱ्या वासा मुळे पेपरात लक्ष लागत नव्हते .... विषय शोधणे महत्वाचे होते ...

बायकोने परत ओरडून विचारले तसे मी तिला सांगितले ....  " तुला वेगळ्या स्वयंपाकाचा त्रास नकोम्हणून मी पण उपासचेच खाईन , तसे मी काही एकादशी वगैरे मानत नाही "

बायको बाहेर येऊन गालात हसली .... काय झाले तिला ? अशी का हसली ... मी दुर्लक्ष केले...

दुपारी हे पदार्थ खाऊन जरा आडवा झालो तर चॅनेल मधून फोन आला ? सर आज चर्चेला येत आहात ना "

मी  विचारले विषय काय आहेतर त्यांनी सांगितले " संघ आणि  शिवसेनेच्या  शाखा शहर आणि ग्रामीण भागात वाढत असताना सेवा दलाच्या शाखा का बंद झाल्या ?"

आजचा दिवस असा का आहे ? सगळेच असे का घडते आहे ...

मी त्या चॅनेल वाल्या बाईला नेहमी प्रमाणे शांत आवाजात सांगितले " मला आवडले असते यायला , पण आज माझी तब्येत बरी नाही , आवाज बसला आहे , जास्त बोलता पण येत नाही "

जास्त विचार ना करता उद्याच्या लेखा वर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत बसलो ...


बिपीन कुलकर्णी



Monday, July 3, 2017

ढोंगी ....


ढोंगी ....                                                                                                                                                                                                                                                                                                जुलै २०१७

सोशल मेडिया वर स्वतः ला समाजसेवक म्हणून घेणारे काही लोक रोज  पंतप्रधान मोदी विरोधात काही ना काही लिखाण करीत असतात... घटने प्रमाणे प्रत्येकाला विचार आणि लेखन स्वातंत्र्य आहे त्या मुळे त्यांनी लिहू नये या विचाराचा मी नाही.... पण आपण जे काही लिहितो हे " अति झाले आणि हसू आले " या प्रकारात हळू हळू मोडत चालले आहे याची या समाजसेवकांनी तसेच त्या विचार सरणीच्या लेखक , पत्रकार किंवा संपादक  मंडळींनी  दखल घेण्याची वेळ आली आहे.... त्यांच्या सवयी प्रमाणे ते दखल घेणार नाहीत हे मी धरून चालतो...

विरोधा करिता विरोध हेच जर का आयुष्याचे तत्व असेल तर यांच्या विचारांना शुभेच्छा....

या लोकांवर एकूणच समाजवादी विचार सरणीचा पगडा आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. समाजवादी विचारसरणी वाईट नाही तशी कुठलीही विचारसरणी वाईट नसते .... वाईट असते असते ती आत्मकेंद्रित वृत्ती...

मी संघवादी , गांधीवादी किंवा एकूणच कुठला वादी नसून फक्त भारतवादी आहे .... मिळणाऱ्या पगारातील २०-३०% टॅक्स भरून  देशाचे कल्याण व्हावे एव्हढीच  मनापासून अपेक्षा करणारा साधारण पामर .... देश पुढे जावा हीच इचछा .... आज जर एखादी व्यक्ती  देशाला पुढे नेण्या करिता झटत असेल , तरुणा पासून वृद्धा पर्यंत , सुशिक्षिता पासून अशिशक्षिता पर्यंत प्रत्येकाला विश्वास वाटावा अशा गोष्टी करती असेल .... तर बिघडले कुठे ?

याच अपेक्षेने आमच्या आधीच्या पिढीने तुमच्यावर पण विश्वास टाकून दिली होती ना सत्ता तुमच्या हातात १९७७ ला?   .... काय केलेत तुम्ही ? ... अंतर्गत लाथाळ्यां चा उत्तम नमुना दाखविलात भारतीय राजकारणा ला.... आपल्याला जे जमले नाही ते इतरांना जमू शकले असे अश्वथाम्याच्या कपाळावरील भळभळणाऱ्या जखमे चे  दुःख आहे तुमचे....

समाजवादी  विचार पुढच्या पिढीत रुजवू शकले नाही आणि एकूणच पुढची पिढी त्या विचारांची घडली नाही हे समाजवादाचे ढळढळीत अपयश... या अपयशाची जी काही कारणे आहेत त्या बाबतीत  हे लोक अनभिज्ञ आहेत असे नाही , पण स्वतः चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हि वृत्ती अंगी जोपासली कि सगळेच जमून येते...

समाजवादी पक्षाला फुटीचा शाप आहे .... स्वातंत्र्या नंतर सतत त्याची शकले होत गेली... याला कारण काही  नेते आणि त्या बरोबरीने  हि सगळी  वाचाळ मंडळी जी अतिशय आत्मकेंद्रित होती आणि आहेत…  हे लोक स्वतः ला पुरोगामी म्हणवून  घेतात .... पुरोगामी म्हणजे माणसाला माणसा सारखे वागवणे , म्हणजेच इतरांच्या मताचा आदर करणे ... हे कसले पुरोगामी  हे तर सगळे ढोंगी....

यांच्या मते  दुसर्याच्या मताला किंमत शून्य....मी म्हणेल तीच पूर्वदिशा .... मला जे आवडेल तेच तुम्ही बोलावे किंवा लिहावे ...  हा गेल्या ७०-७५ वर्षाचा इतिहास आहे...इतिहासा कडे मी येतो पण त्या पूर्वी याची प्रचिती आपल्याला  रोज निरनिराळ्या चॅनेल वर चर्चा पाहताना दिसून येते , हि मंडळी त्या चर्चां मध्ये इतरांच्या मताचा किती आदर करतात? त्या चर्चे मधील कंपू ने आधीच त्या दिवशीचे "लक्ष्य" ठरविलेले असते आणि मग सुरु होतो शिकारीचा खेळ... तो कार्यक्रम पाहणारी जनता दूधखुळी नसते .... 

स्वतःची विचारसरणी गुंडाळून ठेवून सतत समझोते करण्यात यांची हयात गेली , आज पंतप्रधानांचे दोष दाखविण्या करिता यांचे काँग्रेस प्रेम ऊतू जाते.... कै  नेहरूंचे कौतुक करण्या करिता यांचे शब्द संपत नाहीत....जर नेहरू इतके महान होते तर त्यांची महानता समजण्या करिता तुम्हाला इतका काळ का लागला ?

इतिहास सांगतो यांचे लक्ष विधायक कामा पेक्षा समझोत्या वर जास्त होते , कामा पेक्षा प्रसिध्दीभिमुख विचारसरणी...

गांधीजी आणि डॉ लोहिया मधील झालेला संवाद याची साक्ष देते,
गांधीजी नि एकदा बोलत असताना लोहियांना ना विचारले " डॉ साब तुम लोग इतनी दौडधुप करते हो , मगर तुम्हे सफलता क्यू नही मिलती ? कभी सोचा है ?"
डॉ म्हणाले " नही बापूजी आप हि बताओ"
गांधीजी म्हणाले " मेरा उसका उत्तर है चरित्र ! तुम लोग जो जीवन मे बोलते हो , उसका प्रत्यक्ष जीवन मे आचरण का प्रयास नही होता ! इससे सब तुम्हारा गलत हो जाता है " (वाचा मी एस एम पान . ३१९)

समाजवादी नेत्या मध्ये किंवा एकूणच मंडळी मध्ये , वादविवादा मध्ये मुद्दा समजावून सांगण्या पेक्षा मुद्द्याला बगल देऊन फाटकारून वागण्याची एकूण सवय पूर्वापार चालत आली आहे. (वाचा मी एस एम पान . ३१९)

हे आपण आजही पाहतो...  कुठला तरी मुद्दा घेऊन काही तरी उथळ पणे बोलायचे किंवा लिहायचे .... कोणी आपला मुद्दा तार्किकपणे खोडून काढला तर त्याला उत्तर द्यायचे नाही ... किंवा त्याच्यावर ओरडून गप्प करायचे...

एस एम त्यांच्या पुस्तकात म्हणतात , प्रसिद्धी संघर्षा शिवाय मिळत नाही , प्रसिद्धी करिता आम्ही काही संघर्ष केले .... गांधीजींचा सत्याग्रह आम्ही अगदी राजगिऱ्या च्या भाजी इतका स्वस्त करून टाकला , सगळा जोर पब्लिसिटी वर ....हा पक्षाचा मोठा दोष.. (पान . ३२० )

इतिहासाची पुनरावृत्ती आजही होतेच आहे ना ... प्रसिद्धी करिता हपापलेली हि मंडळी आज तरी वेगळे काय करीत आहेत.... त्यांचे लिखाण म्हणा किंवा चॅनेल वरील चर्चा याचीच साक्ष देतात….

समाज वादी चळवळीत जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, आचार्य नरेंद्र देव ह्यांच्यानंतर अशोक मेहता, राम मनोहर लोहिया, युसुफ मेहेरअली, एसेम जोशी, ना. . गोरे, मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडीस असे एकाहून एक मोठे नेते निर्माण होत गेले.... त्यांचे कर्तृत्व आभाळा एव्हढे होते ... त्यांच्या पुण्याई वर किती वर्षे पक्ष चालवणार .... एक गोष्ट महत्वाची हे जरी थोर नेते असले तरी  दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या सर्व नेत्यांना समाजवादी पक्ष एकत्र टिकवण्यात मात्र अपयश आले... या अपयशाची कारणे वर आलीच आहेत...

पूर्वजांच्या चुका ओळखल्या तरच आपली प्रगती होत असते या उक्तीवर त्यांचा विश्वास नाही... राष्ट्रीय किंवा राजकीय राजकारणातील त्यांचे अस्तिव याचीच साक्ष देतात….. मग अस्तित्व दाखविण्या करिता सुरु होतो सगळा न खेळता येणारा  डोंबाऱ्याचा खेळ...    

आज राहिलेले लालू प्रसाद , नितीश कुमार किंवा मुलायम सिंग स्वतः ला समाजवादी तर म्हणवतात पण समाजवादी विचारांशी त्यांनी केंव्हाच फारकत घेतली आहे .... त्यांच्या पक्षात असलेले व्यक्तिस्तोम समाजवादी सिध्दांतांच्या ठिकर्या उडवते   ...

सरकार कोणाचेही असू देत म्हणजे काँग्रेस अथवा भाजप या लोकांना एक आवई उठवून द्यायची खोड  आहे " देशात भयानक परिस्थिती आहे " किंवा " लोकशाही धोक्यात आहे ".... एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आमची लोकशाही इतकी लेचीपेची नाही कि कुठलेही सरकार तिला धक्का लावू शकेल.... राहता राहिला प्रश्न देशात भयानक परिस्थितीचा  , तर मग काय १९७७- १९७९ देशात राम राज्य होते का ?

सरकार विरोधी पक्षाशी आकसाने वागते हे एक अजून पालुपद असते .... काँग्रेस किंवा भाजप सरकारने आज पर्यंत कुठल्याही माजी पंतप्रधाना ला आकसाने अटक केली नाही पण तुम्ही १९७७ ला इंदिरा गांधींना जी अटक केली त्याला आम्ही आकस नाही तर काय सहानभूती म्हणायचे का  ?

आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हि वृत्ती बदलण्या ची आणि पक्षाला वाचविण्याची वेळ आली आहे  ...दुसऱ्यांच्या चुका काढत आपले  अस्तित्व अधोरेखित करण्या पेक्षा स्वतः चे सिंहावलोकन करणे महत्वाचे ....

सरकारने महात्मा गांधी ना महत्व दिले कि यांच्या अंगाचा तिळपापड होतो , एक गोष्ट विसरतात महात्मा गांधी देशाचे राष्ठ्रपिता आहेत ... कुठल्याही पक्षाची खाजगी संपत्ती नव्हेत ....

काही प्रश्न या सर्व मंडळींना विचारावे वाटतात, त्यांच्या कडून उत्तराची अपेक्षा नाही... कारण सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही...

सरकारची बाजू घेऊन बोलणार्यांना तुम्ही भक्त म्हणून हिणविता , भक्त म्हणजे " भंगवंताचे होऊन राहणे " इथे भगवंत म्हणजे ईश्वर .... एखाद्याला भक्त म्हणतांना नकळत तुम्ही ईश्वराचे अस्तित्व मान्य करून तुमच्या इहवादी विचारसरणी ला तिलांजली देत नाही का ?  ७० ते ७५ वर्षाच्या इतिहासात तुम्ही तुमचे अनुयायी का जमवू शकला नाहीत ? पुढच्या पिढीत तुमचे विचार का नाही पोहोचले ? समाजसेवक किंवा निर्भीड पत्रकार म्हणून कधी तुम्ही काही प्रश्न तुमच्या लाडक्या अरविंदा ला विचारताना कधीच का  दिसत नाही?  ? याला अप्पलपोटी म्हणायचे नाही तर काय ? भारतीय पंतप्रधानाच्या कपडे किंवा इतर राहणी मानावर टीका करीत असताना तुमची काय अपेक्षा आहे , जगातील सर्वात मोठ्या लोकशाही च्या पंतप्रधानाने तुमच्या सारखे कुडता घालून खांद्याला झोळी अडकवून फिरावे ? राहता राहिला शेवटचा अंतू बर्वा मधील प्रश्न ,   " तुमची श्रद्धेची स्थाने तरी कोणती ?

बिपीन कुलकर्णी