पु लं च्या चष्म्यातून - ३० ऑक्टोबर
व्यक्ती चित्र म्हंटले कि पु ल आणि व पु आपले आदर्श!! दोघांची शैली सरस्वी भिन्न पण तरी दोघेही भन्नाट.....तसा भन्नाट शब्द कमी.... त्याला खरा शब्द म्हणजे अगदी आपल्या गुप्तेंचा अवधूत म्हणतो तसं चाबूक लिखाण.
व्यक्ती आणि वल्ली ची किती जरी पारायणे केली तरी कधीही कंटाळा न येणारे पुस्तक, एकदा पु लं ना एका मुलाखतीत विचारले होते कि जर या सगळ्या व्यक्ती तुम्हाला कधी भेटल्या तर तुम्ही काय करताल? तर पु लं म्हणाले कि मी त्यांना कडकडून मिठी मारेन....अहो त्या सगळ्या व्यक्ती होत्या काय आहेतच तश्या...नारायण म्हणा अथवा अंतू बरवा काय किंवा सखाराम गटणे असो नाही तर चितळे मास्तर....पु लं ची भाषा शैली ग्रेटच...
पूर्वी मला असे वाटायचे कि अशा व्यक्ती फक्त पुस्तकात असतात, खर्या आयुष्याततुम्हाला आम्हाला कधी भेटत नसतात ? पण विचार केल्या नंतर असे लक्षात आले वस्तुस्थिती तशी नाही , कारण असे खूप लोक आपल्या आजू बाजाला वावरत असतात पण आपण कधी त्या दृष्टीने त्यांच्या कडे पाहत नाही, आणि मुख्य म्हणजे आपण काही पु लं किंवा वपू नाह्ही कि लगेच त्यांच्या वर कथा किंवा कादंबरी लिहू शकू...मला तरी वाटते कि ती एक दैवी देणगी आहे....
याच्या वरून मला एक जुनी आठवण झाली आम्ही तेवा कॉलेज मध्ये होतो, आणि सगळ्या मित्रानी सायकल वरून औरंगाब्द पासून जवळ वेरूळ च्या लेण्या आहेत तिथे जायचे ठरवले ठरल्या प्रमाणे आमचा १५ -२० जणांचा ग्रुप जाऊन आम्ही संध्याकाळी परत आलो ...आल्या नंतर आमच्या कॉलोनी मध्ये एक असेच अति उत्साही काका होते त्यांनी आमचा कौतुक सोहोळा ठेवला....तेवा त्यांनी आम्हाला जो काही प्लान सांगितले ते ऐकून आमची परिस्थिती म्हणजे एखाद्या आघाडीच्या दिग्दर्शकाने उद्या जर का मल्लिका शेरावत ला जर पूर्ण सिनेमा भर साडी नेसायचा सांगितल्यावरजशी होईल अगदी तशीच....कारण त्यांचे म्हणणे असे होते...आता तुम्हाला सायकलिंग ची चांगली सवय झाली आहे (किती जाऊन आलो? तर जाऊन येऊन ४० KM ....) तर आता आपण सायकली घेऊन जायचे ते थेट चीन ला !!!!!!! ते हे इतक्या सहज पणे सांगत होते....इथून दिल्ली....तिथून लदाख...आणि मग काय पुढे चीन!!!!!! काकांचा उद्देश खूप चांगला होता हो, त्यांना नवीन तरुण पिढी घडवायची होती पण म्हणतात न नुसते आचरेकर सर असून उपयोग नाही त्यांना सचिन पण भेटायला पाहिजे!!!! या बाबतीत आम्ही सगळे प्रवीण आमरेच!!!
तसेच आमचे अजून एक काका आहेत...आमच्या औरंगाबाद शहराचे चालते बोलते gprs म्हणा ना !!!!....तुम्ही शहरातला कुठलाही पत्ता विचार त्यांच्या स्वतःच्या काही खाणा खुणा ठरलेल्या, पहिल्यांदा तुम्हाला समजणार नाही पण नंतर त्यातली मजा कळेल....आता उदाहरण म्हणून सांगतो ते म्हणतील " ते बाळाराम शिंप्याचे दुकान तुला माहिती ना? आपण मुंजीचे कपडे शिवले होते ते? ( आता तुम्हाला वाटले मुंजीचे कपडे म्हणजे माझ्या किंवा माझ्या मुलाच्या)....पण ते सांगत असतात त्यांच्या मुंजीचे कपडे शिवलेले दुकान!!!!
या काकांचा सगळ्यात विक point म्हणजे देवळे...तुम्हाला गुगल अर्थ काय किंवा कुठल्याही सर्च इंजिन वर सापडणार नाहीत इतकी औरंगाबाद मधील देवळांची खडान्खडा माहिती त्यांच्या पद्धतीने पत्त्यानसहित सांगतील....
आता प्रत्तेक शहरात वाडे पाडून मोठे मोठे towers झाले आहेत...पण यांच्या प्रत्तेक पत्त्यात त्या जुन्या वाड्यांचा उल्लेख असतो....
यातला विनोद बाजूला ठेवला तर सांगा ना, आज काल प्रत्तेक शहरात "वाड्यांना फ्लेट पण देणारी माणसे” असताना ..पुढच्याच काय पण आमच्या पिढी ला तरी शहराच्या या जुन्या गोष्टी कशा कळणार!!! पण हे असे लोक आहेत म्हणूनच शहराच्या जुन्या संस्कृतीच्या पाउल खुणा जपून आहेत......
तसेच आमचे अजून एक लांबचे काका आहेत....कुठलेही लग्न कार्य किंवा एखादा कार्यक्रम म्हंटला कि त्यांच्या अंगात नारायण संचारतो....पण हा नारायण थोडासा वेगळा.... म्हणजे पार्ट II म्हणा ना...कारण काय आहे ना कि हे सगळी सूत्रे हातात घेवून लोकांना कामाला लावतील ..यांची गडबड विचारू नका....यजमान जर का थोडासा भिडस्थ असेल तर विचारूच नका....तो एक स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे...पुन्हा केवा तरी....
पण बघा ना पु लं नी ३० -४० वर्ष पूर्वी जसे लिहून ठेवले आहे तसे नारायण आपल्या कडे प्रत्तेक घरा घरात आहेत....मी यांना नारायण पार्ट II म्हणायचे कारण म्हणजे त्या नारायण ला थोडी कारुण्याची झालर होती.... पण त्या मानानी आज कालचे नारायण तसे हुशार.
बाकी काहीही असू देत पण अशा एकःद्या व्याक्ती शिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाह्ही ....... त्या जागी मग काका असतील, मामा असतील, आजोबा असतील किंवा अजून कोणी असेल कदाचित तुम्ही स्वतः असू शकता ......
माझा एक मित्र प्रशांत तो आहे रत्नागिरीचा ....गेले १५ वर्ष आम्ही पुण्यात राहतो...पण तो अजूनही प्रत्तेक खरेदी, म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात तसे पिन ते पियानो घेण्या करता कोकणातल्या माणसाचे दुकान शोधतो......लॉजिक एकच.... आपला पैसा कोकणात जायला पाहिजे!!!!! पुढे जाऊन हा नक्की अंतू बरवा होणार!!!!!
अजून एक मित्र सोलपुर चा....आम्ही जेवा पुण्यात नवीन होतो तेवा सगळे रूम मेट्स...सगळ्यान कडे स्कूटर्स....बाहेर जाताना हा गडी कधीही स्वतःच्या गाडी वर डबल सीट बसू देणार नाही.....त्याचे पण एक लॉजिक.....डबल सीट ला गाडी एव्रेज कमी देते!!!! आता बोला.....
तसाच माझ्या लहान भावाचा एक मित्र.....एकदा सायबर कॅफे मध्ये गेला....त्याचे जे काचेचे दार असते ना ते याने अक्षरशः ओलांडले...म्हणजे काचे मधून आर पार गेला...अशा कुठल्या गहन विचारात हि स्वारी होती....तेवा माझ्या लक्ष्यात आले कि आर्किमिडीज युरेका युरेका म्हणत उघडा का पळाला होता.....
एवढे सगळे होऊन हा गडी वर दुकान दाराशी भांडला....कि एवढी प्लेन काच का लावलीत?? आता बोला!!!!!! मग काय परम्पुज्या नि येऊन दुकान दाराला २५००० दिले तो भाग निराळा!!!!
अशी किती तरी चित्र डोळ्या समोर येतात, पण मी वर म्हणालोच आहे ना कि आपल्या कडे काही दैवी देणगी नाही, तर सांगायचा मुद्दा असा कि अशा बर्याच व्यक्ती आपल्या आजू बाजूला असतात...त्यांना पाहण्या करता फक्त आपल्यलाला पु लं चा चष्मा लावायला पाहिजे!!!!
कदाचित आपण पण कोणाला तरी त्या चष्म्यातून दिसू!!!!!
आज एवढेच व पु च्या चष्म्यातून पुन्हा केंवा तरी!!!!!!
Gharala Flatpan denari manase!! zakkas...
ReplyDeleteNice One...!!! Kharach ekda Chashma laun pahaylach hava.... :)
ReplyDeleteखूप छान लेखन . पु ल चा चष्मा मिळेल तेव्हा मिळेल … पण तुझ्या या कुलकर्ण्यांच्या चश्म्यामाधुनही चांगले व्यक्ती दर्शन होतेय की …. so keep it up..
ReplyDelete