२२ ऑक्टोबर २०१० "अश्विन पोर्णिमा"
गेले खूप दिवस झाले विचार करत होतो कि आपण काही तरी लिहावे...पण वाटायचे खरेच जमेल का, खूप वेळेला लिहायची जुळवणी केली , मनाशी विचार केला पण म्हणतात ना प्रत्तेक गोष्टीचा योग यावा लागतो !!! आता तुमच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येईल याला का एवढी लिहायची हौस? कोण वाचणार? पण लोकांना काय आवडते असले क्षुद्र विचार करत नसतात !!! जर का केले असते तर देव आनंद या वयात हिरो म्हणून सिनेमे काढत बसला नसता...मलिंगा नि मध्यंतरी केस लाल हिरवे करून घेतले नसते...शबाना आझमी ने डोक्याचा गोटा केला नसता.... हे विषयांतर झाले..
पण हा सगळा लिहायचा सोस कशा करता तर....जसे आपण नवी गाडी घेण्या पूर्वी एखादी गाडी चालवून हात साफ करून घेतो...तसेच हे लिखाण...कारण पुढे मागे जर का मला आत्मचरित्र लिहावे वाटले तर हात साफ असावा!! आता अत्म्चारीत्रा चा विषय निघालाच आहे तर सागतो ते पण लिहावे असे फार लहान पण पासून वाटते...याला कारण आमची मराठी शाळा...शाळेत निबंध म्हणून जो काही प्रकार असतो विचारू नका...काय काय निबंधांचे विषय...पुस्तका चे आत्मचरित्र, रेदिओ चे आत्मचरित्र, कुकर बोलू लागले तर... अहो हे तर काहीच नाही मला आठवते मी बहुतेक नववीत असेन तेंवा आम्हाला ग्रंथालयाचे आत्मचरित्र लिहून आणायला सांगितले....मलातरी असे वाटते कि त्या वयात हे सगळे विषय झेपाण्याच्या पलीकडे असतात आणि मराठी विषया बद्दल भीती निर्माण होते ती अशी ...पण नंतर हळू हळू जसा मोठा होत गेलो तेंवा विचार केला कि हे सगळे निबंध लिहायला आपल्याला आई आणि बाबांनी खूप मदत केली...आणि एका गोष्टीची जाणीव झाली कि आपल्या आई वडिलांचे वाचन चांगले होते म्हणूनच ते मदत करू शकले....मग असा पण विचार आला कि हे लोक शाळेचा सिलेबस करताना बहुतेक आई आणि वडिलांना गृहीत धरत असावेत!!!मध्यंतरी एकदा सकाळ मध्ये एक चिंटू चा एक फारच मार्मिक विनोद होता " चिंटूच्या शाळेची सहल जाणार असते, तेंवा त्याचे मित्र विचारतात चीतुला सहलीला येणार का? तो म्हणतो नाही रे बाबा... अरे ते आज सहल नेतील आणि उद्या निबंध लिहायला सांगितली "आमची सहल" ...तर हे निबंध लहान पण पासूनच मोठ्यान सारखे विचार करायला लावतात...पण यातून एक गोष्ट समजली कि पिढी बदलली तरी निबंधाची धास्ती बदलली नाही... असो तर अत्माचारीत्रा ने मी फार बाल वयापासून भारावालेलो होतो ...त्या नंतर कॉलेज मध्ये आणि नंतर खूप वाचन केले आणि जास्त करून चरित्रात्मक पुस्तके वाचली काही काही पुस्तकांनी खूपच भारावून गेलो
तेंवा वाटायचे कि आपल्याला पण या लोकां सारखे लिहिता यायला पाहिजे, मग मनाशी विचार करयचो कि जर का मी चुकून माकून आत्मचरित्र लिहिले तर नाव काय देईन....आजच्या प्रथे प्रमाणे काही नावे मनात यायची ती अशी - " जहाज विमान आणि मी" (ज्यांना माझे profession माहिती आहे ते समजून घेऊ शकतात) , कुन्देय (असमादिकांच्या आई चे नाव कुंदा) ,"प्रोफेसर च कार्टे" , काही इंग्लिश नावे पण मनात आली कारण परवा क्रॉस वर्ड मध्ये फिरताना अशी बरीच पुस्तके दिसली...एकाच नाव काय तर म्हणे चीकेन सूप नावावरून वाटले कि बहुदा रेसिपी बुक असावे तर ते वेगळेच!!! हु मुवड माय चिस?? खरे सांगा नवा वरून काय वाटते...मला तर वाटले लहान मुलांचे काही कॉमिक बुक असेल तर अहो ते managment बुक!!!! अहो इंग्लिश नावे परवडली अजून एक प्रकार आहे त्यात फक्त एकाच शब्द जसे कि - फ , क, ब्र हि नावे वाचून तरी ती बाराखडीची पुस्तके वाटतात....त्या मुळे आज काल पुस्तकाच्या नावाचा आणि आतल्या लिखाणाचा अर्थ अर्थी संबंध नसतो...तसा जर का लावायचा असेल तर जेवढा अक्टिंग आणि राखी सावंत चा आहे ... किंवा फार फार तर रोहन गावस्कर आणि क्रिकेट स्कॉरे चा आहे तेवढाच...आता माझ्या चरित्रात काय असेल? हा फार मोठा प्रश्न आहे, अहो तुमचे माझे आयुष्य तसे म्हंटले तर फार सरळ सोट हो!!! म्हणजे आपण काही कंदिलाच्या दिव्यात अभ्यास केला नाही, वार लावून जेवलो नाही, शाळे ची फी भरली नाही म्हणून आम्हाला शाळेतून काढले नाही....मग लिहिणार काय? म्हणून मग सध्या जो पर्यंत लोकांना आवडण्या सारखे आणि मुख्य म्हणजे ते सांगण्या सारखे आपल्या आयुष्यात काही घडत नाही तो पर्यंत अताम्चारित्र बाजूला आणि तो पर्यंत ब्लॉग जिंदाबाद!!!!
अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही वाचा किंवा नका वाचू या बाबतीत मी देवानंद ला माझा आदर्श मानलंय....त्या मुळे दर आठवड्याला मी काही तरी लिहित राहणार...
Sahii re .. zakas .. Todlas Mitra ;) ..
ReplyDeletetu lihit wagare asashil watalach nawata .. Kudos for the maiden blog !!
Apalya wachanacha pan likhanawar prabhaw asato .. Sanzgiri cha warasa nakki chalawashil :D .. ata dar athawadyala blog chi wat pahil ..
खूप छान, वेग-वेगळ्या उदाहरणामुळे अनेक आठवणीना उजळा मिळला...
ReplyDeleteलवकरच आत्मचरित्र लिहिण्यास सुरवात करावी, खात्री आहे ते खूप भन्नाट असेल...
अजित दिक्षित.
चिंटू चा जोक खास करून आवडला, चिंटू चे जोक हे सर्वानाच हसवतात.
ReplyDeleteउदा.: आज China sell करा म्हणतील आणि उद्या म्हणतील dont pickup the shpt
तुमच्या profession मधला एक...
very good keep it up, definitely vachanar ya pudhe asech uttam liha --rahul joshi
ReplyDeletezakkas!!! chhan lihile ahe....i never knew you also had a writer inside you!!! i specially liked - Jahaj, Viman ani Me!!!
ReplyDeleteKeep it up....keep writing and we will keep reading!!!
All the best!!
क्या बात क्या बात क्या बात ...कित्तेक वर्षा नंतर मराठीत काहीतरी वाचलंय मजा आली . आता तू ठरवलंच आहे कोणी वाह्चू अगर नाही तू लिहिणार तर continue राहूदे ... मी पण वाचेन .
ReplyDeleteसुधीर
सुंदरच लिहिलं आहेस, तुझ्या ह्या शैलीची नव्यानेच ओळख झाली. वाचायला खूपच छान वाटले.. तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट पाहते.
ReplyDeleteबंटी
Hey.. Dada.. Mastasch.. Eakdam Zakasssssss... Chan vatla re... Aplya bhavandat tu pan asa kahisa suru kela ahes. khup chan vatla aaj sakali sakali tuza blog lihun.... Keep it up....
ReplyDeleteAmhi nakki vachu. eakda ka vachaychi chatak lagli na.. ki sagle tuzya blog chi aturtene vat pahatil.. :-)All the Best...
Va va!!! Apratim... Don't seem like you are writing for the first time. Keep it up!! :)
ReplyDeleteI am following your blog...! Keep posting :)