विक्रम आणि
वेताळ १६-१२-२०१५
झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत, राजा विक्रमाने उचलले आणि , पाठीवर घेतले
आणि तो पुन्हां स्मशानाकडे
जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, का आयुष्यभर असा सैरभैर
झाल्या सारखा वागतो आहेस ,
तुझे आयुष्याचे ध्येय काय? तुला तरी माहिती आहे का ? तुझी
पण अवस्था चार चौघा सारखी होणार
हे नक्की !”. तुला त्या दोघांची गोष्ट सांगू का , माझ्या
मनात काही प्रश्न आहेत आणि ज्याची उत्तरे सापडलि नाहीत ?
विक्रमाचे
कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला त्या दोघांची ची गोष्ट
सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की
बोललास तर मी परत
झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच
वेताळ सांगु लागला;
एका
आटपाट नगरातील त्या दोघांची हि गोष्ट …
तो आणि ती म्हणजे वयाची
चाळीशी पार केलेल्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी , हि कहाणी त्या
दोघांचीच नाही तर त्या संपूर्ण
पिढीची … घरोघरी हीच कथा !
कथेची
सुरुवात त्याचे आवडते लेखक व पु काळे
यांच्या एका वाक्याने करतो -
" अंधारातील
प्रवासा साठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि त्याच वेळेस आपलाही हात कोणाला तरी हवा असतो "
राजा
या वरून तुला कल्पना आली असेल हि कथा एका
नवरा बायकोची …. रूढार्थाने ज्याला संसार म्हणतो तो अंधारातील प्रवासच
ना ?
एक
मराठी कुटुंब , ब्राम्हण म्हणणे योग्य होणार नाही कारण आजची पिढी या वेताळाला लगेच असहिष्णू म्हणेल….
मराठी
कुटुंबात चार चौघा सारखा वाढलेला … गरिबी नव्हती तसेच श्रीमंती पण नव्हती ? आई आणि वडील नुसतेच सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कृत …
वडिलांचा
धाक … धाक असा कि वडिलांशी बोलताना
त..
त.. प.. प
.. व्हायचे त्याचे, त्याला कारणही तसेच…
याचा
स्वभाव शांत … खोडकर तर अजिबात नाही…
पण अभ्यासात गती कमी … कमी म्हणजे काय तर कधी पहिल्या
५-१० मध्ये आला
नाही … त्या मानाने भावंडे हुशार त्यांनी पहिला नंबर चुकवला नाही … म्हणून शिक्षक आई वडिलांना तक्रार
करायचे… हाताची पाची बोटे कशी सारखी असणर ? करंगळी
ला जर का अंगठ्या
सारखे ताकतवान हो म्हणले तर
होऊ शकेल का ? असो
आई
चा फार जीव … आपले मुल थोडे वेगळे असले कि तीचा
जीव त्या मुला करिता जास्तच तुटतो ना …ती रडायची, समजवायची,
त्याचा अभ्यास घ्यायची … पण त्याला हे
आईचे आतल्या आत झुरणे कळायचे
नाही … कदाचित वय नसेल ते
…वडिलांनी
नकळत संस्कार केले … आयुष्य हा झगडा असतो
हे त्यांच्या कडे पाहून तो शिकला … आई
वडिलानी नकळत वाचनाचे संस्कार घातले....
आयुष्यात
याचे कसे होणार हे मोठे प्रश्नचिन्ह
होते ? आई वाडीला पेक्षा समाजालाच जास्त काळजी…
नावे
ठेवणारे आणि सल्ले देणारे खूप होते ?
पदवी पर्यंत शिक्षण घेवून हा नोकरी
ला लागला …
त्या
दोघा मधली ती पण अशीच
गरिबीत वाढलेली … मोठ्या कुटुंबात वाढलेली , वडील शिक्षक …कितिसा पगार असणार … कुटुंब मोठे … प्रत्येक गोष्टीत तडजोड करायची सवय लहान पणा पासून लागत गेली … ती अभ्यासात हुशार
… कसे कोण जाणे पणे तिचे आयुष्याचे ध्येय एकच होते … बँकेत नोकरी करायची … बँकेच्या
परीक्षा देयला सुरुवात केलेली… सुरुवातीला अपयश आले … खचली … रडली … पण जे होते
ते चांगल्या करिता होते … नंतर मोठे यश मिळणार होते
…
तर
या दोघांचे अगदी
चहा , पोहे खाऊन
, पत्रिका बघून लग्न झाले
लग्न
झाले तेंव्हा हा नुकताच पुण्यात
आला होता … आणि एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरी करीत होता ,,, पण पगार कितीसा
असणार ? दोघांचा
संसार सुरु झाला … ती छोट्या मोठ्या
नोकर्या करीत होती … बँकेचे ध्येय डोळ्या समोर होतेच …ती
नोकरी करून , संसार सांभाळून आला - गेला , पै पाहुणा सांभाळत
होती …. काटकसरीने घर खर्च सांभाळत
होती
याची
८ ते ५ नोकरी
… महिन्याच्या शेवटची ओढाताण … पगाराची वाट पाहणे … ११ - ११ महिन्याला घर
बदलणे … घर मालकांचे एके
एके अनुभव घेणे … ह्याची गुरुवार तिची रविवार सुट्टी … एक ना अनेक
गोष्टी …
हे
त्यांच्याच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त असेच होत असते …
नियती ला
एकदा का आपले गुरु मानले कि सगळे प्रश्न सुटतात … कदाचित त्यांना ते समजले असावे …..उन
जाऊन सावली येणार हे जसे निसर्ग
चक्र तसेच … आयुष्याचे पण चक्र असते
… त्या प्रमाणे हे दोघे पुढे
जात गेले …
नोकरीत
पायर्या चढत हा Vice President पदा
ला पोहोचला , तिने बँकेत Cleark पासून सुरुवात करून Manager पदावर पोहोचली…
घर
झाले, गाड्या घेतल्या , संसारात २ मुले आली
,,, सगळी हौस मौज … काय कमी ?
दोघांच्या
आई वडिलांचे आशीर्वाद यांना ईथ पर्यंत घेवून
आले…
समाजाने
त्यांना यशस्वी ठरविले …
ज्यांनी
नावे ठेवली ते सगळे लोक
यांचे कौतुक करू लागले ….
एवढे सांगून
वेताळ थांबला आणि राजा ला म्हणाला -
विक्रमा हि छोटीशी कथा त्यातील काही अनुत्तरीत प्रश्न तुला विचारतो , तू त्याची उत्तरे देशील अशी अपेक्षा करतो -
१.
यश म्हणजे काय ? पैसा कमावणे ,प्रसिद्धी
मिळविणे, भौतिक सुखे का
अजून काही ?
२.
कोवळ्या वयात एखाद्या मुलावर शिक्का मारणे कितपत योग्य ?
३.
नियती म्हणजे काय ?
वेताळाने अपेक्षेने
विक्रमा कडे पहिले आणि उत्तर देण्या करिता राजा बोलू लागला -
वेताळा
जशी सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी … तशीच यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी…. जगात मधुबाले च्या सौंदर्याची भक्ती करणारे आहेत तसेच , राखी सावंत चे सौंदर्य आवडणारे
पण लोक आहेतच ना … … … पण आज काल
दुर्दैवाने पैसा आणि प्रसिद्धी म्हणजे यश झाले आहे….
मधुबालाचे सौंदर्य इतिहास जमा होत आहे … तुझ्या कथेतील त्या दोघांकडे पैसा, गाडी , घर , प्रतिष्ठा नसती तर समाजाने त्यांना
यशस्वी म्हंटले असते का ? विचार
करायला लावणारा प्रश्न आहे हा … आणि याचे उत्तर कोणाकडेच नाही …
त्या मुळेच या
पिढीला सतत सैर भैर व्हावेच लागते !!
आता
तुझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर देतो , कोवळ्या वयात एखाद्या मुलावर शिक्का मारणे अजिबात योग्य नाही … तारे जमीन पर सिनेमा आठव
… असे जेंव्हा समाज वागतो तेंव्हा ते कोवळे वय
आणि त्याची आई भरडली जातात…
या कथेतील त्याला किंवा त्याच्या आई ला विचारून
पहा , एक तरी प्रसंग
ते विसरू शकले असतील का
? पण त्याला कवटाळून न बसता आणि
कटुता न ठेवता पुढच्या
आयुष्यात चालत राहणे महत्वाचे …
कथेतील त्याला ते जमले का
? याचे काही उत्तर तुझ्या कथेत मिळाले नाही ….
आता
तिसरा प्रश्न , नियती म्हणजे काय ? याचे उत्तर म्हंटले तर अवघड म्हंटले
तर सोपे …
तुझ्याच
कथेतील उदाहरण , त्याचे आयुष्यात पुढे कसे होणार हि एके काळची
चिंता पण तोच आज
समाजाच्या दृष्टीने यशवी ? आहे कि नाही नवल
… यालाच नियती म्हणतात …
नियती
कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही, ती तुमच्या आयुष्यासोबत
सावली सारखी चालत असते … कधी पुढे तर कधी मागे
…. पण सतत असते हे मात्र नक्की
… वेताळा पण कसे आहे
ना , माणूस हा फार
क्रुतग्न असतो … वाईट प्रसंगी नियती
ला दोष देवून मोकळा होतो, पण तेच सुखाच्या वेळी नियती ला विसरतो… नियती
हा खेळ आहे … तिच्या
खेळाला धैर्याने
,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव
सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं . कधी न कधीतरी नियतीचे
फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .....हे ज्याला कळाले
तो यशस्वी …
तुझ्या
कथेतील पात्रा चे वागणे कसे
आहे ते
तू नाही सांगू शकलास ….
वेताळा
कोणाला हि सल्ले देणे
सोपे असते रे … पण ती वेळ
स्वतः वर आल्यावर त्या
सल्ल्या तील फोल पण कळते ….
तू कथेची सुरुवात
व पु च्या वाक्याने
केलीस आता मी शेवट त्यांच्याच वाक्याने करतो
… गणिताच्या उत्तरा सारखी आयुष्या कडून आपण अपेक्षा करीत असतो … उत्तर न मिळाल्याने जास्त
दुखी होतो … तुझ्या कथेतील त्या दोघांना मिळाली का उत्तरे आज
पर्यंत ?
एवढे
बोलून विक्रमाने वेताळा कडे पहिले , वेताळाची शंका निरसन झाली असावी हि अपेक्षा ….
विक्रमादित्याचे
बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या
पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि
फ़सलास ! मी परत मोकळा
झालो ! पण तुझी उत्तरे बरोबर
आहे …. राहता राहिला माझ्या कथेतील पत्राच्या बाबतीत तू विचारलेले प्रश्नांचा
, त्याची उत्तरे
वाचकच देतील….
शांतपणे
विक्रमादित्य स्मशानाच्या बाहेर चालू लागला ….
बिपीन
कुलकर्णी
Too good. Atishay utkrushta likhan ani tyahunahi mahatwacha mhanje antarmukh vhayla lavnara lekh.
ReplyDeleteWhat I feel is more than success happiness is everything in life. Ans when you are know that you are happy, success follows.
Wish you both all the happiness in this world.
Keep writing and inspiring.
Blame your beautiful writing... I made mistakes while typing. Pls ignore. 😊
DeleteBlame your beautiful writing... I made mistakes while typing. Pls ignore. 😊
DeleteYogesh well said .. Happiness is all that matters :))
ReplyDeleteDada as always nice write up .. I can sum it up this way - "good things happen to good people" but definitely hard work and Karma play a big role ..
And lastly Envisioning Vikram / Vetal analogy too good .. Hats off to writing skills .. Keep it up
Inspiring writing....too good.
ReplyDeleteAll the best for your remaining life cause this is not finished..... मंजिले अभी और भी होगी ।
अप्रतिम लेखन ….
ReplyDeleteउत्तरे मिळाली कि आम्हाला हि कळवा
दादा, काय मस्त लिहिलय मनोगत, व्यक्त करण्याची वेताळा ची न संपणारी....गोष्ट आवडली..
ReplyDeleteशेवटी काय आपला आनंद , समाधान आपलं आपण स्वतः च् ठरवायचे असते... keep it up and enjoy, wish u all the happiness always. .!!
दादा, काय मस्त लिहिलय मनोगत, व्यक्त करण्याची वेताळा ची न संपणारी....गोष्ट आवडली..
ReplyDeleteशेवटी काय आपला आनंद , समाधान आपलं आपण स्वतः च् ठरवायचे असते... keep it up and enjoy, wish u all the happiness always. .!!
मस्तच...अप्रतिम लेख, अनेकांच्या मनातलं... विक्रम वेताळा गोष्टींचा उपयोग कौतुकास्पद!
ReplyDelete