आठवणीतील नवरात्र -
१६ ऑक्टोबर २०१५
आज नवरात्राची तिसरी माळ … मन झर झर काही वर्षे मागे गेले …एकदम लहानपणात !
लहानपण सोलापूर आणि औरंगाबाद मध्ये गेले त्या मुळे तिथल्या अगणित आठवणी प्रत्येक सणा मागे जोडलेल्या , सोलापूर शहरावर पश्चिम महाराष्ट्राची आणि पुण्याची छाप, तसेच आंध्र आणि कर्नाटक सीमेवरचे गाव असल्या मुळे काही रिती आणि परंपरा तिकडून सोलापुरात आलेल्या…
गणपती पाठोपाठ येणारे नवरात्र म्हणजे सोलापुरात गणपतीच्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण ,
अनंत चतुर्दशी नंतर १५ दिवस पितृ पंधरवड्याचा काळ , जसे नवरात्र जवळ यायला लागे तशी आईची कामाची गडबड सुरु होई , घरातील इंच अन इंच फरशी धुणे,
स्वयपाक घरातील डबे , भांड्याची साफ सफाई , माळे आवरणे असे एक ना अनेक … केवढी Energy असायची तिची …
आमची सोलापूर ची स्टेट बँक कॉलोनी म्हणजे एकाला एक लागून टुमदार बंगले… प्रत्येक घरात थोडी फार अशीच गडबड चालू? प्रत्येक बाई ने एक दुसरीला विचारणे " काय पपु च्या आई आज काय काम? " सगळ्या जणी एक मेकीना एक तर मुलांच्या आई म्हणून तरी बोलवायच्या किंवा आढनावाच्या मागे बाई लावून बोलवायची पद्धत
- जसे कि किणीकर बाई , कुंभारे बाई किंवा पटवर्धन बाई !!
महिला मंडळम्हणजे या सगळ्या उत्साही बायका , शारदीय नवरात्र साजरे करायच्या … देवीची मूर्ती बसवून, नीर निराळे कार्यक्रम म्हणजे पाक स्पर्धा किंवा मुलांच्या स्पर्धा , साग्रसंगीत आरती होयची …. आम्ही मुले प्रसाद खायला पुढे असायचो…
इथून कोजागिरी पर्यंत रोज भोंडला असायचा… पूर्वी प्रत्येक गल्ली , कॉलोनी मध्ये भोंडला असायचा आता हळू हळू इतिहास जमा होयला लागला…
भोन्ड्ल्यात मुलींचा आणि त्यांच्या आयांचा उत्साह पाहण्या सारखा असायचा … रोज एका घरी भोंडला … पाटावर रांगोळीचा
हत्ती काढून …एक ठिपका काढायचा
… पहिल्या दिवशी एक , दुसर्या दिवशी दोन , तिसर्या दिवशी तीन असे चढत्या क्रमाने ठिपके वाढत जाणार , आणि जितके ठिपके तितकी गाणी मुली पटावरील हत्ती भोवती फेर धरून म्हणणार …प्रत्येक गाण्या नंतर रांगोळीचा ठिपका पुसायचा …. मुलींची त्या करिता कोण गडबड असे …
त्या नंतर मुख्य म्हणजे जिच्या घरी भोंडला तिच्या कडून खिरापत , पण ती खिरापत बाकी मुली आणि त्यांच्या आई नि ओळखावी लागे ,,,प्रत्येक घरी अवघड खिरापत करण्या करिता चढाओढ असे , आम्ही शाळकरी मुले बहिणीच्या आणि आईच्या मागे मागे खिरापत खाण्या करिता जात असू…
कोजागिरी ची संध्याकाळ म्हणजे " महाभोडला" प्रत्येकीची वेगळी खिरापत !!! आणि त्यावर आटवलेले दूध ….
एकूणच त्या १६ संध्याकाळ म्हणजे " अस्से सासर द्वाड बाई , कोंडूनी ठेवावे " म्हणत नकळत सासर - माहेर चा फरक गोडीत सांगायचा मुलीना मिळालेला जणू platofrom !!
सोलापुरात सार्वजनिक देवी प्रत्येक चौकात बसविण्याची पद्धत फार जुनी …. आता ती खूप शहरात दिसते … पण तेंव्हा दिव्यांची रोषणाई करण्या करिता प्रत्येक चौकात चढाओढ असे …. देवीच्या उंच , रेखीव, उभ्या मूर्ती प्रत्येक मांडवात असत … त्या दिवसात देवीला साडी नेसवणारे कारागीर असत , जे कुटुंब आरती करीत त्यांच्या कडून देवीला साडी अर्पण करीत साहजिकच त्या कुटुंबाच्या पद्धती प्रमाणे दिलेली साडी देवीला नेसवण्याची जबादारी या कारागिरांची असे … म्हणजे महाराष्ट्रीयन असेल मारवाडी असेल , कधी बेंगाली किंवा कधी कर्नाटकी ….
देवीची अशी अनेक रूपे अजूनही डोळ्या समोर येतात !!
देवीच्या आरती च्या वेळेस " अंगात देवी येणे " हा प्रकार पण लहान पणीच पहिला… त्या वयात तो प्रकार पाहून भीती वाटायची…
प्रत्येक गावाचे ग्राम दैवत आणि तिथली नवरात्राची जत्रा याचे बालपणी खूप कुतूहल असते …सोलपुर ची रूपा भवानी किंवा औरंगाबाद ची कर्णपुर्यातील देवीची यात्रा अजूनही डोळ्या समोर आहे…
आईचे सकाळी आम्ही उठण्या पूर्वी चालत देवीला जाउन येणे , आल्यावर आमच्या हातावर प्रसाद ठेवणे …तिच्या श्रध्ये चे फळ कदाचित तिला आता मिळत असावे….
आमच्या सुट्टी च्या दिवशी सकाळी उठवून अंघोळी घालून देवीच्या दर्शनाला बरोबर घेवून जात , त्या वयात आम्हाला देवी च्या दर्शना पेक्षा जत्रेत जायला मिळणार याचेच कौतुक…
जश्या नवरात्री शी निगडीत या
आठवणी आहेत, तसेच घरात देवा समोर बसविलेले घट आठवतात , आजोबा आणि काकांची लगबग आठवते… दसर्याच्या दिवशी चे पाटी पूजन आठवते
, संध्याकाळचे सिमोलंघन आठवते
…. आमचे बाबा प्राध्यापक असल्या मुळे त्यांच्या भेटीला येणाऱ्या विद्यार्थ्यांची रीघ आठवते … औरंगाबाद च्या घरी एका नंतर एक येणारे नातेवाईक आठवतात ….
आता वयानी मोठे झालो खरे तर वडील आणि काकांच्या भूमिकेत आम्ही जायला हवे , पण आजोबा , काका , वडिलानी त्याची गरज भासू दिली नाही ….
काही वर्षा पूर्वी आजोबा गेले , या वर्षी काका गेले …जाताना त्यांच्या बरोबर एकूण
उत्साहच
घेवून
गेले…. असो
एकूण आमच्या लहान पणी दांडिया चा event नव्हता, नवरात्राचे
९ रंग नव्हते, दुकानात मोठाले सेल नव्हते
… पण निखळ आनंद मात्र भरपूर होता !!
सर्व मंगल मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके,. शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
बिपीन कुलकर्णी
Awesome writing. Atishay sunder varnan. Keep posting. 👍
ReplyDeleteAwesome writing. Atishay sunder varnan. Keep posting. 👍
ReplyDeleteMast .. ekdam solapur chi SB colony dolya samor ali. made me nostalgic. Kharach te purwiche aurangabadche Navratra / Dasara in general sagale SAN che celebration pan kahi aur .. rahilya tya fakta athawani.
ReplyDeleteदादा, छान लिहिलय. .. थोड्या फार फरकाने असेच काही आमच्या कडेच्या आठवणीं मध्ये हि आहे.
ReplyDeleteपण पूर्वी सारख्या छोट्या छोट्या गोष्टीत ले निखळ आनंद समाधान मिळत नाही. ..आता. ...... हूर हूर वाटत राहते....
दादा, छान लिहिलय. .. थोड्या फार फरकाने असेच काही आमच्या कडेच्या आठवणीं मध्ये हि आहे.
ReplyDeleteपण पूर्वी सारख्या छोट्या छोट्या गोष्टीत ले निखळ आनंद समाधान मिळत नाही. ..आता. ...... हूर हूर वाटत राहते....
दादा, छान लिहिलय. .. थोड्या फार फरकाने असेच काही आमच्या कडेच्या आठवणीं मध्ये हि आहे.
ReplyDeleteपण पूर्वी सारख्या छोट्या छोट्या गोष्टीत ले निखळ आनंद समाधान मिळत नाही. ..आता. ...... हूर हूर वाटत राहते....
दादा, छान लिहिलय. .. थोड्या फार फरकाने असेच काही आमच्या कडेच्या आठवणीं मध्ये हि आहे.
ReplyDeleteपण पूर्वी सारख्या छोट्या छोट्या गोष्टीत ले निखळ आनंद समाधान मिळत नाही. ..आता. ...... हूर हूर वाटत राहते....
मस्तच !!
ReplyDeleteमस्तच !!
ReplyDeleteमस्तच !!
ReplyDeleteमस्तच !!
ReplyDelete