चित्रपट
बाजीराव मस्तानी - २६ डिसेंबर २०१५
बाजीराव
मस्तानी चित्रपटाचे प्रोमो पहिले तेंव्हा खरेतर चित्रपट
न पाहण्याचा आमचा निर्णय झाला होता,,,पण आमची प्रतिज्ञा
म्हणजे काही चाणक्याची प्रतिज्ञा नाही… चाणक्या च्या घरात
बाल हट्ट आणि स्त्री हट्टा ला स्थान नव्हते…
आमचे तसे नाही … " To Be ओर Not To Be " मध्ये शेवटी To Be चा विजय झाला
… आणि काल अस्मादिकांनी सहकुटुंब सिनेमा पहिला.
"लोकतंत्र
संख्या का खेल है"
त्या प्रमाणे "चित्रपट
बॉक्स ऑफिस का खेल है"
, त्या मुळेच काही गोष्टी घुसडल्या जाणार हे सत्य … आणि
त्या आहेत यात दुमत नाही…
कुठलीही
चित्रपट कलाकृती परिपूर्ण नसते , म्हणूनच कुठल्याही चित्रपटाला ५ स्टार मिळत
नसतात,,बाजीराव मस्तानी हि पण परिपूर्ण
कलाकृती नाही … असे असले तरी त्यात काही जमेच्या बाजू आहेत आणि
उणीवा तर आहेतच आहेत ….
श्रीमंत
बाजीराव पेशव्यांचे असामान्य कर्तुत्व , युद्ध निपुणता , राजकारणा वरील पकड आणि मस्तानी
वर असलेले प्रेम हे दाखविण्याचा दिग्दर्शकाचा
प्रयत्न.
सातारच्या
छत्रपतीच्या दरबारातून बाजीरावा चे पेशवे होण्या
पासून त्यांचा रावेर खेड मधील मृत्यू पर्यंतचा प्रवास २ तास ३५
मिनिटात दाखविण्याचा हा प्रयत्न…
काही
गोष्टी जमेच्या -
१.
"ग्रेट मराठा" हि उपाधी जरी
नेहमी वापरली गेली तरी देखील , आज पर्यंत मराठी
मुलुखात होऊन गेलेल्या योद्धे , स्वातंत्र्य सैनिक , राजे - महाराजे किंवा अजून कोणावर Bollywood ला सिनेमा काढण्याची
गरज वाटली नव्हती
२.
सिनेमा नक्कीच भव्य दिव्य आहे
३.
बाजीराव च्या भूमिकेला न्याय देण्यात रणवीर सिंघ काही प्रमाणात यशस्वी झाला आहे
४.
दीपिका ने मस्तानी छानच
रंगवली आहे , तिचे सौंदर्य , वागणे , अदाकारी ला जवाब
५.
खरे कौतुक आहे प्रियांका नि केलेल्या काशी
बाई च्या भूमिकेचे… खरे तर चित्रपटाचा पूर्ण
Focus बाजीराव - मस्तानी असणे स्वाभाविक होते पण प्रियांकाने अतिशय
ताकदीने हि भूमिका करून
, काशी बाई च्या स्वभावाचे अनेक पैलू छान दाखवले आहेत.
राऊ
वर प्रेम
करणारी अवखळ काशीबाई, खानदानी
पेशवीण बाई , आपला नवरा दुसर्या कोणाच्या प्रेमात पडला आहे हे समजल्यावर होणारी
तिची घालमेल,
श्रीमंतांचा मृत्य समोर दिसत असताना तुटून पडलेली काशीबाई… नवर्याच्या
प्रेमा करिता मस्तानी ला स्वीकारणारी काशीबाई
खरेच लाजवाब …
६.
तन्वी आझमी ने केलेली राधाबाई
(श्रीमंतांच्या मातोश्री ) पण लक्षात राहतात
, पदोपदी मस्तानी चा दुस्वास , काशीबाईशी
असलेले प्रेमळ नाते , पुत्र प्रेम…. केवळ
बाजीराव च्या नसून आपण पूर्ण प्रजेच्या मातोश्री
असल्याची करून दिलेली जाणीव …हे दाखविताना त्यांनी
भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे
७.
शनिवार वाड्याची भव्यता आणि सुंदरता खरेच पाहण्या सारखी आहे
८.
शनिवार वाड्यातील राजकारण , भाऊ बंदिकी दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे असे म्हणू शकतो
९.हातचे राखून न ठेवता केलेला
खर्च चित्रपटाला श्रीमंती
देतो आणि एका उंचीवर नेउन ठेवतो
१०.
सेपिया शेड
चित्रपटाला एक कलात्मकता देतो
आता
काही खटकलेल्या गोष्टी -
१.पिंगा या गाण्याची सिनेमात
अजिबात गरज नव्हती, खानदानी पेशवीण असे नाचू शकते , हे मान्य होणे
शक्यच नाही
२.
हे गाणे कथानका पेक्षा box office ची गरज म्हणूनच
सिनेमात आले आहे
३.
या गाण्याच्या वेळेस काशीबाई चे नाचतानाचे उघडे
पोट पाहून …धन्य तो दिग्दर्शक म्हणण्याची
वेळ प्रेक्षका वर येते
४.
हळदी कुंकवाच्या च्या
कार्यक्रमात नाचण्याची पद्धत मराठी साम्राज्यात कधीच नव्हती
५.
रणवीरसिंग चा अभिनय काही
प्रसंगात अतिशय Loud होतो, एक दोन प्रसंगात
तर दारू च्या अमला खाली असल्या सारखे जाणवते , हे अतिशय निषेधार्ह
आहे
६.
बाजीराव आणि मस्तानी चे एक मेकावर
अतिशय निस्सीम प्रेम होते, सिनेमा मध्ये असे बरेच प्रसंग आहेत ज्यात बाजीराव चे प्रेम दिसून
येते पण मस्तानी चे
बाजीराव वरील प्रेम दिसण्याचे प्रसंग अभावाने आले आहेत, सिनेमातील तिचे बाजीराव वरील प्रेम दाखविण्या पेक्षा तिची झालेली उपेक्षा आणि त्याचा तिने केलेला सामना यावरच जास्त भर आहे
७.
चित्रपटातील सुरुवातीचे लढाई चे प्रसंग ठीक
आहेत पण शेवटचा प्रसंग
अतिशय कृत्रिम वाटतो , उलट दक्षिणे कडील सिनेमा सारखा अतिशयोक्ती पूर्ण वाटतो , ज्याची अजिबात
गरज नव्हती
८.
मस्तानी जेंव्हा समशेर ला जन्म देते
तो पण प्रसंग अतिशय
कृत्रिम वाटतो
इतिहास
समजावा म्हणून चित्रपट पहिला तर निराशाच होईल
, एक कलाकृती किंवा ग्रेट मराठा पडद्यावर दाखविण्याच्या प्रयत्ना ला दाद देता
येईल…
माशी
चहात पडली तर आपण चहा
फेकून देतो पण तीच तुपात
पडली तर आपण तूप
फेकून न देता , तुपातून
माशी काढून फेकतो…
या
चित्रपटात माशी तर पडली आहेच
…
आता
"चहा फेकायचा का माशी काढून
फेकायची" हा ज्याचा त्याचा
प्रश्न …
बिपीन
कुलकर्णी