Sunday, November 9, 2014

सचिन तू पण ….

गेल्या आठवड्यात वाजत गाजत प्रकाशन झालेल्या , सचिन तेंडूलकर च्या पुस्तका बद्दल एक त्याचा चाहता आणि पुस्तक प्रेमी म्हणून माझे मत …. 

आजच पुस्तक पाहून आलो… 

किंमत फक्त ८९९ रुपये ?

माझी अपेक्षा होती बहुदा हे पुस्तक सचिन ने सर्व वर्गातील त्याच्या चाहत्यांना डोळ्या समोर ठेवून प्रकशित केले असेल , पण किमती वरून तरी फक्त वरच्या श्रेणीतील वाचका करता असावे असे वाटते .
कारण सामान्य लोक सहजा सहजी ८९९ खर्च करू शकत नाहीत
माझ्या सारखा पुस्तक प्रेमी ८९९ रुपये खर्च करू शकतो किंवा नाही हा मुद्दा नसून तेवढे पैसे देण्याची खरेच गरज आहे का ? केवळ सचिन चे आत्मचरित्र म्हणून ….
आम्ही भावनेला महत्व देवून वाचायची आवड असो अथवा नसो , केवळ आपल्या दैवताची पोथी म्हणून विकत घेणार आणि आमच्या भावनेशी खेळ करत हे व्यवसाय करणार !!!
जगाला हेवा वाटावे असे तुझे असामान्य कर्तुत्व, कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रा पेक्षा भाग्यवान असा तू भारतरत्न पण शेवटी तुही व्यवहार पाहिलास !!

No comments:

Post a Comment