Friday, March 16, 2012

अमृताची गोष्ट!!!


         अमृताची गोष्ट!!!                                                    १६ मार्च २०१२

आजचा दिवस खरेच वाईट उगवलातसा दिवस वाईट उगवत नसतो तर आपल्या करिता दिवसाची सुरुवात एखाद्या वाईट बातमीने होते, आमच्या ऑफिस मधील जोशी यांच्या गोड मुलीचे वय वर्षे १० फक्त, सकाळी दुखद: निधन झाले,
एक म्हणायची पद्धत आहे  "जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला" पण खरेच असे आहे का? हे ऐकून किंवा वाचून १० वर्षाच्या लेकीच्या मृत्यू नंतर चा  आई वडिलांचा आक्रोश किंवा त्यांचे होणारे दुख: कमी होऊ शक्तते का ? खरे तर  हि असली वाक्ये म्हणजे फक्त शब्दाचे खेळ आहेत असे मला वाटते.
सांत्वनाला येणार प्रत्तेक माणूस जोशींची समजूत घालत होता, त्यात मी पण एक होतो....पण कुठे  तरी मनातून
 मला वाटत होते कि लोकांचे सांत्वन करणे किंवा समजूत घालणे तसे सोपे आहे...ज्या आई वडिलांवर हि दुर्देवी वेळ आली त्यांचे सांत्वन होणे शक्यच नाही...आणि खरे तर कोणी प्रयत्न पण करू नाही...कारण ते करताना गोष्टी होत असतात
  1. सांत्वन करणारा  कळत स्वतःला फसवत असतो, कारण त्याला पण माहिती असते आपण जे काही बोलतो आहे त्या गोष्टीला अर्थ नाही
  2. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, सांत्वन करणारा आत मधून प्रचंड हादरलेला असतो, ती परिस्थिती पाहून तो स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला नकळत त्या परिस्थितीत पाहतो
दुसर्या गोष्टीची एकदा जाणीव झाली कि, मग पहिल्या गोष्टीतील फोल पण प्रकर्षाने जाणवते.
 पु चे एक वाक्य आहे " सांत्वन हे दुखा:चे मुल आहे, आणि मुल हे आई पेक्षा कधीही मोठे होऊ शकत नाहीया वाक्याचा अर्थ समजला तर मी वर जे काही लिहिले आहे त्या गोष्टीतील भावार्थ कळू शकेल!!    
अमृता जोशी वय वर्षे १०, श्री  सौ  जोशींची धाकटी कन्या, सध्या सेवा सदन मध्ये शिकत होती, तसे बरेचदा पहिले होते..खुपदा वडिलान बरोबर ऑफिस मध्ये यायचीतेंवा तिच्या लहान लहान पायानी ऑफिस मध्ये दुडू दुडू पाळायची, वेग वेगळ्या नाटकात, फिल्म्स मध्ये काम करायची तेंवा वडील ऑफिस मध्ये कौतुकाने तिचे फोटो दाखवायचेतिच्या छोट्या मोठ्या आजार पणा मध्ये तिच्या वडिलांची होणारी कसरत...या सगळ्या गोष्टी ......कन डोळ्यासमोरून जातात....हा सगळा विचार केला कि जाणवते जन्मदात्या आई वडिलांकडे किती छोट्या छोट्या  आठवणी असतील? लेकरू तर गेले उरल्या त्या फक्त आठवणी??गेलेल्या लेकीची उणीव कशी भरून निघू शकेल? खरे तर भरून निघूच शकत नाही.
या आठवणी माणसाला प्रचंड यातना देतात...... आणि त्या वर फक्त काळ हाच उपाय आहे
तसा - दिवस ताप, सर्दी खोकला होता, पण काल रात्री ११ वाजता खोकल्या मुले धाप लागायला लागली, म्हणून आई वडील डॉक्टर कडे घेवून गेले...आणि त्यांनी एकदम दवाखान्यात दाखल करून घेतले..त्या नंतर रात्री १२ ते पहाटे  या असंख्य गुंता गुंती होऊन पहाटे .३० ला लेकाराने शेवटचा  श्वास घेतला!!!!
काल गप्पा मारत लेकीला घेवून गेलेले आई वडीलजेंव्हा आज सकळी परत घरी आले तेंवा?????  यालाच नियती म्हणायचे का??? आणि अशा काही घटना होतात तेंवा प्रकर्षाने प्रत्तेकाला नियतीची आठवण होते? कोणास ठाऊक कदाचित नियती स्वतःचे अस्तित्व अधोरेखित करण्या करिता किंवा स्वतःची आठवण करून देण्या करिता अशा गोष्टी घडवत असेल?
प्रत्तेक पाहिलेला मृत्यू पाहणार्याला दुख:  देतो,,,,पण लहान मुलाचा मृत्यू मनाला चटका लावून जातो कारण ते पाहिलेले दुख: विसरणे अवघड असते.
जोशी कुटुंबावर जी वेळ आली ती कधीही कोणावर आणू नकोस, आणि यातून तूच त्यांना मार्ग दाखव हीच ईश्वराला प्रार्थना!!!

बिपीन कुलकर्णी
  

3 comments:

  1. Farach awghad prasang ahe, kal he ekach owashadh ahe mhanayache..Tu
    mhanatos tase kharach lahan mulacha mrutyu pahane khup awghad ahe
    rudayla prachanda wedana hotat. Ani tarun pani kharach apan far
    bindhasta asato jya gosthi rudayaparyant nyayachya tyach newu shakato
    pan kharach ajkal wisheshtaha dukkhachya pratyek prasangi ( sukhachya
    khachitach) apan swataha thewun pahato tyamule pratyekache dukkha
    apalech watu lagate ani samorachay manasachay manachi kalpana yete..
    Baki santwant tar apan kahihi karu shakat nahi.

    Anagha Kulkarni

    ReplyDelete
  2. dada I can imagine what you must have gone thr ..awaghad wel ahe konawar pan .. tuze likhan mhanashil tar chanach ahe .. Santwanawarun athawala wa pu cha Tu bhramat ahasi waya madhala wakya athawala - Santwan he dukha cha mul .. mul he aai peksha kadhi motha houch shakat nahi ..

    ReplyDelete
  3. Kharach khup man halavun taknaara prasanga aahe. Kay betle asel tya aai vadilanwar tyanach thauk. Tumhi mhanta te kharech asel ki Niyati aaplya astitwachi janiv vhavi mhanun asha goshti ghadavun aanat asel.

    On a good note, I feel tumhi ata ek pustak lihayla ghyach. You've a good story telling style of describing things. Sagla prasanga dolyasamor ubha rahto agadi jasachya tasa. Keep it up.

    ReplyDelete