Saturday, December 10, 2011

नमनाला घडा भर तेल!!!

नमनाला घडा भर तेल!!!                                            १० डिसेंबर २०११

गेल्या काही दिवसात मी तीन व्यक्तिचित्र लिहिलीज्यांच्या बद्दल लिहिले ते सगळे जण माझ्या अतिशय जवळचे त्या मुळे लिहिण्याचे मला खूप संधान मिळाले  पण तसे असूनही एक गोष्ट लक्षात आली कि या लेखनाला वाचकाच्या खूप मर्यादा असतात, कारण फक्त त्या व्यक्तींना ओळखणारे लोकच याचे वाचक होऊ शकतात.
त्यात मी निवडलेल्या  Blog  माध्यमाला अजून मर्यादा पडतात, त्याचे एक कारण म्हणजे लिखाण ज्यांच्या पर्यंत पोहोचावे असे वाटते ते सगळेच लोक कॉम्प्युटर सेव्ही नसतात,
मध्यंतरी बाबांशी बोलताना ते म्हणाले कि तू पुस्तक लिहायचा विचार कर!!! त्यांच्या म्हणण्याने खरे तर हुरळून गेलो, आणि खूप विचार केला विषय काय असावा? खरे तर माझा कथा कादंबरी लेखनाचा चा पिंड नाही, माझे आवडते विषय नेहमीच व्यक्ती चित्र किंवा चरित्रात्मक,
१७ वर्षा पूर्वी मी पुण्यात आलो तेंव्हा पासून हे पुणे खूप जवळून पाहिले....तशी आम्हा पुण्या बाहेर च्या लोकांना उगाचच पुण्याच्या लोकांना किंवा पुण्याला नावे ठेवण्यची सवय असते, पण खरे सांगतो इतक्या वर्षात इतक्या नीर निराळ्या लोकांना भेटलो , संपर्क आला पण आज पर्यंत कधी वाईट अनुभव आला नाही तशीच एक  अजून गोष्ट लक्षात आली ती अशी वेरूळ अजिंठ्याच्या पुढे आणि कडक उन्हाळया शिवाय आमचे औरंगाबाद या लोकांना माहित नाही ... 
पण या पुणेकरांची एक गोष्ट वाखाणण्या सारखी... अस्सल पुणेकरांना पुण्या बद्दल जो अभिमान असतो तो मी तरी दुसर्या कुठल्याही शहरात पहिला नाही... आणि अभिमान का नसावा हो ? आपण जिथे जन्म घेतला आणि वाढलो त्या भूमी बद्दल हे प्रेम असायलाच पाहिजे....
मध्यंतरी मी श्री सुधीर गाडगीळांची काही पुस्तके वाचली आणि खरेच त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडलो....जसे कि मुद्रा किंवा ताजतवानं त्यात त्यांनी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर " बागेतील हुकमी हसण्याच्या क्लब पासून शाकाहाराच्या लाटे पर्यंत" सगळ्या गोष्टी वर लिखाण केले, आणि लहिले आहे पुण्याला मध्यवर्ती ठेवून...मग त्यात भेटलेली माणसे,सामाजिक संस्था आणि इतरही बरेच काही पुण्या संदर्भात आहे...जे ते त्यांनी त्यांच्या लेखनाने समृद्ध केले आहे,
मी जेंव्हा एखादे व्यक्ती चित्र वाचतो तेंव्हा नकळत त्यात एखादी भेटलेली किंवा माहितीतली व्यक्ती शोधण्याचा किंवा पाहण्याचा प्रयत्न करतो....
थोडे विषयांतर झाले, तर मी पुण्या बद्दल बोलत होतो...जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा नेहमी असे वाटते कि मुंबई पुणेकरांकडे कडे जशी पिढीजात शिवाजी पार्क किंवा डेक्कन बद्दल प्रेम जपून ठेवण्याची परंपरा आहे  तसे आमच्या कडे गुलमंडी किंवा क्रांती चौका बद्दल का नाहीपुण्यातल्या वेग वेगळ्या टेकड्या वर किंवा सिंहगडावर दर रविवारी जाणारी मंडळे आहेत तसे आमच्या कडे हनुमान टेकडी किंवा दौलताबाद किल्ल्याच्या बाबतीत का नाही?
श्री शिरीष काणेकर असो किंवा श्री सुधीर गाडगीळ असोत त्यांनी जी शिवाजी पार्क किंवा पुण्यातील (डेक्कन, सदशिव पेठेतील) जी व्यक्ती चित्र लिहिलीत ती आमच्या औरंगाबाद ला का नाहीत? त्या वर मी खूप विचार केला आणि मग असे लक्षात आले कि " अरे असे लोक / संस्था आमच्या कडे पण आहेत आणि कदाचित ते आपल्या वाचनात आले नाही किंवा कोणी लिहिले नाही....मग आपणच का साध्या सोप्या शब्दात लिहू नये "
हे झाले नमनाला घडाभर तेल !!!!
तर हा सगळा विचार विचार करून असे मनात आले कि आपणही औरंगाबाद हि मध्यवर्ती कल्पना ठेवून लिखाण करावे...हे लिहिताना औरंगाबाद शहरातील व्यवसाय, साहित्यसंस्कृती , कला आणि समाज करणातील  सामन्यातील असामान्य व्यक्ती किंवा संस्था शोधण्याचा प्रयत्न!!! यात कुठेही श्री सुधीर गाडगीळ किंवा श्री काणेकारांची बरोबरी  करण्याचा प्रयत्न नाही...पण स्फूर्ती नक्कीच तिथून आली आहे...आपण जिथे वाढलो, ज्या शहराने आपल्यावर नकळत संस्कार केले त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा चा हा छोटासा प्रयत्न!!!
तर मी यात औरंगाबाद शहरातील अशा व्यक्ती / संस्थांबद्दल लिहिणार आहे कि ज्या अस्सल औरंगाबादकराना परिचित असतील किंवा काहींचा नव्याने परिचय होईलवाचताना जुन्या आठवणी जागृत होतील... कधी उर अभिमानाने भरून येईल, कधी इंग्लिश मध्ये म्हणतात तो "wow factor " येईल!!
हा जसा विचार मनात आला तेंव्हा पासून काही नावे डोळ्या समोर आहेत ती अशी - ग्राम दैवत सुपारी हनुमान, स्व व्हाराडकार देशपांडे,rउमेश दाशरथी,जया जोशी,तारा पान,अनंत भालेराव,स भू शिक्षण संस्था, उत्तम मिठाई, गायत्री चाट भांडार,गीरीजाराम हळ्नोर, बाबा भांड, मातृ पालक संघटना इत्यादी...
हे लिहिताना काही नियम मी स्वतःशी ठरविलेले, संबधित व्यक्ती अथवा संस्थेची कर्म अथवा जन्म भूमी औरंगाबाद असावी!!! तसेच प्रत्तेक शब्दाला मराठी प्रती शब्द शोधण्याचा अट्टाहास नको , कारण पु म्हणालेच आहेत..."फिरकीच्या तांब्याला" इंग्रजी मध्ये प्रतिशब्द नाही....तसेच काही इंग्लिश शब्दांचे...काही व्यक्ती चरित्रात Mangement Princiles ची उदाहरणे देताना तर इंग्रजी शब्दांना पर्याय नसणार आहे...तसेच या व्यक्ती ना मी स्वतः ओळखत असणे अथवा भेटलेलो असणे...
आता बघू लिखाणात किती यश येतेय ते !!!! काही तुम्हाला परिचित काहींची नव्याने ओळख!!! 





No comments:

Post a Comment