श्रद्धांजली ४ ऑक्टोबर २०१४
मृत्यू कोणाला चुकलाय ! जन्माला
येणारा प्रत्त्येक जण कधी
तरी जाणारच, त्या
नियमा प्रमाणे अप्पा
पण गेले. … हे लिहिणे
सोपे आहे पण
वस्तुस्थिती स्वीकारणे तेव्हडेच अवघड !
काल पर्यंत आपल्यात असलेल्या जीवाभावाच्या व्यक्ती च्या नावाच्या मागे आज कै किंवा स्व. लावताना डोळ्यात टचकन पाणी येते आणि हात जड होतो …. पण इलाज नाही " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा " हेच खरे !
आम्हा घरच्या आणि जवळच्या लोकांचे अप्पा, त्यांच्या पिढीतील मित्र आणि सहकार्यांचे द रा आणि इतर सगळ्या करिता मेढेकर सर !
जन्म विजया दशमी १९२७
- मृत्यू विजया दशमी २०१४
वाढदिवसाच्या
दिवशीच मृत्यू येणे याला
योगायोग म्हणायचे कि नियतीची क्रूर थट्टा
!
अप्पा म्हणजे जेष्ठ स्वातंत्र्य
सैनिक द रा
मेढेकर, ८७ वर्षाचे
आयुष्य.… केवढा मोठा
काळ.
या ८७ वर्षात
काय नाही पहिले - पारतंत्र्याचा
काळ , महात्माजिं ची
आंदोलने, स्वातंत्र्य संग्राम, रझाकारांची
मस्ती , हैदराबाद मुक्ती संग्राम,
आणिबाणी , जे
पी नि बनविलेले
सरकार शिवाय इतर
अनेक गोष्टी …. आजच्या पिढी करिता
हा इतिहास आहे
पण या सगळ्या इतिहासाचे आप्पा
नुसते साक्षीदार नव्हे
तर एक सैनिक
होते
जय प्रकाश नारायण आणि
स्वामी रामानंद तीर्थ हि
दैवते ,…. स्वामींच्या हाकेला प्रतिसाद
देवून स्वतःला हैदराबाद
मुक्ती संग्रामात झोकून दिले
आणि श्री गोविंद
भाई च्या खांद्याला
खांदा लावून निझामाला
आणि रझाकाराना सळो
कि पळो करून
सोडले
समाजवादी
विचार सरणीचा पगडा
जो कि आयुष्य
भर जोपासला.
राहणी अत्यंत साधी, नोकरीत
असताना शर्ट पँट
आणि नंतर पांढरा
किंवा खादीचा झब्बा
, सार्वजनिक कार्यक्रमात गांधी
टोपी… पण एक
गोष्ट मात्र कायम
होती ती म्हणजे
समाजवादी व्यक्ती ची ओळख
असलेली " शबनम पिशवी
"
"बाल
पणिचा काळ सुखाचा
" अशी एक कविता
आहे.
कोवळ्या
वयात पितृ छत्र
हरपल्यावर कसला आलाय
काळ सुखाचा ? विधवा
आई बरोबर घराची
जबाबदारी लहान वयात
येउन पडली , ५
भावंडे आणि आई
अशी ६ खाणारी
तोंडे त्यात कमावते माणूस नसल्या
मुळे उत्पनाचे साधन
नाही, थोडे दिवस
नातेवाइका चे वाईट
अनुभव घेवून आई
आणि मुलाने हात
पाय हलविण्याचा निर्णय
घेतला , सगळ्या कुटुंबा सहित
पुण्यात आले , बाकी लोकांना
पुण्यात ठेवून आप्पा नोकरी
च्या शोधात हैदराबाद ला गेले
त्या वेळेस आयुष्यात खूप
चांगले लोक
भेटले जसे कि
गोविंद भाई ,श्री
चारठाणकर , श्री अनंत
भालेराव, श्री टिळक आणि
बरेच ज्यांनी अप्पा
च्या आयुष्याला एक
दिशा दिली
इथून प्रवास सुरु झाला
तो दत्तात्रय
रामचंद्र मेढेकर ते "जेष्ठ
स्वातंत्र्य सैनिक" ,"स भू
प्रशालेचे मुख्याध्यापक" , "संस्थेचे सचिव" , "राष्ट्रपती
पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक" असा
व पु चे
एक सुंदर वाक्य
आहे " आयुष्यात समंजस जोडीदार
आणि गुणी संतती
मिळाली कि धकाधकीची
वाटचाल सरळ वाटते
, निखारे पण सौम्य
होतात , काटे बोथट
होतात आणि सार
सोप होऊन जाते
"
हे वाक्य अप्पांच्या आयुष्याला
तंतोतंत लागू पडते
, हैदराबाद मध्ये असताना जहागिरदारा
ची कन्या तारा
आयुष्यात आली आणि
तिच्या रूपांनी समंजस जोडीदार
मिळाला आणि आयुष्याचे
निखारे सौम्य करत गेला.
आई आणि अप्पा
च्या बरोबरीने कुटुंबाची
जबाबदारी घेण्या करिता आपसूक
तिसरे माणूस आले.
सगळ्यांनी
मिळून संसाराचा गाडा
ओढत भावडांची शिक्षणे
, लग्न करून संसार
लावून दिले.
पुण्यात
काय किंवा हैदराबाद आणि
इतर ठिकाणी आश्रिता
सारखे राहिलेले हे
कुटुंब औरंगाबाद सारख्या ठिकाणी
बंगल्या मध्ये राहू लागले
हा कर्मा चा
सिद्धांत नाही तर
काय ?
प्रापंचिक
आणि सामाजिक जबादारीत
हे कुटुंब कुठेच
कमी पडले नाही
, त्या मुळे नकळत
पुढची पिढीही तशीच
घडली "जसे
पेरतो तसे उगवते
"
स भू सारख्या
नामांकित शिक्षण संस्थेत नोकरीची
सुरुवात करून मुख्याध्यापक
, संस्थेचे सचिव अशा
एका नंतर एक
पायर्या चढत गेले.
राष्ट्रपती
च्या हस्ते आदर्श
शिक्षक पुरस्कार म्हणजे कारकिर्दीतील
मानाचा तुरा ज्याला
इंग्लिश मध्ये " Cherry on the Cake !
" म्हणतात.
हे सगळे होत
असताना आई चे
वार्धक्य सुरु झाले
, वडिलांच्या पश्चात आई ने
समाजाचे टक्के टोणपे खात वाढवलेले
…. त्या आईचे उर्वरित
आयुष्य सुखा समाधानात
गेले , तिच्या शेवटच्या काळात
आप्पा आणि सौं
तारा मामी तिचे
आई वडील झाले
होते …
काही वर्षे कॅनडा अमेरिका
भारत असे जाणे
येणे चालू होते.
पुण्यात अंजू कडे
तर दुसरे घरच
होते , पण गेले
काही दिवस तब्बेती
मुळे या सगळ्या
वर मर्यादा पडत
होत्या.
लाडक्या
नातीला मुलगी झाली , म्हणजे
चौथी पिढी , सगळ्या
लेक सुना नातवंडानि "सोन्याची
फुले " वाहायचा कार्यक्रम ठरविला,
तारीख ठरली आणि ……।
ज्या नियतीने पितृ छत्र
बाल पणी हिरावून
घेतले , तिनेच आयुष्यात अनेक
मान मतारब दिले
तीच नियती थोडे दिवस
थांबू शकत नव्हती
का ?
सगळेच अतर्क्य !
बिपीन कुलकर्णी