Friday, July 20, 2012

कॉर्पोरेट विश्वातील महाभारत!!!!!




कॉर्पोरेट विश्वातील महाभारत!!!!!

                                                                           २० जुलै २०१२

व पु नि "आपण सारे अर्जुन" पुस्तकात अर्जुनाच्या कुरुक्षेत्रावारच्या आणि मध्यम वर्गीय माणसाच्या आजकालच्या परिस्थितीतील सारखेपण छान सांगितले आहे... वाचताना जाणवते कि खरेच आपण आणि अर्जुन सारखेच... कारण आपल्या पण मनात असेच असंख्य प्रश्न असतात
पुढे जाऊन मला वाटले वाटले कि फक्त अर्जुनच का? महाभारतातील प्रत्तेक व्यक्ती आणि आपण सारखेच!!! .
महाभारत नेहमीच आपल्याला जवळचे वाटते, त्याला तशी दोन कारणे -
  1. त्यातील प्रत्तेक व्यक्ती तुमच्या आमच्या सारखी कधी ना कधी चुका करणारी
  2. प्रत्तेक व्यक्तीच्या मनस्थितीतून आपण कधी ना कधी गेलेलो
महाभारताला खरे तर " सत्य असत्य", "धर्म अधर्म" किंवा "नीती अनीती" ची लढाई म्हणतात, पण माझ्या मते ती फक्त प्रत्तेकाच्या अस्तित्वाची लढाई होती.....
कारण धर्म अधर्म किंवा नीती अनीती म्हणायचे तर, कौरवांची बाजू कायम अधर्माची होतीच पण -
  1. "नरोवा कुंजरोवा "करणाऱ्या युधिष्ठिराची बाजू खरेच सत्याची होती का?
  2. शिखंडीच्या मागे लपून भीष्मा वर वार करिताना कुठे गेला होता पांडवांचा धर्म?
  3. जमिनीत रुतलेले चाक काढायची धडपड करत असणाऱ्या निशस्त्र कर्णा वर वार करणे हि कुठली नीती
पु लं च्या "बिगरी ते मैट्रिक" मधील एक पात्र विनोदाने म्हणते " कृष्ण पण कर्णा बरोबर चीडीचाच डाव खेळला".......विनोद थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तर काही अंशी खरे पण आहे...
असाच चिडीचा डाव आपण पण कधी ना कधी खेळत असतो त्या मुळे पांडव आपल्याला सतत जवळचे वाटतात,
आपल्या Professional Life मध्ये अशा गोष्टी कायम घडत असतात पण " Action पेक्षा Intention " ला जास्त महत्व देऊन प्रत्तेक गोष्टीचे समर्थन केले जाते....मग तोच नियम महाभारतातील घटनांना पण लागू करायला हवा ना...
रोजच्या "So Called Professional Life " मधली काही उदाहरणे -
  1. मिटींग्स मध्ये बहुतेकदा आपण तेच बोलतो कि जे आपल्या BOSS ला ऐकायला आवडते - मग आता सांगा द्रौपदी वस्त्र हरण प्रसंगाच्या वेळेस भीष्म किंवा विदुर जे वागले ते काय चुकीचे होते?..."सत्ते पुढे शहाणपण चालत नाही" म्हणतात ते असे.
  2. Performance Review Meeting च्या वेळेस आपली जी चर्चा होते, आणि त्या नंतर मिळणाऱ्या Increment Letter मुळे आपल्याला BOSS एकदम "सुई च्या आग्रा एवढी पण जमीन देणार नाही" म्हणणारा दुर्योधन वाटू लागतो!!!!
  3. "नरोवा कुंजरोवा " करणारी माणसे " Good Diplomats " किंवा "Best Interpersonnel Relationship " असलेली ठरतात
  4. एखादा न पटलेला निर्णय घेत असताना आपली परिस्थिती अर्जुना सारखी होते आणि त्या वेळेस आपला BOSS आपल्याला गीता सांगून तो निर्णय घेण्यास भाग पाडतोच....याला काय म्हणायचे? धर्म का अधर्म!!!
5.   कौरवांचे दुर्योधनाने देऊं केलेले सेनापतिपद भीष्माने खळखळ न करतां स्वीकारलें.फक्त एकच अट घातली कीं ’एकतर कर्ण किंवा मी, एकच कोणीतरी लढेल’. यात एक गोष्ट दिसून येते कीं युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हेतु असावा....यालाच आजच्या भाषेत Selfish किंवा Egoistics म्हणतात!!! यात कर्णा बद्दलची भीती आणि त्यातून कर्णाचे महत्व कमी करायचा उद्देश असावा...असे आपल्या कामाच्या ठिकाणी नेहमीच होत असते ना

6.     ह्या भीष्माच्या निर्णयाने कर्णाला १० दिवस युद्ध भूमी पासून दूर ठेवले...कर्ण जर पहिल्या दिवसा पासून युद्धात सामील झाला असता तर कदाचित चित्र बदलेलेही असते..या जर तर च्या गोष्टी...पण असे दोन जणांचे इगो कितीतरी वेळा आजूबाजूच्या लोकांचे मोठे नुकसान करतात. आपणही हे अनुभवतोच ना
7. अधिकार आहे म्हणून एखाद्या चांगल्या माणसाचे पंख कापून त्याला कमी महत्वाच्या प्रोजेक्ट वर पाठवणे, किंवा महत्व कमी करणे....यात आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागण्यात तसा काही फरक नाही!!!
8.. एखाद्या complecated issue वरचा मेल जेंव्हा फिरत असतो तेंव्हा प्रत्तेक जण मेल वाचून"Adding XXX" करत असतो...हे स्वतःचे अस्तित्व दाखवणे नाही तर काय
 हि झाली काही उदाहरणे...ऑफिस सरकारी असो किंवा खाजगी सगळी कडे हीच वृत्ती...कारण काम करणारी सगळी माणसेच ...मनुष्य स्वभाव इथून तिथून सगळी कडे सारखाच...मग तो महाभारतात तरी कसा वेगळा असू शकेल..

कुठल्याही ऑफिस चे वातावरण त्यातील वरिष्ठ कसे वागतात या वर ठरते,वरिष्ठाला जर का अंतर्गत राजकारणात रस असेल तर नक्कीच त्या ऑफिस चे वातावरण तसे निर्माण होते...

तशी महाभारतातील ठळक पत्रे म्हणाल तर - युधिष्ठीर,अर्जुन, भीम,दुर्योधन,कर्ण,भीष्म,धृतराष्ट्र,कृष्ण,गांधारी,कुंती आणि द्रौपदी...तसे बाकी पण खूप आहेत...पण हि पात्रे म्हणजे संस्था आहेत....कारण यांच्या कडे पाहून अनेक पिढ्या घडत आहेत...

मग ते युधीशिठीरा सारखे "नरोवा कुंजरोवा" करणारे असो, अर्जुना सारखे कर्तुत्व असून कायम गोंधळलेले, गांधारी सारखे दिसत असून डोळे बंद करून घेतलेले, कर्णासारखे " Right Person in Wrong Party " , धृतराष्ट्रा प्रमाणे आंधळे पणाने चुकीच्या व्यक्तीला पाठींबा देणे, कुंती प्रमाणे आपल्या एका चुकीची शिक्षा एका पिढीला भोगायला लावणे किंवा युद्धाच्या आदल्या दिवशी नात्याची आठवण करून देण्या करिता कर्णाला भेटणे...असे किती तरी लोक आपल्या आजू बाजूला असतात...

एक Mangment Principle आहे "You Will Always Attract Towards What You Are " तुम्ही विचार करा आणि आणि तुमच्या आजूबाजूला बघा...

आणि .कदाचित या Principle मुळेच कर्ण दुर्योधना कडे किंवा दुर्योधन कर्णा कडे आकर्षित झाला असेल!! असे आपल्या office मध्ये घडतेच ना...

पण त्यातून चांगले आणि वाईट याचा भेद करू शकणाराच "Succesful & Effective Manager " होऊ शकतो.

कधी कधी एखादा अधिकारी एखाद्याला एका रात्रीतून "सुतपुत्राचा"  "आंगराज"करतो... अशा वेळेस आपल्याला प्रचंड यातना होतात, त्रास होतो, आपण त्रागा करतो......पण अशा गोष्टी चीर काळ टिकणार्या नसतात कारण अशा वेळेस कर्णाचेच सुभाषित आठवते ""दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥" "दास असो वा दासीपुत्र, जो कोणी मी असू दे. कोणत्या कुळात जन्माला यायचे ते नशीबावर अवलंबून असते, पराक्रम मात्र स्वतःवर." तसेच कुठे काम करायचे, कोण Boss असेल हे सगळे गौण...."Ultimately Your Skills Pays Your Bills"

कृष्ण शिष्टाई जेंव्हा असफल झाली आणि युद्ध अटळ आहे हे कळाले तेंव्हा भीष्मा नि कौरव आणि पांडवाच्या सगळ्या योध्याचे जे काही जे विश्लेषण केले होते त्यालाच आजच्या भाषेत SWOT Analysis म्हणतात...

कृष्ण जेंव्हा कुरुक्षेत्रा वर अर्जुनाला गीता सांगत होता तेंव्हा ती किती जणांनी ऐकली ? उत्तर आहे तीन (अर्जुन, संजय & धृतराष्ट्र) पण अर्जुना ला जे समजले ते बाकी दोघांना का नाही उमजले? कारण "Your Success is largely depend on ability to see things as they are "

कुरुक्षेत्रावर जेंव्हा कर्णा च्या रथाचे चाक धरणीने गिळले, शल्य जो कि त्याचा सारथी होता त्याने मदतीला नकार दिला कारण ....." Thats Not My Job " हे त्याचे उत्तर होते...असा अनुभव आपल्याला पण येतोच ना, गंभीर परिस्थितीत आपली म्हणणारी माणसे पाठ फिरवितात किंवा ज्यांच्या विश्वासावर किंवा भरवशावर एखादी उडी घ्यावी तर ते लोक बाजूला होऊन मोकळे होतात.

तसा जर का विचार केला तर चाक जमिनीत रुतल्या नंतर ते चाक काढणे त्या वेळी महत्वाचे होते का? तो रथाचा वापर करता लढू शकत नव्हता का ? त्याने बाण का नाही मारले?? याचे Management च्या भाषेतील उत्तर " Your Focus Goes Your Energy Flows "

असे आपण कितीतरी वेळा वागत असतो...ज्या वेळेस आपण स्वतःला Managment Priorities शी Allign करू शकत नाही त्या वेळेस आपला कुरूक्षेत्रा वरचा कर्ण होतो...म्हणजेच "Any Point of Time you should be in a position to understand situational Priorities "

ऑफिस मध्ये आपण जुने मेल्स जपून ठेवतो कारण आपल्याला माहिती असते कधी तरी आपल्यावर पण "हा सूर्य आणि हा जयद्रथ" करायची वेळ येऊ शकते

ह्या अठरा दिवसाच्या कुरुक्षेत्रानी तसे आपल्याला खूप शिकवले

मी वर म्हणालो तसे ह्या सगळ्या महाभारतातील व्यक्ती म्हणजे एक एक संस्था आहेत...आपल्या आजू बाजूला जरा डोळे उघडून पहिले तर असे किती तरी लोक दिसू शकतात? आजूबाजूलाच का? आपण पण त्यापैकी एक असू शकतो? म्हणूनच मी म्हणलो कि आपण पण " रडीचाच डाव खेळत असतो"

पण हे सगळे नीती - अनीती, धर्म - आधार्मा ला धरून जे काही वागत करत असतो ते फक्त  स्वतःचे अस्तित्व टिकविण्या करिताच ना......



बिपीन कुलकर्णी